सुरज  चव्हाण बिग बॉस जिंकल्यानंतर त्याला 14 लाखांचा चेक आणि दहा लाख जाहीर ,इलेक्ट्रिक बाईक आणि बरच काही तर चला पाहू त्याच्याबद्दल माहिती.

 अलीकडे आपण सर्वजण Bigg Boss Marathi season  5  पाहत होतो ज्याला गेम समजत नाही आणि त्याच्यावरती खूप सारी अशी टीका होत होती . परंतु महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला खूप प्रेम दिले आणि असेही बिग बॉस   सीजन  ५ च्या  ट्रॉफीवर Suraj Chavan  ने त्याचं नाव कोरलं .   बिग बॉस सीजन ५मध्ये खूप कलाकारही होते आणि त्यात सुरज हा इंस्टाग्राम रील्स बनवायचा . Suraj Chavan च ठरला बिग बॉस विनर त्याला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केदार शिंदे यांनी नुकतीच केलेली आहे .

७० दिवसापासून चा बिग बॉसच्या घरात रंगलेला हा खेळ संपला आणि बारामतीचा Suraj Chavan हा विजेता ठरलेला आहे . 

अभिजीत सावंत हा दुसऱ्या क्रमांकावरती राहिला . सुरजणे त्याची पॉवर  दाखवली आणि बिग बॉस जिंकत बक्कल पैसेही कमावले.,तसेच महाराष्ट्रातील जनतेचे  प्रेमही… काही क्षणातच लखपती झालेला आहे . 

 सुरज हा सामान्य , सर्वांसोबत  प्रेमाने वागायचा Suraj Chavan  अडखळताना वारंवार आपल्याला दिसला.  तो बारामती मधीलआहे. हा बिग बॉस मध्ये येण्यास उत्सुक नव्हता . 

Suraj Chavan शिकलेला नसल्यामुळे त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींना सामना ही करावा लागलेला आहे परंतु कार्यक्रमात येण्यास नकार त्याने दिला होता परंतु बिग बॉसच्या टीमने त्याच्या गावी जाऊ त्याची समजूत काढली आणि त्याला बिग बॉस मध्ये आणले. मी त्याच्या साधीपणाने त्याच्या सगळ्यांची मन त्यांनी जिंकलेली आहे आणि आपल्या वागण्यामुळे प्रत्येकाचा आदर करण्याच्या त्याच्या सवयीमुळे Suraj Chavanहा बिग बॉस चा विनर ठरलेला आहे. 

Suraj Chavan ला किती पैसे भेटले

बिग बॉसचा अंतिम विजेता म्हणजे विनर सुरज चव्हाण ला पहिला क्रमांकाचे बक्षीस भेटले १४ लाख रुपयांचा चेक त्याला देण्यात आला तसेच कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु.न.  गाडगीळ यांच्याकडून सुरज ला   दहा लाख रुपये ही जाहीर करण्यात आले . तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाइकही बक्षीस देण्यात आली. पु.न.  गाडगीळ यांच्याकडून एक लाख रुपयाची दागिने खरेदी करण्यासाठी वाउचर देण्यात आलेला आहे. असे सुरज  चव्हाणाला बक्षीस भेटले आहे . 

 अभिजीत सावंत ला  बिग बॉस चा रनर ऑफ अभिजीत सावंतला पु.न.  गाडगीळ यांच्याकडून एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला तसेच धनंजय पवार ,अंकिता वालांवरकर, निक्की तांबोळी यांना प्रत्येकी   एक एक लाख रुपये देण्यात आलेले आहेत . 

 

तिसरे स्थान मिळवणारी निक्की  तांबोळी चौथ्या क्रमांकावर आलेला धनंजय पोवार आणि पहिला पाच मधून बाहेर पडणारे अंकिता  वालांवरकर यांचा समावेश आहे .



Suraj Chavan

जान्हवी किल्लेकरला शोमधून बाहेर काढण्यात आल्याने, तिने जाण्यापूर्वी, जान्हवीने विजेत्याच्या ट्रॉफीसाठी लढा सुरू ठेवण्याऐवजी रोख बक्षीस देऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेत 9 लाख रुपयांचे  बक्षीस घेणे निवडले. स्पर्धेतील टॅक्स क्वीन म्हणून  ओळख झालेली जान्हवी किल्लेकरला  इतरांच्या तुलनेत  चांगले  पैसे भेटलेले आहेत.  जान्हवी किल्लेकरलाने  स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता तिला तब्बल नऊ लाख रुपये भेटलेले आहे जान्हवी किल्लेकर ही   क्रमांकावर होती आणि तिने पैसे घेण्याचे निर्णय तिच्यासाठी योग्य ठरलेला आहे. 

 लोकप्रिय मराठी कार्यक्रम बिग बॉस ५ . टॉप सहा स्पर्धकांमधून Suraj Chavan यांनी ट्रॉफी वरती स्वतःचे नाव कोरलेले आहे .  जान्हवी किल्लेकर यातील नऊ लाख रुपये घेऊन घराबाहेर गेली जान्हवी किल्लेकर हि सहाव्या क्रमांकाची स्पर्धक होती.

या सर्व भेटवस्तू त्याला भेटलेल्या आहेत.  अत्यंत गरीब परिस्थितीतून सुरज ने स्वतःचा अस्तित्व निर्माण केलेले आहे त्याची आई आणि वडील दोघेही एक्सपायर झालेले आहेत आणि  सुरज चव्हाण यांनी अतिशय बिकट अशा परिस्थितीतून स्वतःच अस्तित्व निर्माण केलेला आहे लोकांना तो हसवायचा रील बनवायचा आणि त्यातूनच त्यांनी महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनावरती राज्य केलेले आहे आणि सुरज हा  Marathi Big Boss winnerठरलेला आहे तर सुरज साठी अभिनंदनच का सुरज हा बारामती  चा किंग झालेला आहे . त्याचा  साधेपणा आणि सगळ्यांची मन जिंकली वागण्यामुळे प्रत्येकाचा आदर करण्याच्या या सवयि  मुळे सुरजणे सर्वांचे मन जिकंले.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top