अजूनही तुम्ही लाडक्या बहिणीचा अर्ज भरलेला नाही ?तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी .

राज्यभरातून  Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojneला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि अजूनही ही योजना खूप चर्चेत आहे २,४०,००,००० महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत.   Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojne अंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यात पैशांचे वाटप करण्यात आलेले आहे . अनेक महिला अर्ज देखील दाखल करत आहे,अद्याप काही महिलांचे फॉर्म भरलेले नाहीत.  ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत सरकारने वाढवलेली आहे .

 Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojneची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती आता ती 30 सप्टेंबर करण्यात आलेली आहे . 

mukhyamantri mazi ladki bahin yojna
  • राज्यभरात सुरू असलेली Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojne ही सर्वत्र जोरदार चर्चेत  आहे आणि राज्यातील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांचे  आर्थिक सहाय्य दिले जाते.

 

  •  Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojneसाठी लाखो महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि लाखो महिलांनाही पैसे भेटले आहेत.  तरीही अद्याप बऱ्याच  अशा महिलानी  या योजनेचा लाभ घेतलेल्या नाही तर या महिला वंचित राहू नये म्हणून सरकारने त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे .
  • ज्या महिलांनी अद्याप व फॉर्म भरलेला नाही त्या महिला आता अर्ज करू शकतात . सुरुवातीची मुदत 31 ऑगस्ट  होती 31 ऑगस्ट पर्यंत ज्या स्त्रियांनी फॉर्म भरलेल्या आहेत त्या स्त्रिया या योजनेसाठी पात्र होत्या. 
  •  राज्य सरकारच्या या  Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojneसाठी अर्ज करण्याची मुदत आता एक महिन्यांनी वाढवली  आहे . 
  • आता त्याची तारीख 30 सप्टेंबर अशी ठेवण्यात आलेली आहे त्या संदर्भातील जीआरही सरकारने प्रसिद्ध केलेला आहे . 
  • सप्टेंबर महिन्यामध्ये ही अर्ज करू शकता. 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojneसाठी कोणत्या महिला पात्र असणार ?

  • विवाहित ,विधवा ,घटस्फोटीत ,परितक्त्या ,निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. 
  • वयाची किमान मर्यादा 21 वर्षे पूर्ण व कमाल ६० वर्ष आहे . 
  • अर्ज करणाऱ्या महिलांची बँक खाते असणे आवश्यक आहे . 
  • महिलांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे . 
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे. 
  •  सरकारच्या अन्य आर्थिक योजनेद्वारे दीड हजारापेक्षा त्या स्त्रीने लाभ घेतलेला नसावा. 
  •  चार चाकी वाहन नावावर नसावे. 

 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojne चा अर्ज अर्ज कसा कराल ?

  • अर्ज तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन करू शकता . 
  •  बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. 
  •  ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये सुद्धा त्याची सोय केलेली आहे. 
  •  महापालिकेची वार्ड  ऑफिस इथून तुम्ही अर्ज करू शकता . 
  • सेतू सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र इथूनही तुम्ही अर्ज करू शकता. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top