गरीब आणि मध्यमवर्गी कुटुंबामध्ये मुलांना चांगले शिक्षण मिळवून देणे ही पालकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट असते आणि प्रत्येकालाच आपल्या मुलांना उत्तम शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पाठवायचे असते पण प्रत्येकाची तितकी आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे आई-वडिलांना त्यांची स्वप्न आहेत ती पूर्ण करता येत नाहीत अश्या पालकांना आता काळजी करण्याची गरज नाही गरिबीमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणात खंड पडू नये, यासाठीच्या PM Vidya Laxmi Yojanaला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.केंद्र सरकारने PM Vidya Laxmi Yojana शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे .
देशातील विद्यार्थ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, यामुळे गुणवंत विद्याथ्यर्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गरीब कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे .
आणि हे कर्ज कोणत्याही प्रकारची हमी देण्याची आता आपल्याला गरज नाही किंवा कोणत्याही तारण ठेवण्याची आता गरज भासणार नाही.
देशातील उच्च दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार पीएम विद्या लक्ष्मी योजना अंतर्गत विशेष कर्ज दिले जाणार आहे . देशातील उच्च शिक्षण 8६०उच्च शिक्षण संस्थांचा त्यामध्ये समावेश करण्यात.
2024 -25 ते 2030- 31 वर्षासाठी सरकारने यासाठी 3600 कोटी रुपयांची तरदूत केलेली आहे .
Table Of Content |
काय आहे PM Vidya Laxmi Yojana ? |
PM Vidya Laxmi Yojana चे फायदे |
PM Vidya Laxmi Yojanaपात्रता |
PM Vidya Laxmi Yojana कागदपत्रे |
निष्कर्ष |
काय आहे PM Vidya Laxmi Yojana?
- सर्व पात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये (HEIs) उच्च शिक्षण घेण्यास आणि मान्यताप्राप्त HEI मध्ये तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेता येईल.
- . देशातील 860 प्रमुख उच्च शिक्षण केंद्रांमधील 22 लाखांहून अधिक विद्यार्थी या योजनेच्या कक्षेत येतील.
- पीएम विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्याही सिक्युरिटीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कसे मिळेल, विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 75 टक्के क्रेडिट गॅरंटी प्रदान करेल.
- 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांनाही 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज अनुदान दिले जाईल.
- 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेले आणि इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज सवलतीच्या योजनेंतर्गत लाभांसाठी अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांना स्थगिती कालावधीत 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 3 टक्के व्याज सवलत दिली जाईल. कर्जामध्ये संपूर्ण शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्च समाविष्ट असतील.
- 4.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना आधीच संपूर्ण व्याज अनुदान मिळत आहे.
- बँका आणि वित्तीय संस्थांना ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) वॉलेटद्वारे परतफेड केली जाईल.
PM Vidya Laxmi Yojana चे फायदे
- विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज दिले जाते, याअंतर्गत सरकारकडून कोणत्याही तारखेशिवाय कर्ज दिले जाते.
- या योजनेअंतर्गत तुम्ही 4 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केल्यास हे कर्ज तुम्हाला दिले जाईल. ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा जमा करण्याची आवश्यकता नाही.
- 4 लाख ते 6.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेत असाल तर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीकडून हमी द्यावी लागेल.
अधिकृत वेबसाइट vidyalakshmi.co.in
याच्याशी निगडित Youtube Video पाहण्यासाठी येथे करा.
PM Vidya Laxmi Yojanaपात्रता
- देशातील विद्यार्थ्यांनाच लाभ दिला जाणार आहे.
- विद्यार्थ्याला ज्या संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे, ती संस्था NIRF रँकिंगमध्ये अखिल भारतीय 100 आणि राज्य 200 मध्ये असावी आणि ती सरकारी संस्था असावी.
PM Vidya Laxmi Yojana कागदपत्रे
- ओळखपत्र
- हायस्कूल आणि इंटरमिजिएट मार्कशीटची छायाप्रत
- ज्या संस्थेत कोणी अभ्यास करणार आहे त्या संस्थेचे प्रवेश पत्र आणि अभ्यासक्रम आणि खर्च संबंधित माहिती.
निष्कर्ष
हि योजना खूप चांगली आहे.उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही सुरक्षिततेशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, ज्याच्या मदतीने विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतात, त्याचा लाभ मिळवू शकतात. ऑनलाइन अर्ज कसा करू शकता.