PM-JAY : देशातील ७० वर्षांवरील सर्व वृद्धांनाही आता घेता येणार मोफत उपचार .

वृद्धांनी निरोगी जीवन जगावे आणि स्वाभिमानाने जगावे. लोकांना उपचारासाठी घर, जमीन, दागिने विकावे लागतात.७० वर्षांवरील सर्व वृद्धांना या prime minister jan arogya yojana चा लाभ घेता येणार असून नागरिक गरीब असो किंवा श्रीमंत काहीही फरक पडत नाही सर्व जेष्टाना याचा लाभ घेता येणार. सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता देखील योजनेअंतर्गत पात्र आहेत.७० वर्षांवरील प्रत्येक वृद्धाला रुग्णालयात मोफत उपचार मिळणार तसेच  वृद्धांना आयुष्मान वय वंदना कार्ड देण्यात येणार आहे. 



आता देशातील ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना prime minister jan arogya योजनेंतर्गत मोफत उपचार करता येणार आहेत.  याचा फायदा 6 कोटी वृद्धांना होणार आहे.

यायोजने अंतर्गत त्यांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 nov 2024 धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती )आणि 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त  70 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या योजनेवर सरकारी तिजोरीतून 3,437 कोटी रुपये खर्च केले जातील.

Prime Minister Jan Arogya Yojana ची वैशिष्ट्ये

७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना prime minister jan arogya yojana योजनेंतर्गत मोफत उपचार घेता येणार आहेत. 

 वृद्ध लाभार्थ्यांना आयुष्मान वय वंदन कार्डचे उद्घाटन केले आता देशातील वृद्धांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार आहेत. 

ही सुविधा कोणत्याही उत्पन्न गटातील वृद्धांसाठी उपलब्ध असेल.

 याचा फायदा देशातील सुमारे  6 कोटींहून अधिक वृद्धांना होणार आहे.

 prime minister jan arogya yojana योजनेत याआधी दुर्बल उत्पन्न गटातील कुटुंबांचा समावेश होता.आता वृद्धांसाठी अशी कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही. 



PM-JAY ची प्रमुख वैशिष्ट्ये

  • PM-JAY ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून   सरकारद्वारे वित्तपुरवठा केली जाते.
  • तसेच देशातील   सार्वजनिक आणि खाजगी पॅनेलीकृत रुग्णालयांमध्ये दुय्यम आणि तृतीयक सेवेसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांचे संरक्षण देण्यात येते. 

 

  • PM-JAY लाभार्थींना सेवा केंद्रावर, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा सेवांसाठी कॅशलेस ऍक्सेस प्रदान करते.
  • यामध्ये दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीचे  3 दिवस आणि दवाखान्यात  दाखल झाल्यानंतर १५  दिवसांचे निदान आणि औषधे इत्यादी कारचंच त्यामध्ये समावेश केला जातो. 
  • कुटुंबाचा आकार , वय किंवा लिंग यावर कोणतेही निर्बंध नाहीत. 
  • यामध्ये पात्र लोक  भारतातील कोणत्याही पॅनेल केलेल्या सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात कॅशलेस उपचारांसाठी जाऊ शकतात. 
  • यामध्ये, देशभरातील पॅनेलीकृत रुग्णालयांमध्ये सर्व वृद्धांसाठी, दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचा खर्च सरकार घेणार. 
  • जे आधीच आयुष्मान भारत AB-prime minister jan arogya yojana योजनेचा लाभ घेत असून  त्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांची उपचार सुविधा मिळत आहे. ज्या लोकांनी अगोदर या योजनेचा लाभ घेतला नसला तरी ते आता घेऊ शकतात .
  • 35.6 कोटी आयुष्मान भारत कार्ड जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आयुष्मान भारत या विस्तारित योजनेअंतर्गत वृद्धांना स्वतंत्र आयुष्मान वय वंदना कार्ड दिले जाणार आहे. 
  • आयुष्मान वय वंदना कार्डची नोंदणी करण्यासाठी  लाभार्थींनी PM-JAY पोर्टलद्वारे नोंदणी करणे आणि त्यांचे कार्ड सक्रिय करण्यासाठी eKYC करणे आवश्यक आहे, ज्या लोकांकडे आधीपासून आयुष्मान कार्ड असले तरीही त्यांनी करावी.PMJAY पोर्टल किंवा आयुष्मान ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत PMJAY  pmjay.gov.in. वेबसाइटला भेट द्यापायरी 2: तुमचे नाव, राज्य, वय आणि कुटुंब तपशील प्रविष्ट करा. तसेच, उत्पन्नाची माहिती जोडा. पायरी 3: क्लिक करा वर ‘सबमिट’ बटनावर क्लीक करा. 

 

भाषणात PM Modi नी केलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

  •  गरोदर महिला आणि बालकांशी संबंधित लसीकरण सेवा डिजिटल करण्यात येणार आल्यामुळे लाभार्थ्यांच्या डिजिटल नोंदी ठेवण्यास आणि त्यांच्या ओळखीशी संबंधित डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित राहण्यास  मदत होईल.गर्भवती महिलांच्या लसीकरणाची वेळ सांगणारे U-WIN पोर्टल सुरू केले.
  • देशातील ४ कोटी गरीब लोकांनी या योजनेचा लाभ घेतला असून ४ कोटी गरीब लोकांनि  वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेतले.
  • देशात १४ हजारांहून अधिक पंतप्रधान जनऔषधी केंद्रे आहेत.
  • मिशन इंद्रधनुष प्राणघातक आजारांपासून स्टेंट आणि गुडघा बदलण्याची साधने स्वस्त केली आहेत.  
  •  मोफत डायलिसिस योजनेतून लाखो कोटी रुपयांचा खर्चही वाचला आहे. प्राणघातक आजार रोखण्यासाठी मिशन इंद्रधनुष सुरू आहे. 
  • गरोदर महिलांचे जीव वाचवले जात आहेत, नवजात बालकांना वाचवले जात आहे. गंभीर आजारांना बळी पडण्यापासूनही त्यांचे संरक्षण होते.
  • ई-संजीवनी योजनेअंतर्गत 30 कोटी लोकांनी मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून ऑनलाइन सल्ला घेतलेला आहे.
  •  हवामान बदल आणि मानवी आरोग्यासाठी राज्य विशिष्ट कृती योजना सुरू केली.
  • मोदींनी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) मध्ये ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान वय वंदन कार्ड देण्यात आले. 
  • दिल्ली आणि बंगालमधील ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही , त्यांची सेवा करता येणार नाही म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांची माफी मागितली. कारण- दिल्ली आणि बंगाल सरकार या योजनेत सामील होत नाहीत. 
  • मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, बिहारसह 18 राज्यांमध्ये आरोग्य प्रकल्पांची सुरुवात केली.  तसेच  ऋषिकेश एम्समधून देशातील पहिली एअर ॲम्ब्युलन्स संजीवनीही लॉन्च केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top