मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधी फक्त 1 रुपयाच जमा होणार. १,५०० रु. नव्हे,जाणून घ्या कारण ?

राज्यात Mukhyamantri mazi Ladki Bahin yojne साठी मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले आहेत. दरमाहा १५००रुपये महिलांना दिले जाणार आहे. सुरवातीला त्यांच्या खात्यात केवळ १ रुपया पाठवला जाणार आहे.

राज्य सरकारच्या Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana ची घोषणा करण्यात आली. अर्ज दाखल करण्यासाठी गावा-खेड्यांसह शहरांतही मोठ्या प्रमाणावर महिला गर्दी करू लागल्या आहेत. . तसेच  रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा केले जाणार आहेत.  अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत  प्रत्येकी एक रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojane च्या खात्यात सुरवातीला १ रुपया का ?

  • Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana  च्या माध्यमातून महिलांना  दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत.

  

  • मोठ्या प्रमाणात महिलांनी नोंदणी केली आहे.  
  • मात्र, १५०० रुपयांऐवजी केवळ १ रुपयाचं  महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. 
  • महिला व बालविकास विभागाकडे आतापर्यंत एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत.
  • पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात येणार आहे.
  •  तांत्रिक तपासणीसाठी सरकार येत्या काही दिवसांत Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana लाभार्थ्यांच्या खात्यात १ रुपया हस्तांतरित करून योजनेसाठी तांत्रिक तपासणी करत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे .
  • जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त तांत्रिक पडताळणी प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे.
  •  ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होणार आहे. 
  • महिलांनी कोणत्याही गैरसमज करून घेऊ नका. गोंधळ घालू नका आणि गैरसमजांना बळी पडू नका, आदिती तटकरे यांनी वक्तव  केले आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana काय आहे हि योजना

  • राज्यात या योजनेसाठी १.२ कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून 18 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमाहा आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे .

 

  • विवाहित, विधवा, निराधार आणि परित्यक्त महिला ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे .

 

  • ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी आहेत.  

 

  • त्यांना दरमहा १५०० दिले जाणार आहेत .

 

  • प्रति कुटुंब एक महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

 

  • १५०० रु.  लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करणार येणार आहेत.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojanaयोजनेचा विस्तार

  • महाराष्ट्र सरकारने Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana च्या लाभार्थींचा समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा विस्तार केला, असून आता  ५३.२ लाखांवरून अंदाजे १.५ नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

  •  या साठी  अर्थसंकल्पात ८६० कोटी रुपयांवरून वार्षिक ३,२०० कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

 

  • या योजनेत आता उज्ज्वला Yojana आणि Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana च्या दोन्ही लाभार्थ्यांची तरतूद केली आहे. 



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top