चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातला नवरात्रीचा ९ दिवस मानला जातो . या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले जाणारे आपले भगवान Shree Ram यांचा जन्म झाला आहे,भगवान राम हे विष्णूचे अवतार आहेत हे आपणास माहीत आहे. लक्ष्मण हे शेषनाग चा अवतार, भरत हा सुदर्शन चक्र आणि शत्रुघ्न शंखाचे अवतार होते हे कमी लोकांना माहिती आहे.
भगवान Shree Ram यांचा जन्म दिवस मनाला सुख आणि आनंदात रममान करणारा जन्मदिवस आहे. या दिवशी संपूर्ण आपल्या देशभरात रामनवमी साजरी केली जाते.
यावर्षीची रामनवमी बुधवार १७ तारखेला आहे तसेच या श्रीरामचंद्र यांचा जन्म दुपारी १२ वाजता झाला होता,असे मानले जाते .राम नवमीचा टिळक आपल्याला दुपारी १२ वाजून साधारणपणे ४ मिनिटं असा आहे .
भगवान श्रीरामचंद्राचा जन्म सूर्यवंशी या कुळामध्ये झाला आहे , तसेच लहान असताना त्यानी चंद्राचा हट्ट केल्यामुळे त्यांना रामचंद्र असेही नाव पडले गेले. श्रीराम हे रघुवंशी असून त्यांना सुर्यवंशी असेही म्हणतात.
५०० वर्षानंतर Shree Ram यांची अभिषेक झाल्यानंतरची पहिलीच रामनवमी साजरी होणार आहे.
रुरकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेची वैज्ञानिक यासाठी दिवस रात्र काम करत आहेत, यावर्षीच्या रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणांनी राम लल्लाचा अभिषेक व्हावा अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्यक्त केली आहे ,आपल्याला माहित आहे की ,कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यात पश्चिम दिशेच्या दरवाजातून मावळती सूर्यकिरणाचा अभिषेक केल्याचे आपण पाहिले आहे. हा प्रसंग आपण पहिला असेल. आता ह्या प्रसंगाचा अनुभव आपल्याला भगवान श्रीरामाच्या मंदिरात राम नवमीच्या दिवशी सर्व भक्तांना पाहायला मिळणार आहे .
सूर्य टिळक यासाठी गिअरबॉक्स आणि परावर्तित आरसे तसेच लेन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सूर्य टिळक फक्त रामनवमी दिवशी दरवर्षी होणाऱ्या उत्सवात असेल.
भगवान श्रीराम यांनी ५०० शे वर्षांनी आपल्या जन्मभूमी तसेच आपल्या घरी विराजमान झाले आहेत,त्यांची हि पहिलीच राम नवमी असणार आहे .
हा दिवस पाहायला प्रत्येक राम भक्त आतुर आहे ,कारण श्रीरामचंद्र नवमी मोठ्या आनंदात साजरी होणार आहे. या वर्षीची राम नवमी खूप आकर्षक असणार आहे कारण यावर्षीच्या रामनवमीच्या दिवशी श्रीरामांच्या कापाळावर सूर्य तिलक यांचा अभिषेक होणार आहे .
भगवान Shree Ram यांविषयी माहिती:
संपूर्ण नाव: श्री रामचंद्र दशरथ रघुवंशी
वडील: दशरथ
माता: कौशल्या
पत्नी :सीता
पुत्र: लव्ह आणि कुश
राजा Shree Ram ला ३ सावत्र भाऊ होते – लक्ष्मण ,भरत ,शत्रुंन्घ
रामाला एक मोठी बहीण होती तिचे नाव शांता असे आहे.
राजा दशरथ आणि कौशल्याची शांता हि मुलगी. तिला अंग देशाचा राजा रोमपाद याने स्वत:ला मूल होत नसल्याकारणाने दत्तक घेतले होते. राजा रोमपदाची बायको वर्षिणी हि कौशल्याची मोठी बहीण होती. म्हणजेच शांतेची मावशी होय.
शांतेचा विवाह ऋषि श्रृंग ऋषींबरोबर झाला होता, असे पौराणिक कथेमध्ये याचे वर्णन आहे.
Shree Ram यांची तिथी/जन्मतारीख कशी काढली जाते. :
आपल्या सर्वानाच माहिती आहे कि, वाल्मिकी नीं जे रामायण लिहिले आहे .
त्यामध्ये श्री राम यांच्या जन्माच्या वेळी आकाशातील नक्षत्र स्थिती ,विकला,तसेच ग्रहांच्या स्थिती, चंद्राची कला, यांची माहिती रामायण या ग्रंथात त्यांनी लिहून ठेवली आहे. या माहितीनुसार श्री रामाची जन्मतारीख चैत्र शुद्ध नवमी -पुनर्वसू नक्षत्र – मध्यान्ह -अशी आहे.
या माहितीनुसार इसवी सन पूर्व ५११४, १० जानेवारी अशी रामाची जन्मतारीख काढली जाते.
तसेच अनेक लोक अलग -अलग तिथी काढतात.
Shree Ram संबंधित आपण ह्या गोष्टी जाणून घेऊ शकता:
Shree Ram हे कोणत्याही जाती धर्माचे नाहीत, ते सर्व धर्मांसाठी एक आदर्श आहेत, त्यांना जाती धर्मात अडकवून आपण आपली संस्कृती नष्ट करत आहोत.
त्यांना बरेच लोक काल्पनिक समजतात,परंतु रामायणातील बहुतेक उदाहरणे आपल्या समोर आहेत, त्यांचा अभ्यास करावा.
रामसेतू,
अशोक वाटिका,
रावण फ़ॉल
रावण गुफा
आजही श्रीलंकेमध्ये खूप औषधी सापडतात, जिथे हनुमानाने लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता, या पर्वतात फक्त जीवनरक्षक औषधी वनस्पती आढळतात. त्याचे अवशेष श्रीलंकेमध्ये पाहायला मिळतात.
भगवान Shree Ram यांची अनेक देशांमध्ये पूजा केली जाते, ते लोक त्यांचे पूर्वज, वंशज हे रामाचे वंशज होते असे मानतात.
इंडोनेशिया : या देशांमध्ये बहुतेक लोकसंख्या मुस्लिम आहे . तसेच इंडोनेशियामध्ये भगवान राम यांची पूजा केली जाते ,तसेच ते आदरणीय स्थान आहे .
इंडोनेशियामध्ये राम कथा हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
बहुसंख्य मुस्लिम राम यांना आपले पूर्वज मानतात. मुस्लिम लोक स्वतःला श्रीरामाचे वंशज म्हणतात.
त्यांच्या हृदयामध्ये रामाबद्दल अतिशय श्रद्धा आहे ,तिथे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात ,कार्यक्रमातील कार्यक्रमांमध्ये रामलीला दाखवली जाते ,रामकथा सादर करणारे बहुतेक लोक मुस्लिम असतात.
प्रम्बानन Candi Prambanan मंदिर :जावानीज हे इंडोनेशियातील पर्यटन स्थळ आहे. यामध्ये 240 हिंदू मंदिरे आहेत आणि ती आपल्या रामायणातील सर्व प्रमुख घटनांचे वर्णन करण्यासाठी तीन मध्यवर्ती मंदिराच्या भिंतीवर कोरीव काम केलेले आढळते .
रामायण महाकाव्य 8 व्या किंवा 9व्या शतकात लिहिले असावे ,असे तेथील लोक मानतात , ते तेथील जुन्या जावानीज भाषेत लिहिलेले आढळते , ते काकविन रामायण म्हणून ओळखले जाते. रामायणाची एक इंडोनेशियन आवृत्ती बालिनी रामकावाका आहे. ही काकविन रामायणाची एक विकसित आवृत्ती मानली जाते.
इंडोनेशियामध्ये गरुड पुराणाला महत्वाचे स्थान आहे. . गरुड पक्षाची निवड राष्ट्रीय चिन्ह करण्यात आली.
इंडोनेशियातील चलनाला रुपयाह (Rupiah) म्हणतात. इंडोनेशियामध्ये १९६५साली श्रीगणेशाचा फोटो असलेली 20,000 रुपयाहची नोट छापली होती. त्यानंतर येथील अर्थव्यवव्स्था सुधारली असं तेथील लोक म्हणतात. परंतु आता ही नोट चलनात नाही. ३१ डिसेंबर २०१८ ला या नोटेवर बंदी आणण्यात आली होती.
थायलंड : रामायणाचा सांस्कृतिक प्रभाव थायलंडमध्ये तेथील असणाऱ्या राष्ट्रीय महाकाव्यापासून ते राजांच्या नावांपर्यंत आपल्याला दिसून येतो.
अयुथया : दुसरी अयोध्या
आयुथया या शब्दाचा मूळ अर्थ प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येमध्ये आहे.
भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथया हे दोन वेगवेगळ्या देशांमध्ये सुमारे 3,500 किलोमीटरने विभक्त झाले आपल्याला पाहायला मिळतात. , परंतु ह्या दोन राष्ट्रांना एकत्र बांधणारे भगवान राम आहेत. दोन्ही देशांतील लोकांसाठी प्रभू राम याना केंद्रस्थानी मानले जाते.
या देशाच्या प्रमुख ठिकाणी, शिव, पार्वती, गणेश आणि इंद्र यांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत,तेथील लोक त्यांची भक्ती करतात.
अयुथया यामध्ये हिंदू धर्माचा प्रभाव पाहायला मिळतो. आणि रामायणाच्या थाई आवृत्ती ‘रामाकिएन’ यांच्याशी संबंधित आहे.
रामायणाची सर्वात जुनी आवृत्ती वाल्मिकीची मानली जाते. भारत तसेच अनेक देशांमध्ये रामायणाच्या आवृत्त्या आपल्याला पाहायला मिळतात,
बर्मा, इंडोनेशिया, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स, मलेशिया, जपान, मंगोलिया, व्हिएतनाम आणि चीनमध्ये उपलब्ध आहेत. बहुतेक आवृत्त्या वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या अधारीत आवृत्या पाहायला मिळतात.
तसेच बहुतेक देश भगवानShree Ram यांना आपले वंशज तसेच पूर्वज मानतात.
निष्कर्ष :
आज रामनवमी आहे, भगवान Shree Ram यांचा जन्मदिवस . आज देशभरात आनंदाने रामनवमी साजरी केली जाते, विविध ठिकाणी सांस्कृतिक तसेच परंपरेने चालत आलेले कार्यक्रम पाहायला मिळतात.
तुम्हा सर्वाना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा .
धन्यवाद.