Sarpanch :सरकारने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय

महाराष्ट्र सरकारने  ग्रामविकास विभागांतंर्गत येणाऱ्या सहा मागण्यांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने राज्यातील Sarpanch व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय हि घेण्यात आला.या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. त्या अन्वये गावातील प्रशासकीय अधिकार Sarpancha कडे आले.

(Sarpanch )सरपंचांचे मानधन

  • सरपंच व उपसरपंच यांना मासिक मानधन मिळते याच्या संदर्भात अतिशय मोठी बातमी आहे सरपंच सह उपसरपंचांना मासिक मानधन वाढवून मिळावे यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती आणि आता ती मागणी मंजूर करण्यात आली आहे. 
  • उपसरपंचाचं मानधन 2 हजार रुपयांवरून आता ४ हजार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  •  ते २,००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत सरपंचना 6000 तर उपसरपंच यांना २,००० मासिक मानधन मिळणार आहे.  
  • 2000 ते 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत सरपंचांना 8000 तर उपसरपंचांना 3000 मासिक मानधन मिळणार आहे. 
  •  याबरोबरच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचाचं मानधन ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या ही गावच्या एकूण लोकसंख्येच्या आधारे ठरवण्यात येते. ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 तर जास्तीत जास्त 17 सदस्य असतात.

ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात. सार, म्हणजे प्रमुख, आणि पंच, म्हणजे पाच, गावातील ग्रामपंचायतीच्या पाच निर्णयकर्त्यांचा अर्थ प्रमुख .

गावातील मतदार गुप्त पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड करतात आणि मग या सदस्यांतून Sarpancha ची निवड केली जाते.

  1. सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो.
  2.  ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.
  3. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतात. . 
  4. छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. 
  1. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात.
  2. राज्यात नवीन ग्रामपंचायत स्थापन करताना लोकसंख्येचा विचार केला जातो.
  3.  सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन केले जाते. 
  4. ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात २८,८१३ ग्रामपंचायती आहेत.
sarpanch

(Sarpanch )सरपंचाची कामे काय असतात 

 

  1. ग्रामपंचायतीची सभा बोलावणे. 
  2. अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे. 
  3.  सभेत मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे.
  4. ग्रामपंचायतीचे अभिलेख सुरक्षित ठेवण्यासाठी नियंत्रण करणे
  5.  ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री करणे . 
  6. जमाखर्चाची विवरणपत्र व अंदाजपत्रक तयार करण्याची व्यवस्था करणे. 
  7. ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश या सरपंच व ग्रामसेवक संयुक्त जबाबदारी राहतील. 
  8. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 49 नुसार स्थापना करण्यात आलेल्या ग्रामसेवक समित्या त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून भूषवणे . 



कार्यकाल

 

सरपंचाचा कार्यकाल सामान्यतः ५ वर्षाचा असला, तरी गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून पदच्युत करता येते.





सरपंच पदाची निवड कशी होते?




  • देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला परंतु महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय रद्द करत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचांची निवड करण्याचं जाहीर केलं . 

 

  • समजा माझ्या गावातील ग्रामपंचायत अकरा सदस्यांची आहे.

 

  • ही निवडणूक शिवसेना, भाजप, कॉंग्रेस पक्षांच्या चिन्हांवर नाही लढवता येत. तर गावात पॅनल्स तयार केले जातात. सरपंच पद ज्यांना हवं असतं, ते सगळ्यात आधी आपल्या पॅनेलमध्ये कुणाला घ्यायचं म्हणजे कोणत्या वॉर्डात कुणाला उभं करायचं हे ठरवले जातात. .
  • याशिवाय एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो.

 

  •  दोन्ही पॅनेल्स आपापला गावाच्या विकासाचा जाहीरनामा म्हणजे आम्ही गावात कोणकोणती कामं करणार हे मतदारांना सांगतात आणि निवडणुकीला सामोरं जातात.

 

  • निकालानंतर दोन शक्यता प्रमुख दिसतात. एकतर स्पष्ट बहुमत आणि दुसरं म्हणजे जवळपास सारख्या प्रमाणात जागा जिंकण्याची शक्यता असते.एकूण सदस्य संख्या 11 पैकी एखाद्या पॅनलचे 7 सदस्य निवडून आल्यास बहुमत मिळतं.

 

  •  तेव्हा यामधील सक्षम सदस्यास सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून निवडण्यात येत. 

 

  • ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निवडणूक अधिकारी निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक बोलावतात. या बैठकीत सरपंचपदासाठीचा अर्ज भरावा लागतो. 

 

  • सरपंच पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास निवडणूक बिनविरोध होते.

 

  • पण, सरपंच पदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरला, तर अशावेळी हजर सदस्यांचे मतदान घ्यावं लागतं. त्यामुळे निवडणूक अधिकारी हजर सदस्यांचे  गुप्त चिठ्ठी पद्धतीनं मतदान घेतात आणि मतमोजणीनंतर जास्त मते मिळवणारा उमेदवार सरपंच म्हणून विजयी घोषित केला जातो.

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकच असणार 



 काही दिवसांपासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद एकच असावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर आता राज्यातील कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यास  मान्यता दिलेली आहे.








15 लाखापर्यंतची विकासकामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येणार. 



  • ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75 हजारपर्यंत आहे त्या ग्रामपंचायतींना 10 लाखापर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील. 

 

  • तर ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75 हजारांपेक्षा जास्त आहे, त्या ग्रामपंचायतींना 15 लाखापर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील. 

 

  • या निर्णयाची अंमलबजावणी करताना 10 लाखांवरील कामाकरिता ई-निविदा पध्दतीचा अवलंब करणे अनिवार्य असणार आहे.



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top