Vitthal Rukmini Varkari Vima Chatra Yojna महाराष्ट्रमध्ये प्रत्येक घरातील व्यक्ती पंढरीच्या वारील जातो,प्रत्येक व्यक्तीला आपण जीवंत असेपर्यंत एकदा तरी पंढरीची वारी करावी असे स्वप्न असते,विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन व्हावे, असे वाटते, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत या यात्रेला लाखो लोक जमतात,आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविकांची गर्दी आपल्याला पंढरीच्या वारीला जाताना दिसते, बऱ्याच गावातील लोक पायावरी करतात,या प्रवास दरम्यान अनेक अपघात होतात ,आपण पहिले तसेच ऐकले आहे.
अनेक लोक आजारी देखील पडतात,अनेकांचा वाटेत मृत्यू होतो किंवा काही अपघात होऊन लोकांना कायमचे अपंगत्व येते, वारकऱ्यांसाठी थोडा दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रात दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा योजना हि पथ यात्रा काढली जाते.
वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी , महाराष्ट्र राज्यातील आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव आहे Vitthal Rukmini Varkari Vima Chatra Yojna विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना.
या महाराष्ट्र शासनाकडून विमा योजनेतून तुन वारकऱ्यांसाठी विमा दिला जाणार आहे. भाविकांसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे . तर सर्व वारकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपण या लेखात या योजनेची माहिती पाहणार आहोत.
थोडक्यात माहिती.
महाराष्ट्र शासनाकडून २१ जून २०२३ रोजी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते Vitthal Rukmini Varkari Vima Chatra Yojna सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे वारकर्यांना सुरक्षा आणि आर्थिक मदत मिळावी,आषाढी एकादशीच्या काळात पथ यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना शासनाकडून जीवन विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.
महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी जाहीर केलेला विमा विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेसाठी IFFCO Tokyo General Insurance Company Ltd या कंपनीची निवड केली आहे . या योजनेअंतर्गत 15 लाख वारकऱ्यांकरीता विमा हप्ता भरण्यासाठी २,७०,००,०००(दोन कोटी सत्तर लाख )रुपये इतकी रक्कम टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीला देण्यास मान्यता दिली आहे . आषाढी वारी करता क्षेत्र पंढरपूर येथे पाय वारी अथवा खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या तसेच आजारी पडलेला वारकऱ्यांकर्ता ही योजना लागू राहील . या योजनेचा विम्याचा कालावधी ३०
दिवसांचा राहील या योजनेअंतर्गत विमा कंपनीकडे दावा करण्यासाठी तुम्हाला अर्ज करणे आवश्यक राहील.
या योजनेअंतर्गत सरकारकडून ३५ हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण चा लाभ देण्यात येणार आहे. वारीच्या सुरुवातीपासून ३० दिवसांच्या आत एखाद्या भाविकांचा अपघात,नुकसान, अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यासच या विम्याचा लाभ दिला जातो. वारकरी व त्याच्या कुटुंबाला उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.. या योजनेचा लाभ घेऊन वारकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. तसेच वारीमध्ये तो कोणत्याही अपघातात सापडला तर त्याला आर्थिक खर्चासाठी इतर कोणावर अवलंबून राहायची गरज भासणार नाही.
Vitthal Rukmini Varkari Vima Chatra Yojna वैशिष्ट्ये.
- आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून विमा छत्र योजना सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत वारकऱ्यांचे काही नुकसान झाल्यास त्यांना मदत म्हणून शासनाकडून या विमा अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.
- ही योजना महाराष्ट्राच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत राबवली जात आहे.
- विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी वारकरी विमा योजनेचा लाभ आषाढी वारीदरम्यान नुकसान झाल्याला वारकऱ्यांना भेटेल या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आषाढी वारी सुरू झाल्यापासून ३० दिवसाच्या आत झालेल्या नुकसानी वर विम्याचा लाभ दिला जाईल.
- तसेच योजना अंतर्गत विमा काढणाऱ्या भाविकांना कोणतीही घटना घडल्यास ,कोणत्याही अडचणी आल्यास ३५,००० ते ५,००,००० असा विमा शासनाकडून दिला जाणार आहे.
- जर भाविकांचा या वारी दरम्यान मृत्यू झाला तर त्याला ५,००,००० रुपयांची मदत मिळते .
- वारीदरम्यान वारकऱ्याला अपंगत्व आल्यास १,००,००० रुपये किंवा ५०,०००हजार रुपये मिळतील.
- भाविक वारीदरम्यान आजारी पडल्यास ३५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते .
- ही मदत वारकऱ्याच्या अर्जदाराच्या बँक खात्यावर पाठवली जाते ,वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास अर्जदाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते.
पात्रता: अर्जदार हा मूळचा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे .
Vitthal Rukmini Varkari Vima Chatra Yojna ने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
मृत्यू प्रमाणपत्र
अक्षम प्रमाणपत्र
आजार असल्यास डॉक्टरांची नोंद प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
शिधापत्रिका
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक खाते पासबुक
राज्यातील कोणत्याही इच्छुक नागरिकाला आषाढी वारीमध्ये सहभाग घेण्यासाठी विठ्ठल रुक्माई विमा सादर करण्यासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्र शासन लवकरच अधिकृत वेबसाईड सुरु करेल. तेव्हा आम्ही या लेखाद्वारे अर्ज कसा करायचा ही माहिती देऊ ,आता आम्ही तुम्हाला अर्ज कसा करायचा ते सांगू शकत नाही.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न .
प्रश्न विठ्ठल रुक्माई विमा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली?
महाराष्ट्र राज्यात विठ्ठल रुक्मिणी वारकरी विभाग सुरू करण्यात आले आहे.
21 जून 2023 रोजी योजना जाहीर केली गेली आहे.
प्रश्न .या योजनेअंतर्गत वारकऱ्यांना किती रुपयांचा फायदा मिळेल ?
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार अर्ज करणाऱ्या व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबीयांना 35 हजार ते पाच लाखापर्यंत ची आर्थिक मदत या विमा अंतर्गत केली जाणार आहे.
निष्कर्ष:
पंढरपूरला ला अनेक भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिहते, यामध्ये दिंडीला जाणारे बहुतेक वारकरी अतिशय गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असतात . त्यामुळे त्यांना सहजासहजी खाजगी विमा योजनांचा लाभ घेता येत नाही, महाराष्ट्र सरकारने खूप चांगला निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे नक्कीच लाखो वारकऱ्यांना विमा योजनेचा फायदा मिळणार आहे. लाखो वारकरी हि बातमी ऐकून खूप खुश आहेत, पांढुरंगाकडे मी प्रार्थना करते की, हि योजना लवकरात लवकर लागू व्हावी, जेणेकरून वारकर्यांना एक मदतीचा हात मिळेल.
धन्यवाद….