Pm Vishwakarma Yojana काय आहे? कोणाला मिळणार लाभ ?तर चला जाणून घेऊया?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी Pm Vishwakarma Yojna सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून विविध प्रकारचे कौशल्य विकास तसेच प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षणादरम्यान त्यांना दररोज ₹ ५०० ची रक्कम दिली  जाते. तसेच Pm Vishwakarma Yojna विविध प्रकारचे टूल किट खरेदी करण्यासाठी सरकारकडून  रु. १५००० ची रक्कम बँकेकडे हस्तांतरित केली जाते. या योजनेत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? अशी सर्व महत्वाची माहिती तुम्हाला या लेखात  दिली आहे. 

 

भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या  सक्षमीकरणासाठी सरकारने  Pm Vishwakarma Yojna सुरू केली आहे.या  योजनेअंतर्गत  कारागीरांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान केली जाते. Pm Vishwakarma Yojna तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्ही सरकारकडून रु ३,००,००० पर्यंतची रक्कम  ५% व्याजाने मिळते.  ही रक्कम दोन टप्प्यात दिली जाते. पहिल्या टप्प्यात रु. १,००,००० चे कर्ज दिले जाते, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रू.२,००,००० चे कर्ज दिले जाते.

Pm Vishwakarma Yojane ची उद्दिष्टे काय आहेत ?

  • अनेक जाती शासनाच्या विविध प्रकारच्या आर्थिक लाभापासून वंचित  राहतात . तसेच त्यांना कार्यक्षेत्रातही योग्य प्रशिक्षण मिळत नाही. विश्वकर्मा समाजातील सर्व जातींना कार्यक्षेत्रात योग्य प्रशिक्षण देणे हा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा मुख्य हेतू आहे. तसेच, त्यांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे लागते.
  • Pm Vishwakarma Yojne साठी 13,000 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.  पाच वर्षांच्या कालावधीसाठी (आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28) मंजुरी देण्यात आली आहे.  
  • हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार  ,गुरु-शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे तसेच  त्याला बळकटी देणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे. 
  • या योजनेंतर्गत 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांसाठी सरकार कर्ज देणार आहे.
  • या योजनेंतर्गत केवळ कारागीर आणि कारागिरांनाच प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जातील ज्यामुळे त्यांना नवीन ओळख मिळण्यास मदत होईल. 
  • हस्त-कलाकार  आणि कारागीरांच्या कामाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. 
pm vishwakarma yojana

Pm Vishwakarma Yojna ची वैशिष्ट्ये.

  • विश्वकर्मा समाजातील अशा सर्व जातींना हा लाभ दिला जाणार आहे. 

 

  • या योजनेअंतर्गत सुतार, होडी बांधणी कारागीर, चिलखत बनवणारे,सोनार,कुंभार, लोहार,मेस्त्री,१४० हून अधिक जातींना लाभ मिळणार आहे.

 

  • या योजनेसाठी सरकारने १३००० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे.

 

  • या योजनेद्वारे विश्वकर्मा समाजातील जातींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळावा यासाठी आर्थिक मदत केली जाते.

 

  • या योजनेंतर्गत, विश्वकर्मा समाजातील जातींना कमी व्याजावर कर्ज दिले जाते जेणेकरून ते स्वतःचा रोजगार निर्माण करतील. 

 

  • या योजनेअंतर्गत, ३,००,००० रु. चे कर्ज५ % व्याजाने दिले जाते,पहिल्या टप्प्यात १,००,००० रु. चे कर्ज दिले जाते 

 

  •  दुसऱ्या टप्प्यात २,००,००० रु. चे कर्ज दिले जाते.



Pm Vishwakarma Yojna ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार तसेच कारागिरांना मदत करेल. पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल: Pm Vishwakarma Yojna ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार तसेच कारागिरांना मदत करेल. पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल:

  1. सुतार, 
  2.    होडी बांधणी कारागीर, 
  3.     चिलखत बनवणारे,
  4.     सोनार,
  5.     कुंभार, 
  6.      लोहार,
  7.     मेस्त्री,
  8.     शिंपी,
  9.     धोबी,
  10. फुलांचे हार बनवणारे,
  11. न्हावी ,
  12. कुलूप बनवणारे
  13. हातोडी कामगार ,अवजार बनवणारे
  14.  पादत्राणे बनवणारे 
  15. शिल्पकार ,मूर्तिकार, कोरीव काम, दगड फोडणारे,
  16. टोपल्या बनवणारे कारागीर
  17.  बाहुल्या आणि खेळणी बनवणारे
  18. मासेमारचे जाळे विणणारे.



Pm Vishwakarma Yojne साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ?

  • आधार कार्ड

 

  • पॅन कार्ड

 

  • बँक पासबुक

 

  •  मोबाईल नंबर

 

  • उत्पन्न प्रमाणपत्र

 

  • जात प्रमाणपत्र

 

  • ओळखपत्र

 

  • पत्त्याचा पुरावा

 

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Pm Vishwakarma Yojne ऑनलाइन अर्ज कराल?

  • पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmvishwakarma.gov.in/ यानंतर, होम पेजवर “अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा. आता यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने CSC वर लॉगिन करा. 

 

  • अधिकृत वेबसाइट: योजनेसाठी अधिकृत वेबसाइटला देऊ शकता.  नावनोंदणी: “नोंदणी” लिंकवर क्लिक करा. आधार ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर आणि तुमचा मोबाइल नंबर दिल्यानंतर, प्रक्रिया पूर्ण होते.होईल. 

 

  • pmvishwakarma.gov.in वर भेट देऊन आणि लॉगिन केल्यावर मुख्य मेनूमधील अर्जदार/लाभार्थी लॉगिन लिंकवर क्लिक करून तुम्ही PM विश्वकर्मा योजना पोर्टलवर लॉग इन करू शकता. किंवा  लिंकवर क्लिक करू शकता. 

 

किंवा 

  •  तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन तुमचे आधार कार्ड आणि मोबाइल नंबर सत्यापित करणे आवश्यक आहे. 

 

  •  मोबाइल आणि आधार सत्यापन झाल्यावर तुम्हाला CSC द्वारे तुमचे कारीगर नोंदणी करावि  लागेल. 

 

  • तुम्हाला तुमची सर्व माहिती CSC केंद्राद्वारे सबमिट करून योजनेसाठी अर्ज करावा लागेल. यात तुमची वैयक्तिक माहिती, व्यावसायिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी समाविष्ट असणे आवश्यक आहे. 



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top