महाराष्ट्रासह जगभरातील मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनेMarathi Bhashe ला ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.सुमारे २५०० वर्षे प्राचीन आणि समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी तब्बल अकरा वर्षे वाट पहावी लागली.
प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं Marathi Bhasha जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपये विविध माध्यमातून अनुदान स्वरूपात खर्च केले जातात.
भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाने केली होती. अनेकदा मागणनी करूनही याबाबत निर्णय झाला नव्हता. या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची बातमी दिली आहे. या
“नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. Marathi Bhashe ला अभिजात भाषेचा दर्जाMarathi Abhijat Bhasha देण्यात आला आहे.त्याचबरोबर पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे.
अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करतात यामुळे हा दर्जा Marathi Bhasheला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.
राज्य सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती देखील नेमली होती. या समितीने ५०० पानांचा अहवाल केंद्राकडे सादर केला होता. ज्यात मराठी भाषा वैशिष्ट्यपूर्ण असून ती अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करते याचे पुरावे देण्यात आले होते
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही 25 सप्टेंबर 2014 रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आपलीMarathi Bhasha ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता.
“अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा पंतप्रधानांनी म्हटले.”
मराठीच्या बोलीभाषा किती?
भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर,बागलाणी, नंदुरबारी, खालल्यांगी, वरल्यांगी, ताप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.
Marathi Bhasheचा शोधकर्ता कोण :मराठी भाषेचा उगम महाराष्ट्री प्राकृत भाषेतून झाला आहे. मराठी ही खूप जुनी भाषा आहे, तिचे पहिले पुस्तक सातवाहन राजवटीत हलाने लिहिलेले “गाथा सप्तसती” 2000 वर्षांपूर्वी लिहिले गेले.
मराठीची लिपी :देवनागरी ही आज मराठी लिहिण्यासाठी वापरली जाणारी अधिकृत लिपी आहे,
जगभरात किती मराठी भाषिक आहेत: जगभरात 80 दशलक्षाहून अधिक लोक मराठी बोलतात, प्रामुख्याने पश्चिम भारतीय राज्यात, जिथे ती अधिकृत भाषा आहे. गोवा आणि कर्नाटक, मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये राहणारे लक्षणीय मराठी भाषिक समुदाय सापडतात .
भारतात मराठी लोकसंख्या किती आहे :८.3 कोटी भाषिकांसह मराठी ही भारतातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, जी भारताच्या लोकसंख्येच्या 6.86% आहे. मराठी ही सुद्धा इंडो-आर्यन भाषा आहे. मराठीत जवळपास ४२ प्रकारच्या बोली आहेत. हे महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागात बोलले जाते.
मराठी भाषेचे( Marathi Bhasha) जनक कोण आहे?
हे वाक्य शके ९०५ मधील असून ‘श्री चामुण्डेराये करविले’ असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे.
मराठी भाषा दिन कधी साजरा करण्यात येतो.
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.
मराठी ही महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या भारतातील १८ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ही एक इंडो-आर्यन भाषा आहे परंतु द्रविडीयन कुटुंबातील कन्नड आणि तेलुगुच्या आसपास असल्यामुळे काही द्रविडीयन घटकांचा समावेश आहे .
मराठी ही राजभाषा :१ मे १९६६ पासून राज्यातील सर्व शासकीय कामकाजात मराठी राजभाषा कायदा लागू करण्यात आला. अमराठी भाषिक सरकारी अधिकाऱ्यांसाठी इंट्रोडक्शन टू राजभाषा हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले .
भारत सरकारने भाषांना अभिजात भाषा हा नवी श्रेणी काढण्याचा निर्णय 12 ऑक्टोबर 2004 ला घेण्यात आला. त्यात तामिळ भाषेला पहिल्यांदा हा दर्जा देण्यात आला.
भाषा अभिजात होण्यासाठी काही नियम आहेत:
- कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
- भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना असला’पाहिजे.
- या भाषेत प्राचीन साहित्य हवं.
- दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
- अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील :
- मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना खूप मदत येईल.
- प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
- अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.
- मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं.
- भारतातील सर्व ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते.
- प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं
- राज्यातील १२ हजार ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
- मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील.तसेच सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. पुरातन साहित्याचं डिजिटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.