भारतातील उन्हाळात तीव्र तापमान असते, थंड पदार्थाचे सेवन केल्याने उष्णतेवर मात करण्यास, तसेच शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करण्यास मदत करतात. वाढत्या तापमानासह शरीराला अधिक आरामदायक वाटेल. कोल्ड ड्रिंक्स आणि फ्रोझन डेझर्ट थंड वाटत असले तरी ते शरीरातील उष्णता कमी होतेच असे नाही. त्याऐवजी, ते आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात.
मित्रांनो आपण आज खरबूजा (Muskmelon)च्या सेवनाने काय फायदे होतात, ते आज आपण या लेखात माहिती पाहणार आहोत.
खरबूज (MuskMelon)माहिती.
खरबूज ला लैटिन भाषेत कुकुमिस मेलो (Cucumis melo Linn.) म्हणतात.
मराठी – खरबूजा (खरबुजा), चिबुण्डा (चिबुंदा), चिबुड असे म्हटले जाते. काकडी, खरबूज, आणि चिबुड ही एकाच प्रजातीची फळे आहेत. ह्या फळांचे सेवन फक्त ताजी असताना केले जाते.
भारतात खरबूज Musk Melon ह्या फळाची लागवड नद्यांच्या काठावर तसेच उष्ण आणि कोरड्या भागात करतात. . काळी वालुकामय जमीन खरबूज लागवडीसाठी चांगली मानली जाते. खरबुजाच्या बिया शेतात बेड तयार करून पेरल्याहि जातात. त्याची वेल जमिनीतच पसरते. भारतात बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशात खरबूजाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
खरबुजा (Muskmelon)मध्ये ९० टक्के पाणी असते, शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी भरपूर तसेच शरीराला हायड्रेट करत नाहीत तर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर सारख्या प्रचंड पोषक घटकांसह शरीराला चालना देण्याचे काम करतात. त्यामुळे उन्हाळ्यात खरबुजाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.
भारतातील विविध राज्यांमध्ये खरबूजाच्या अनेक उपप्रजाती आढळतात, परंतु त्यांच्या गुणांमध्ये विशेष असा फरक जाणवत नाही. खरबूज हे विविध रंगांमध्ये आपल्याला मिळतात.
खरबुजां (Muskmelon)च्या बियांमध्ये ४० ते ५० टक्के तेल आढळते. खरबूजाच सलाड म्हणून वापर केला जातो. . कच्च्या फळांचा तसेच पानांचा वापर भाजी म्हणूनही केला जातो.
खरबुजाचे (Muskmelon) फायदे :
खरबुजा (Muskmelon)मध्ये जास्त साखर आणि कॅलरीज नसतात, वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे, खरबूजाचे सेवन केल्याने अनेक रोग बरे होतात.
खरबुजांच्या (Muskmelon)बियां सेवन केल्याने डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात.
स्कर्वीसारख्या रोगावर खरबूजसे सेवन केल्याने शरीराचे रक्षण होण्यास मदत होते.
घशाची जळजळ:घशाच्या जळजळीवर उपचार म्हणून वापर केला जातो. खरबूजा (Muskmelon)च्या बियांचा काढा बनवून ,गुळण्या करू शकता.
सुंदर चेहऱ्यासाठी : खरबुजाच्या बिया आणि साल बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने डाग, ठिपके दूर होतात. तसेच चेहरा मुलायम होतो .
छातीत जळजळ : होत असल्यास खरबुजांच्या बियांचे व काकडीच्या बिया बारीक करून त्यामध्ये काळी मिरी आणि ५ ग्रॅम साखर एकत्र करून ते मिश्रण गाळून पियाल्याने आराम मिळतो.
पोटातील गॅसदुखी :लहान मुलांना पोटदुखी हि वारंवार होत असते,पोट गच्च झाल्यासारखे होते. त्यावर खरबुजा (Muskmelon)च्या बिया बारीक वाटून ते कोमट करून मुलांच्या पोटावर लावले जाते. पोटातील गॅस कमी तसेच दुखण्यापासून आराम मिळतो.
अतिसार: अतिसाराच्या अवस्थेत, जेव्हा वारंवार परत येणे, कफ आणि दुर्गंधीयुक्त मल असतो, तेव्हा सुंठ, काळी मिरी आणि जिरे पावडर आणि वर सेंधा मीठ टाकून खरबुजाचे फळ खाल्ले जाते.
किडनी मुतखडा : खरबुजा (Muskmelon)च्या बियांचे सेवन केल्याने लघवी करताना जळजळ होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते, मुतखडा वितळण्याची शक्ती खरबुजा मध्ये असते, पाच ते दहा ग्राम खरबुजाच्या बिया घेऊन ते पाण्यात मिसळून त्याचे सेवन केल्याने किडनीच्या मुतखड्यावर रामबाण इलाज ठरतो तसेच किडनीतुन मुतखडा ही बाहेर पडण्यास मदत होते तसेच मूत्रपिंड साफ होते .
शारीरिक कमजोरी : खरबुजांच्या बियांचे सेवन केल्याने शारीरिक कमजोरी दूर होण्यास मदत होते . केसांवर,हाडांवर आणि नखांसाठी देखील खरबुजाचे सेवन उपयोगी आहे कारण त्यामध्ये प्रथिनांचा मुबलक प्रमाणात साठा आहे .
ऍसिडिटी समस्यासाठी खरबुजाचा रस आणि त्यामध्ये थोडी साखर टाकून नियमित सेवन केल्याने पित्ताचा प्रभाव कमी होतो तसेच पित्त होण्यापासून आराम मिळतो.
कर्करोगावर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे एका संशोधनानुसार खरबूजा मध्ये अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म सापडले जातात,त्यामुळे कर्करोगाची लक्षणे कमी होण्यास मदत होते .
तणावमुक्ती : वात दोष वाढणे हे तणावाचे मुख्य कारण मानले जाते ,खरबुजा मध्ये वात शामक गुणधर्म असल्याने तणाव कमी होण्यास मदत होते . खरबुजा (Muskmelon)चे सेवन आपल्या डोळ्यांसाठी तसेच तणावापासून मुक्ती होण्यासाठी फायदेशीर ठरते. डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही अडचणी असतील तर खरबुराजे सेवन फायदेशीर मानले जाते .
निद्रानाश : वात जास्त वाढल्याने मज्जातंतूंमध्ये विकार तयार होतात त्यामुळे आपल्याला नींद्रानाश होतो खरबुजमध्ये वातशामक गुणधर्म असल्याने निद्रानाश दूर करण्यास मदत होते.
सोरायसिस : या त्वचेच्या रोग हा एक वेदनादायक आजार आहे, त्यामुळे शरीराला कुठल्याही भागात खाज सुटते स्त्री असो किंवा पुरुष कोणत्याही वयात सोरायसिस आपल्याला होऊ शकतो, खरबुजा (Muskmelon)चे फळ वाटून लावल्यावर सोरायसिस रोगावर आराम मिळतो.
उष्माघात : उन्हाळ्यात उष्माघाताची समस्या होते, उष्माघात झाल्यास खरबुजा (Muskmelon)च्या बिया बारीक करून डोक्यावर व संपूर्ण शरीरावर लावल्या जातात, यामुळे होणारी जळजळ होते, तसेच शरीराला थंडावा मिळण्यास आराम मिळतो.
खरबूज खाण्याच्या संबंधित फायदे ,सावधानगिरी आणि दुष्परिणाम (Precaution and Side Effects of Muskmelon Fruits)
जेवणानंतर लगेचच खरबूजाचे सेवन करणे फायदेशीर ठरले जाते. रिकाम्या पोटी किंवा जेवणाआधी खरबूज खाल्ल्याने पित्त दोष ,आम्लपित्त होण्याची शक्यता असते.
खरबूज (Muskmelon) हा खूप थंड असल्यामुळे , ज्या लोकांना तीव्र सर्दी आणि खोकला आहे , तसेच पचनशक्ती कमजोर असलेल्यानी खरबूजाचे सेवन करू नये.
खरबूज खाल्ल्यानंतर लगेचच पाणी आणि दूध पिऊ नये,लगेच पाणी प्यायल्याने कॉलराचा धोका होऊ शकतो. योग्य प्रमाणात खाल्ल्यावर एक ग्लास साखरेचा पाक प्यायल्याने पचनक्रियेसाठी फायदा होण्यास मदत होते.
गर्भवती महिलांकरिता :
गर्भवती महिलेने खरबुजाचे सेवन करताना खूप सावधानाने खाल्ले पाहिजे ,कारण खरबूज (Muskmelon)च्या बाहेरील आवरणात, सालीवर लिस्टेरिया बॅक्टेरिया आढळला जातो, त्यामुळे काही डॉक्टर खरबूज खाऊ नये असे म्हणतात, गर्भवती महिलेने खरबूजाची साल काढून तिचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.
(Muskmelon) मुळे रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवते,गर्भधारणेदरम्यान खरबूज खाल्ले तर रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत आणि रक्त पातळ राहण्यास मदत होते.
खरबूजमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी जास्त भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ॲनिमिया या रोगापासून पासून दूर ठेवण्यास मदत होते.
गर्भधारणेदरम्यान पेटकेपासून आराम, पचन , प्रसूतीनंतर लवकर बरे होणे यासारखे फायदे खरबूजापासून होतात,गरोदरपणात खरबूज खाणे चांगले असले तरी,लिस्टेरिया बॅक्टेरिया गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरू शकतो. , त्यामुळे खरबूज (Muskmelon)पूर्णपणे धुवून त्याची साल काढून खावे. खरबुजाची ॲलर्जी असेल तर त्याचे सेवन करू नये .
निष्कर्ष:
(Muskmelon) या फळामध्ये कमी कॅलरी आणि उच्च पोषक तत्वे ,प्रोटीन ,कॅल्शियम ,आयरन आणि फायबर असते. तसेच भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतात, म्हणून याला सुपरफूड म्हंटले जाते.
आपण या लेखात खरबूज बद्दल माहिती पहिली. माहिती आवडल्यास तुम्ही comment करू शकता.
खरबुजाचे भरपूर फायदे आहेत , आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असा फळ आहे. उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला अवतीभोवती खरबूज पाहायला मिळते, तर मित्रांनो , तुम्ही खरबुजाचे सेवन करा आणि निरोगी राहा.
धन्यवाद….