आपल्या भारतामध्ये वर्षातून एक शैक्षणिक वर्ष असतं ते जुलै- ऑगस्ट मध्ये सुरू होते,आणि एप्रिल-मे संपते.जे विद्यार्थी आजारी आहेत किंवा ज्यांचा कोर्सचा निकाल लागला नाही, किंवा उशिरा लागलेला आहे तो किंवा पुन्हा परीक्षा द्यावी लागलेली आहे .त्यांच ते वर्ष वाया जातं . मग अश्या विद्यार्थाना नवीन वर्ष कधी चालू होते त्याची वाट पाहावी लागते.
अश्या विद्यार्थ्यांसाठी UCG कडून महत्वाची update आली आहे. त्यांना आता वर्षातून दोनदा प्रवेश घेण्याची संधी भेटणार आहे.
2024-25 शैक्षणिक सत्रापासून जुलै-ऑगस्ट आणि जानेवारी-फेब्रुवारी असे दोन प्रवेश चक्र असणार आहेत
जे विद्यार्थी आहेत त्यांना जुलै – ऑगस्ट मध्ये ऍडमिशन घेता येत नाही व त्यांचे जे पूर्ण वर्ष आहे ते वाया जातो. मग त्या विद्यार्थ्यांना जर त्याच वर्षात जानेवारी – फेब्रुवारी New Admission Open करून त्यांना जर आपण कोर्स किंवा जे काही एज्युकेशन ते घेतात ,ते जर त्यांना घेता आले त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्याला मिळेल .
विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येईल .
परदेशी विद्यापीठांमध्ये वर्षातून दोनदा शिक्षण देण्याची परवानगीने असते अशी खूप सारी महाविद्यालय आहेत ज्यांच्या शैक्षणिक वर्ष दोनदा चालू असतात म्हणजे त्यांची दोनदा संधी विद्यार्थी घेऊ शकतात .
कोणा- कोणाला ह्या गोष्टींचा फायदा घेता येईल?
- विद्यापीठांनाही या गोष्टीचा फायदा मिळणार आहे. म्हणजे जसं की शिक्षक असतील,लायब्ररी असतील ह्याच्या पायाभूत सुविधा आहे त्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त त्यांना याचा वापर करता येईल.
- सोबतच भारतातील विद्यापीठांना जागतिक सुसंगत प्रवेश प्रक्रिया पार पाडणे शक्य होईल. विद्यार्थानाही वर्षातून दोनदा ऍडमिशन घेता येईल ,याचा फायदा ‘विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठालाही होऊ शकेल.
- आता आपली जी विद्यापीठ आहे त्यांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी आपल्याला घेता येणार आहे .
नेमकं फायदा कोणाला मिळणार
- विद्यापीठ अनुदान आयोगाने UCG आपला शैक्षणिक दर्जा कायम राखण्यासाठी मार्गदर्शक तत्व ठरवण्याचे काम आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम करते हे आयोग करते.
- आयोगाने असे ठरवले आहे की ,विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा Admission घेता येणार आहे.
- जे UCG चे अध्यक्ष जगदीश कुमार आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे .सर्व युनिव्हर्सिटी आणि जे कॉलेज आहेत त्यांना दोनदा ऍडमिशन देऊन विध्यार्थाना तसेच विद्यापीठानेही फायदा मिळणार आहे.
- विद्यापीठांसाठी द्विवार्षिक प्रवेश देणे बंधनकारक असणार नाही आणि ज्या उच्च शिक्षण संस्था आवश्यक पायाभूत सुविधा संधीचा उपयोग करू शकणार आहेत .
विद्यापीठांनाही करावे लागेल हे काम
- शैक्षणिक परिषद (Acadamic Councile )ही विद्यापीठाची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे आणि ती विद्यापीठातील शिक्षण, शिक्षण आणि परीक्षा यांचे दर्जा राखण्यासाठी जबाबदार आहे. विविध शैक्षणिक शाळांना सर्व शैक्षणिक बाबींवर सल्ला देण्याचा अधिकार Acadamic Councile चा आहे.तसेच एक्झिक्युटिव्ह कौन्सिलिंग आहे त्यांना आपल्या याचा स्वीकार करून त्यांच्या धोरणामध्ये काही बदल करावे लागणार आहेत.
- उच्च शिक्षण संस्थाना त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची असेल, किंवा क्षेत्रांमध्ये नवीन कार्यक्रम ऑफर करायचे असतील तर विद्यार्थ्यांना सक्षम होण्यासाठी वर्षातून दोनदा प्रवेश देण्यास उच्च शिक्षण संस्थाना हे करणे आवश्यक आहे.
- जुलै आणि जानेवारीमध्ये ऍडमिशन open होणार आहे हा जो उपक्रम आहे,त्यांचा जो अभ्यास करण्याचा जो पॅटर्न आहे तो कसा काम करेल त्यांची आखणी विद्यापीठांना करावी लागणार आहे.
- विद्यापीठांमध्ये किंवा महाविद्यापीठांमध्ये कॉलेजमध्ये जे शिक्षक आहेत त्यांनाही वर्षातून दोनदा आणि हा सर्व गोष्टींसाठी उपलब्धता असली पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार केला पाहिजे . ह्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते त्यांना वर्षातून दोनदा प्रवेश देणे हे विद्यापीठांसाठी बंदनकारक नाहीये आणि याबाबत अजून निर्णय आहे तो विद्यापीठ आहे किंवा जे महाविद्यापिठांना घ्यायचा आहे.