मित्रांनो, रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी Shitla Mata ची पूजा उत्तर भारतामध्ये मोठया प्रमाणात केली जाते. Shitla Mata चा हा सण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी अष्टमी या तिथीला साजरा केला जातो. यावर्षीची शितला पूजा हि १ एप्रिल 2024 रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे. होळीच्या आठ दिवसांनी Shitla Mataची पूजा केली जाते,हा सण उन्हाळ्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो .
बहुतेक स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुषेसाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करतात.
Shitla Mata बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया.
Shitla Mata हे भगवती दुर्गा मातेचे एक रूप आहे .शिळे अन्न अर्पण करून तिचा शितला सप्तमी आणि अष्टमीच्या एक दिवस आधी Shitla Mataला नैवैद्य साठी अनेक पदार्थ तयार केले जातात . अष्टमीच्या दिवशी हे शिळे झालेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखिवले जातात .
सप्तमी अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून, Shitla Mataची पूजा केली जाते. या उपवास करणाऱ्या जास्त करून महिला असतात, या दिवशी पहाटे उठून थंड पाण्याने पाण्याने अंघोळ केली जाते, या दिवशी तांदूळ, हळद ,हरभरा डाळ तसेच भांड्यात पाणी घेऊन एकत्र करून त्यांची पूजा केली जाते. तसेच हे शुद्ध पाणी घरातील सर्व कुटुंबातील लोकांना त्यांच्या डोळ्यांवरती हे पाणी लावले जाते, आणि घरामध्ये हि पाणी शिंपडले जाते ,त्यामुळे घर शुद्ध होते अशी प्रथा आहे.
शिळा नैवैद्य दाखविण्याची प्रथा:
सप्तमीच्या दिवशी या आदल्या रात्री हे जेवण बनवले जाते,अनेक पदार्थ, सुकामेवा ,मिठाई ,डाळ भात खिचडी ,गोड भात,ज्वारी किंवा बाजरीची राबडी ,असे नैवेद्य घराघरांमध्ये तयार केले जातात . दुसऱ्या दिवशी गॅस ,स्टेव्ह ,चुळ पेटवली जात नाही. Shitla Mateला जे बनवलेले नैवेद्य आहे तेच नैवेद्य खाल्ले जातात म्हणून त्याला शिळा नैवैद्य असे म्हणतात.
Shitla Mata हे वटवृक्षांमध्ये वास करते म्हणून वटवृक्षाची पूजाही केली जाते . घरामध्ये सुख शांती आणि रोगराईपासून मुक्ती व्हावी म्हणून चैत्र महिन्यात येणाऱ्या अष्टमीला शीतला देवीची पूजा करण्याची परंपरा आहे.
Shitla Mata ची पूजा स्त्रिया आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हे व्रत करतात सर्व प्रकारच्या उष्णतेपासून आपल्याला आराम मिळावा आणि उष्णतेपासून होणारे रोग आपल्याला होऊ नये म्हणून हा शितलादेवी चा उपवास करण्याची प्रथा पडलेली आहे .
काही लोकांना डोळ्यांचे आजार होतात,हे आजार दूर व्हावे, त्यांच्यापासून मुक्ती मिळावी यासाठी , या दिवशी थंड पाण्याने मातेची पूजा केली जाते, देवीला प्रसन्न करून निरोगी राहण्याचा आशीर्वाद मागितला जातो.
अनेक जण , अनेक विधी परंपरा पाळल्या जातात प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धती अलग आहेत.
,स्कंदपुरानातं मातेशी संबंधित एक कथा आहे ज्यामध्ये शीतला देवीचा जन्म ब्रह्मांजी पासून झाला असे सांगितले गेलेले आहे . शीतला माता हे शक्तीचे रूप मानले जाते आणि भगवान शंकराची ती अर्धांगिनी आहे असेही कथेमध्ये सांगितले गेलेले आहे .
पौराणिक कथेनुसार शीतला माता हातात डाळी घेऊन ,भगवान शिवाच्या घामाने बनलेल्या ज्वारासुरसह देवलोकातून विराट राजाच्या राज्यात राहण्यासाठी आली होती, राजा विराटने देवी शीतला मातेला आपल्या राज्यात राहू नये असे सांगितले होते.
शीतला मातेला सात बहिणी होत्या शितला ,दुर्गा, काली ,चंडी ,फुलामती ,बडी माता चमरिया,आणि भानमती या तिच्या सात बहिणी आहेत स्कंदपुरा देवीची मोठी बहीण परमेश्वरी आहे ज्याला बडी माता मोठी आई असे म्हटले जाते ,अनेक रोगांची देवी म्हणून शीतला मातेचे वर्णन केले गेलेले आहे
त्यांची मातीच्या शीतला माता ही गाढवावर स्वार होऊन ,कडुलिंबाची पानांच्या हार घातलेला आहे ,तसेच हातामध्ये झाडू ,घागरी ,सूप आणि वाडगा घेतलेला आहे.
वस्त्र लाल रंगाचे आहे जो धोक्याच्या आणि सदरचे प्रतीक मानले गेलेले आहे.
स्वच्छता ,आरोग्याची देवी म्हटले जाते .रुग्णाला सतत जळजळ होत असते. गाढवाच्या शेणाचा वास घेतल्याने फोडांचा त्रास कमी होतो. फोड झाडूने फोडले जातात , गाढवाचे शेण लावल्याने डाग नाहीसे होतात ,कडुलिंबाच्या पानांमुळे फोडाची गळती होत नाही ,आणि पाण्याचे थेंब मुळे थंडावा मिळतो,अनेक कथांमध्ये माता शीतला सोबत ज्वरासूर आहे त्याचा अर्थ तो तापाचा राक्षस आहे असे ,स्मॉल पॉक्स, म्हणजेच कांजण्या हा रोग आपल्या मुलांना होऊ नये,चेचक सारखा उष्णजन्य रोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि आपल्याला समृद्धी बनवण्यासाठी शीतला मातेची पूजा केली जाते .
शीतला मातेची पूजा उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते .
मातेचे एक प्रसिद्ध मंदिर जयपूर येथे चाकसू डोंगरी या ठिकाणी आहे ,हे राजा माधोसिंह यांनी बांधले आहे.
निष्कर्ष:
बरेच लोक आपल्या मुलांची रोगांपासून मुक्तता किंवा संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत करतात. ,शितलादेवी ही पार्वतीचा अवतार मानली जाते ,आणि Shitla Mata ही तेजस्वी आहे रोग दूर करण्याची तिच्यामध्ये शक्ती आहे, शीतला माता सर्दी,ताप ,उष्माघात किंवा आग ,कांजण्या(फोड) यासारख्या होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करते असे अनेकांची समजूत आहे . अनेक रोगापासून रक्षण व्हावे आणि संसर्ग रोगांपासून आपल्याला दूर ठेवणे हे एक पूजेचा उद्देश आहे.
धन्यवाद.