Mukhyamantri  ladki bahin Yojna ‘सातारा पॅटर्न’ लाडक्या बहिणींची घरी जाऊन नोंदणी,Nari Shakti दूत  App वरून फॉर्म कसा भरायचा?

Mukhyamantri  ladki bahin Yojna जाहीर झाली. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी सेतू केंद्रावर एकच गर्दी केली. अनेकांना अर्ज भरण्यात अडचणी आल्या. महिलांना होणारा त्रास आणि तहसील कार्यालयावरील होणारी गर्दी थांबवण्यासाठी राज्य सरकारने हा  निर्णय घेतला आहे. Mukhyamantri  ladki bahin Yojna घराघरात पोहोचवण्यासाठी आता Satara Patarn राबवण्याचा निर्णय सरकारने  घेतला आहे.

राज्य सरकारनेMukhyamantri  ladki bahin Yojna सुरू केल्यापासून राज्यभरातील तहसील कार्यालयांवर प्रचंड गर्दी झाली आहे. तर अनेकांना कागदपत्राची पुर्तता करण्यात आली नाही,तसेच सर्व्हर डाऊन होण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे दिवसभर रांगा लावून सर्व्हर डाऊन झाल्याने घरी जावं लागत ,महीलांची अनेक ठिकणी फरफट झाल्याचे समोर आले.  महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  अर्ज भरून घेण्यासाठी वेगवेगळ्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात महिलांची लूट होत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जाण्याची आणि रांगा लावण्याची गरज पडणार नाहीये.

राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची  माहिती दिली आहे.

 

  •  अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी आणि आरोग्य सेविका यांची पथके तयार करण्यात आली आहेत. 

 

  •  पथकाकडे ५0 कुटुंबांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 

  • ही पथके त्या कुटुंबांच्या घरी जातील.घरोघरी जाऊन शक्ती अॅपवर अर्ज भरून घेणार आहेत .

 

  • जी कागदपत्र उपलब्ध नसतील. त्याची माहिती  तलाठ्याला  देण्यात येईल. . तलाठी, तो दाखला पुढच्या दोन दिवसात उपलब्ध करून देईल. अशा प्रकारे पुर्ण अर्ज भरला जाणार आहे.

 

  • त्यामुळे महिलांना कुठेही जावे लागणार नाही.

महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी ,गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी या  योजनेची घोषणा केली. सरकार हि योजना राबवणार आहे. १ जुलै 2024 पासून  आपण हा अर्ज करू शकतो.Mukhyamantri  ladki bahin yojane  योजनेमार्फत  प्रत्येक महिन्याला १५०० रुपये लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा होणार .

Mukhyamantri  ladki bahin योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 👍

  • 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत वयवर्ष 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकतात.
  •  31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. 
  • महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास ते स्वीकारण्यात येईल. 
  • 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता  नाही.
  • 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. 
  • लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी 21 ते 65 वर्ष अशी करण्यात आली आहे.
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील  पुरुषाबरोबर विवाह केला असेल, त्या स्त्रियांनी  पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र स्वीकारण्यात येईल. 
  •  कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात आला आहे.
  •  मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनानं केला  आहे. 

Mukhyamantri  ladki bahin अर्ज कसा करायचा योजनेचा लाभ घेण्यासाठी  काय करावे ? 

  • योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अँप  नारीशक्ती दूत हे अ‍ॅप आपल्याला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा.किंवा  सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल. 
  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला/मतदान ओळखपत्र  यापैकी कोणतेही एक. 
  • बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड केशरी /पिवळे. 
  • सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र भरा . 

Mukhyamantri ladki bahin Yojne चा Nari Shakti दूत App वरून फॉर्म कसा भरायचा?

  • नारीशक्ती दूत हे अ‍ॅप आपल्याला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा. 
  • ओपन  केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘नारीशक्ती दूत ह्या APP मध्ये आपले स्वागत आहे.’ असा मेसेज तुम्हाला  दिसेल . 
  • तीन स्लाइड पुढे जाऊन Done या बटणावर क्लिक करा. 
  • तुमचा मोबाइल नंबर टाका. त्यानंतर I Accept या बटणावर क्लिक करा. 
  • पुढे लॉग इन या बटणावर क्लिक करा.
  • अ‍ॅपमध्ये तुमचं प्रोफाइल तयार करा 
  • तुमचं पूर्ण नाव, इमेल-आयडी ही माहिती भरा.
  •  तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
  • तुमचं प्रोफाइल अपडेट करा. त्यानंतर योजना या पर्यायावर क्लिक करा. 
  • माझी लाडकी बहीण या योजनेचं हमीपत्र डाऊनलोड करा. 
  • त्यानंतर मुख्य पेजवर या. जिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बटणा वर क्लिक करा. 
  • महिलेचे नाव टाकायचं त्यानंतर महिलेच्या वडील किंवा पतीचं नाव टाकायचं आहे.
  • जन्मतारीख निवडा. 
  • पुढे जिल्हा, गाव/शहर हे निवडा.  तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था जी असेल ती निवडा.   पिनकोड आणि तुमचा पत्ता ही माहिती भरा.  मोबाइल नंबरही टाका. 
  • तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याबाबत विचारणा करण्यात येईल. मिळत असेल तर हो यावर क्लिक करा. नसेल मिळत तर नाही यावर क्लिक करा. 
  • तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरा. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे पूर्ण नाव आहे ते भरा. तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडही भरा. 
  • कागदपत्रं अपलोड करा. आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, 
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी पिवळे/केशरी रेशनकार्ड, 
  • अर्जदाराचे हमीपत्र, 
  • बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करा.  त्यानंतर अर्जदाराचा फोटो जोडावा लागेल. 
  • त्यानंतर Accept हमीपत्र डिसक्लेमर या बॉक्समध्ये टीक करा.  माहिती सादर करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज सब्मिट करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top