आपण बऱ्याच लोकांना मला Unhale लागले आहे म्हणताना ऐकलं आहे .Unhale लागण्याची प्रमुख कारण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे.मूत्रमार्गातील झालेले इन्फेक्शन असू शकते,आपली लघवी विसर्जित करण्याच्या मार्गात कुठेही इन्फेक्शन झाले असेल तर आपल्याला जळजळ होते, अशा परिस्थितीत आपल्याला सारखे सारखे लघवीला जावे लागते, कधी कधी आपल्या लघवीतून रक्त पडण्याची ही शक्यता असते.
आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्याला जे औषध देण्यात येतात, ती स्ट्रॉंग असतात त्यामध्ये उष्ण घटक असल्यामुळे आपले शरीर सहन करू शकत नाही. आपल्याला Unhale लागतात. आपल्याला लघवी करणे खूपच त्रासदायक वाटू लागते.
अनेकदा उन्हाळ्यामध्ये थोडे जरी तापमान वाढले तरी ,आपल्या शरीराला पूर्ण घाम येतो आणि आपल्या शरीरातील पाणी कमी पडते . आपल्याला चक्कर आल्यासारखे वाटते. . काहींना उन्हाळ्याचा लघवी करताना त्रास होतो .
Unhale लागण्याची लक्षणे:
- वारंवार आपल्याला लघवीला होते तसेच त्याचबरोबर आपल्याला जळजळ ही होते . आणि आपल्याला इन्फेक्शन होते .
- उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातुन घाम जास्त गेल्यामुळे,आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते ,पाणी कमी झाल्याने क्षारांचे प्रमाण वाढते . हे प्रमाण वाढल्यामुळे,लघवी करताना आपल्याला प्रचंड वेदना होतात .
- पुरुषाच्या तुलनेत महिलांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो .
- प्रोस्टेट इन्फेक्शन हा त्रास पुरुषांना होतो मूत्रमार्गाला इन्फेक्शन होते त्याला प्रोस्टेटिस म्हणतात . प्रोटेस्ट ग्रंथीना सूज येते,आणि खूप वेदना होतात चुकीच्या असुरक्षित सेक्समुळे ही पुरुषांना हा त्रास होऊ शकतो. इन्फेक्शन असल्यामुळे उन्हाळा झाल्यास पुरुषांना (पेनिस ) प्रोटेस ग्रंथीला सूज येऊन लघवी करताना मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यामुळे बऱ्याचदा Unhale लागल्याचा त्रास होतो .
- महिलांना व्हजायनामधून चिकट दुर्गंधीयुक्त स्त्राव बाहेर पडण्याची शक्यता असते. तसेच , कमरेत ही वेदना होतात .
- आपल्या लघवीचा रंग बदलतो ,फेसाळणारी आणि दुर्गंधीयुक्त लघवी होते .
- आपल्याला सारखे सारखे लघवीला जावे असे वाटते, तसेच आपल्याला काही थेंब लघवी बाहेर पडल्यासारखे ,वारंवार लघवीला आल्यासारखे होते.
- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला मूत्र विसर्जनांच्या समस्या होतात त्याला आपण उन्हाळे असे म्हणतो. आपल्याला परत परत लघवीला जाणे असं सारखा त्रास होत असतो .
- उष्णतेमुळे आपल्या शरीरात निर्जलीकरण झाल्यास आपल्याला चक्कर येते, मूर्च्छा येते, झोपेमध्ये अडथळा येतो. तसेच लक्ष केंद्रित करण्याचे आणि शिकण्याची क्षमता कमी होते.
- मूत्रमार्ग सुजल्यामुळे लघवी करणे कठीण होतं त्यावेळी समस्याकडे दुर्लक्ष करू नये .
- ज्या लोकांना मुतखडा म्हणजे किडनी स्टोन असलेल्या लोकांना Unhale होऊ शकतात. अशावेळी आपली लघवी व्यवस्थितपणे बाहेर पडत नाहीत आणि तिचा रंग बदलतो अशा अनेक समस्या होतात .
Unhale थांबवण्याचे घरगुती उपाय :
- तुम्ही उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिऊ शकता, आपल्या शरीरासाठी पाणी पिणे गरजेचे आहे .
- Unhale पड्ल्यावर काहींना ताप सुद्धा येतो ,यासाठी तुम्ही आपल्या शरीरात थंडावा टिकून ठेवण्यासाठी लिंबू सरबतही पिऊ शकता .
- सब्जा (तुळशीचे बी) पाण्यात टाकून त्याचे सेवन करू शकता. त्याच्यामुळे आपले जे मूत्र विसर्जन करताना आपल्या शरीरातील विषारी धातू बाहेर पडले जातात.
- तुम्ही नाचणीच्या आंबील ही पिऊ शकता ,कारण नाचणीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन ,मॅग्नेशियम ,फायबर व कार्बोहायड्रस यासारखे जीवनसत्वे खूप मोठ्या प्रमाणात सापडले जातात . तसेच ,नाचणीच्या आंबील पिल्यामुळे आपल्याला गॅस सारख्या समस्या, अपचन, पोटासंबंधीचे आजार असतात ते शक्यतो होत नाहीत .
- जिरे ,धने पूड, कोथिंबीर घालून तुम्ही ताक पिऊ शकता,किंवा नुसतेच ताकाचे सेवन करू शकता. ताक पिल्याने आपल्या शरीरातील जे विषारी पदार्थ आहेत ते,आपल्या मूत्रावाटे बाहेर पडले जातात .
- दह्यासोबत आपण जिऱ्याचेही सेवन करणे गरजेचे आहे . दह्यात प्रोबायोटिक्स असते.
- उन्हाळ्यात तहान भागवुन पचनक्रिया सुधारण्यासाठी जिरे पावडर घालून तुम्ही ताक पिऊ शकता .
- धने हे पोटातील दाह कमी करतात ताकांमधून कॅल्शियम ,फॉस्फरस यासारखे जीवनसत्व आपल्याला मिळतात.
- नारळ पाणी पिऊ शकता किंवा शहाळ्याचे पाणी पिऊ शकता त्याच्याने आपल्याला त्रास कमी होतो पण हे शुद्ध असणे गरजेचे आहे .
- आमसुलाचे पाणी पिऊ शकता किंवा कोकम सरबत तुम्ही पिऊ शकता.
- कैरीचे पन्हा पिऊ शकता.
- विटामिन सी आहार घेऊ शकता. आपल्या आहार यामध्ये आपल्याला मोसंबी, स्ट्राबेरीज,खरबूज तसेच आंबे खाल्ले पाहिजे.आंबे खाण्यापूर्वी दोन तास आधी ते पाण्यात ठेवावे आणि मगच ते खावेत त्यामुळे उष्णता बाधत नाही.
उन्हाळ्यात आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी.
- स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, उन्हाळ्यात हलक्या रंगाचे सैल कपडे घालणे गरजेचे आहे .
- तुम्ही जर ऑफिससाठी किंवा कामानिमित्त जर बाहेर पडत असेल तर ,उपाशी, अनोशी पोटी बाहेर पडू नये त्यामुळे उष्माघाताची शक्यता जास्त असते नोकरदार महिलांनी दुपारच्या जेवणामध्ये सॅलड घेतले पाहिजे आणि घरातून महिलांनी शक्यतो खाऊनच बाहेर पडावे.
- सकाळी 11 ते दुपारी ३ पर्यंत उन्हामध्ये फिरणे टाळू शकता .
- चेहऱ्याचे तसेच आपल्या डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी घालणे गरजेचे आहे तसेच एक आपल्याकडे पाण्याची बॉटल तसेच छत्री घेऊन तुम्ही बाहेर जाऊ शकता.
- चहा सोडून देणे गरजेचे आहे दोन कपापेक्षा जास्त चहा पिणे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक आहे
- तुम्ही जर मांसाहारी असाल तर याचे सेवन तुम्ही कमी करू शकता ,कारण हे जे मांसाहारी पदार्थ आपण जे खात असते ते पचवण्यासाठी आपल्या शरीराला खूप कष्ट करावे लागतात आणि खूप आपली पचनक्रिया त्याच्यामुळे बिघडू शकते.
- उन्हाळ्यामध्ये कमी तिखट जेवण खाणे गरजेचे आहे.
निष्कर्ष :
उन्हाळ्यामध्ये आपण स्वतःकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे, कारण उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरातून अधिक घाम निघाल्यामुळे आपण डिहायड्रेड होऊ शकतो अश्या समस्या होतात. दुसरीकडे आजाराचे कारण बनले जाते, आपण खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आजारी पडण्याची शक्यता बरीच कमी होईल या ऋतूत पोटात गॅस निर्माण करणारे पदार्थ घेऊ नयेत .उन्हाळ्यात आपल्याला Unhalye चा त्रास होणार नाही ,याकडे आपण स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.