महिलांच्या स्टार्टअपसाठी 1 लाखा पासुन ते 25 लाखापर्यंतची मदत .कोणत्या महिलांना  घेता येणार लाभ ? पात्रता काय आहे, तर चला जाणून घेऊया?

महाराष्ट्र राज्यातील महिलांना उद्योग क्षेत्रात झेप घेण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसाय वाढ करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना शासनाने राबवण्यास सुरु केली  आहे. Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojanaला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते व महिलांना सक्षम होण्यास मदत करते. 

महिलांना आर्थिक अडचण आणि अपुरा निधी असल्यामुळे त्या अयशस्वी ठरतात.यासाठी महिलांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojane अंतर्गत आर्थिक मदत देण्यात येते.  

‘Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojane अंतर्गत , महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात मदत दिली जाईल. यासाठीं  त्यांना 1 लाखा पासुन ते 25 लाखापर्यंतची मदत देण्यात येईल. .

Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana उद्दिष्ट

  • महाराष्ट्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी खूप प्रयत्न करत आहे. 

 

  •  महाराष्ट्र राज्याची देशात सर्वाधिक महिला नवउद्योमी म्हणून ओळख निर्माण व्हावी या  उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महिलांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

  •  या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने 24 जून 2024 रोजी केली.

 

  • या योजनेअंतर्गत महिलांना 1 ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते. महिलांच्या स्टार्टप्सला निधी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला आर्थिक मदत मिळेल आणि त्यांच्या व्यवसायात वाढ होईल.

 

  • महिला स्टार्टअप ला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.  

 

  • नवीन व्यवसाय करणाऱ्या व नावीन्य पूर्ण संकल्पना असणाऱ्या उद्योगात वाढ करण्यासाठी एक वेळ आर्थिक सहाय्य करणे. 






पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना शासनाचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

images of text

योजनेचे नाव

महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

विभाग

कौशल्य रोजगार उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग

अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन

 

लाभार्थी

उद्योजक महिला

फायदे

महिलांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या स्टार्टअप साठी 1 ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत करणे

Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana फायदे:

  • या योजनेअंतर्गत महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणे.महिलांना स्टार्टअप साठी आर्थिक मदत करणे.  

 

  • Ahilyadevi Holkar Startup Yojana या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यास मदत होईल. 

 

  • Ahilyadevi Holkar Startup Yojana या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी 1 ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते.

 

  • महिला स्टार्टअप योजनेचे उद्दिष्ट राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टप्सना आर्थिक पाठबळ देणे तसेच महिलांच्या सक्षमी करण्यास हातभार लावणे.



अधिकृत संकेतस्थळ :https://www.msins.in/

Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojane ची पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची  रहिवासी असणे आवश्यक . 

 

  • स्टार्टअपची नोंदणी महाराष्ट्रात राज्यात असणे आवश्यक .

 

  • महिला लाभार्थीचे स्टार्टअप एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे असावे.

 

  • स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10लाख  ते 1 कोटी दरम्यान असणे आवश्यक 

 

  • स्टार्टअप डीपीआयआयटी आणि एमसीएमध्ये नोंदणी करत असणे आवश्यक आहे.

 

  • महिला लाभार्थीचा तिच्या कंपनीमध्ये किमान 51 टक्के हिस्सा असणे आवश्यक आहे.

 

  • महिला स्टार्टअप यांनी या आधी राज्य शासनाच्या इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. 



Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana ची कागदपत्रे

 

  • एमसीए प्रमाणपत्र(कंपनी नोंदणी प्रमाणपत्र )
  • DPIIT मान्यता प्रमाणपत्र
  • संस्थापकाचा फोटो
  • लेखापरीक्षण अहवाल
  • या आधी शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वायघोषणा प्रमाणपत्र
  • आधार कार्ड 



अर्ज प्रक्रिया :

 

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी  महाराष्ट्र शासनाच्या msins.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.  

 

  • अर्ज पूर्णतः निशुक्ल असेल. 



 

निवड प्रक्रिया 

 

  • रोजगार निर्माण करणाऱ्या स्टार्टअप ला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.  

 

  • निवड प्रक्रियेसाठी शासनाकडून विविध समित्या नेमण्यात येऊन या समित्याच्या मध्यमातून बँकिंग तसेच स्टार्टअप क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने निवड प्रक्रिया व निधी वितरण प्रक्रिया राबवण्यात येईल. 

निष्कर्ष :

 

महिलांच्या नेतृत्वात  असणाऱ्या नवीन स्टार्टअप ला त्यांच्या अवश्यकता नुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. तसेच त्यांच्या व्यवसायात त्यांना वृद्धी  करण्यास सहकार्य करणे   .  या योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढेल व त्यांच्या स्टार्टअप करण्याच्या दृष्टीत विकास होईल. 



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top