वटपौर्णिमा मुहूर्त २०२४,Vat Purnima व्रताची माहिती.

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “Vat Purnima” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

Vat Purnima व्रताची माहिती. 

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे तीन दिवस  व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव पूजा करावी.. या व्रताचा विधी अनेक ठिकाणी अलग अलग पहायला -मिळतो. नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. सावित्रीची कथा ऐकेली जाते. तसेच काहीठिकाणी वडाच्या झाडाला धाग्याने पाच फेऱ्या मारल्या जातात. तसे विधिव्रत पूजा केली जाते.   नवऱ्याच्या दीर्घायुषासाठी प्रार्थना करतात. सत्यवानाचे प्राण पुन्हा  वडाच्या झाडाखाली सावित्रीला मिळाले होते, आणि तिने वडाच्या झाडाची पूजा   केली होती.

Vat Purnima मुहूर्त २०२४

ज्येष्ठ Purnima तिथी या वर्षी शुक्रवार, 21 जून रोजी सकाळी 07:31 पासून सुरू होत आहे आणि शनिवार, 22 जून रोजी सकाळी 06:37 पर्यंत असणार आहे. त्यामुळे दोन दिवस वटपौर्णिमा आहे. 

२1 जून रोजी शुभ योग आणि ज्येष्ठ नक्षत्र आहे. शुभ योग सकाळपासून संध्याकाळी 06.42 वाजेपर्यंत आहे, तर ज्येष्ठ नक्षत्र देखील सकाळपासून संध्याकाळी 06.19 वाजेपर्यंत आहे. त्या दिवसाचा शुभ मुहूर्त  सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 पर्यंत आहे. अशा स्थितीत वट सावित्री पौर्णिमा व्रताची पूजा  करावी, ते आपल्यासाठी  शुभ राहील.

 

सत्यवान आणि सावित्री यांची कथा:

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र  मुलगी होती. सावित्री लग्नायोग्य झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.तिच्या वडिलांनी तिला देशोदेशी धाडले होते, सावित्रीने सत्यवानाची निवड केली.

 सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. 

नारद ऋषींनी सावित्रीला सांगितले होते कि, सत्यवानाचे आयुष्य हे एक वर्षाचे  आहे आणि तू त्याच्याशी लग्न करू नये,पण सावित्रीने ते मान्य केले नाही. सावित्रीने नारद ऋषींना आशीर्वाद द्यायला सांगितला होता कि ,सत्यवानाचे प्राण नेताना  मला दिसावे असा आशीर्वाद द्या, भगवान नारद ऋषींनी सावित्रीलाआशीर्वाद दिला . सावित्री आणि सत्यवानाशी विवाह झाला, व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास सुरु केले.. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाच्या हे लक्षात आल्यावर सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे दृष्टी  व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तु म्हटले. तेव्हा तिने हे कसे काय मला याची प्राप्ति होणार हे यमराजाने सांगितले. वचनबद्ध झाल्याची आठवण  करून दिली व यमराजांना  सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात Purnimela स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top