आपल्याला मेडिकल इमर्जन्सी कधी पडू शकते आपल्याला कधीही डॉक्टरांचे गरज लागू शकते. त्यासाठी आपल्याकडे पैसे लागतात, आपल्याकडे जर मेडिकल फॅसिलिटी असेल किंवा मेडिकल इन्शुरन्स असेल तर आपल्याला मेडिकल इन्शुरन्स भेटतो ,पण मेडिकल इन्शुरन्स आपल्याकडे नसेल तर आपण काय केलं पाहिजे . खचुन न जाता आपल्याला ज्या गव्हर्नमेंटचे योजना असतात त्या आपण योजनांचा फायदा घेऊन आपण त्याचा लाभ घेऊ शकतो . आपल्याला ह्याचा फायदा होऊ शकतो त्यापैकी एक योजना म्हणजे Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna .
Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna GR.
आपल्या आरोग्य संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे जे Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एकत्रित)योजनेचे संलगणीकरण करून दोन्ही योजना राज्यांमध्ये राबवण्याचे निर्णय आहे तो 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna जी योजना आहे . त्यासाठी 2024-25 या वित्तीय वर्षासाठी इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे जे आपल्याला जी लोक गरीब आहेत किंवा मध्यमवर्गीय लोक आहेत त्या लोकांना या योजनेच्या जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन योजना राबवत असते आणि हा योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो तर आपण या योजनेची लाभार्थी कोण आहे ते आता पाहणार आहोत.
जो माहे एप्रिलच्या आपले निर्णयानुसार एप्रिल 2024 ते जून 2024 या तीन महिन्याच्या कालावधीसाठी अदा करण्यात आलेलया हप्त्याच्या फरकाची रक्कम रु.४९,६७,५८०००/-(रुपये एकोणपन्नास कोटी सदुसष्ट्ट लक्ष अठ्ठावन्न हजार फक्त ) इतकी रक्कम देण्यात आलेली आहे आणि ही जी रक्कम आहे तिला मंजुरी देण्यात आलेली आहे
रु.४९,६७,५८०००/-/Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna ची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत होत असल्यामुळे योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाचा एक एप्रिल 2024 ते 30 जून 2024 तीन महिन्याच्या कालावधीतील विमा हप्ता सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प केलेला तरतुदीनुसार विमा हप्त्यांची जी फरकाची रक्कम आहे ती ४९,६७,५८०००/-
१ एप्रिल २०२० पासून सुधारित एकत्रित Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबवली जात आहे. United India Insurance कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत एकत्रित योजनेतील गट-अ लाभार्थी कुटुंबांना ९९६ उपचारांकरिता प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षाला रु.१,५०,००० रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविण्याचे काम करते. . गट-अ लाभार्थी कुटुंबांच्या वतीने राज्य आरोग्य हमी सोसायटी प्रत्येक वर्षाला प्रत्येक कुटुंबाचे प्रति पॉलिसी वर्ष रु.797/- विमा रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये विमा कंपनीस देते. Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna साठी महाराष्ट्र शासनाकडून संपुर्णत: निधी प्राप्त होत आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची केंद्र व राज्य शासन यामध्ये 60:40 या प्रमाणात विभागणी करण्यात आलेली आहे.
Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna नेसाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल?
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर या वेबसाइटचे होम पेज उघडेल.
- होम पेजवर तुम्हाला नवीन नोंदणीचा पर्याय वर क्लिक करा.
- यानंतर स्क्रीनवर एक नवीन फॉर्म दिसेल.
- स्वतः संबंधित सर्व माहिती भरा आणि सर्व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- सबमिट बटणावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी होईल, त्यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार घेता येऊ शकतो.
Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया
- तुम्हाला महात्मा जोतोबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- आता तुमच्या समोर home page ओपन होईल.
- home page वर तुम्हाला login पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा user IDआणि password.टाका.
- लॉगिन पर्यायावर click करा.
- तुमची पोर्टलवर Login होईल.
Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojnane अंतर्गत कोणत्या रुग्णालयाचा समावेश असतो.:
- योजनेंतर्गत शासकीय व खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांचा समावेश असतो.
- शासकीय रुग्णालयांमध्ये सार्वजनिक महानगरपालिका व नगरपालिका ,आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, यांच्या अखत्यारीतील रुग्णालयांचा समावेश केलेला आहे.
- मल्टी-स्पेशियलिटी खाजगी रुग्णालयांसाठी किमान 30 खाट व अतिदक्षता विभाग असे निकष तर एकल विशेष खाजगी रुग्णालयांसाठी 10 खाटा व इतर बाबी लागू आहेत.
- मान्यता प्राप्त रुग्णालयांची अधिकतम संख्या 1000 इतकी असून सद्यस्थितीत 999 रुग्णालये मान्यता प्राप्त त्यापैकी 282 शासकीय रुग्णालये व 717 खाजगी रूग्णालये आहेत.
Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna – MJPJAY रुग्णालय यादी कशी पाहावी?
- अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
- या home page वर तुम्हाला PMJAY चा विभाग दिसेल. तुम्हाला या विभागातील यादीतील यादीतील रुग्णालयांचा पर्याय दिसेल.
- तुम्हाला या पर्यायावर click करावे लागेल.
- ऑप्शनवर click केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर open होईल. या पृष्ठावर तुम्हाला पॅनेल केलेल्या रुग्णालयांची यादी पाहण्यासाठी एक form दिसेल.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती निवडावी लागेल जसे की राज्य, जिल्हा, रुग्णालयाचा प्रकार, विशेष रुग्णालयाचे नाव इ. यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल.
- आणि मग तुम्हाला search button.वर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही पॅनेल केलेल्या रुग्णालयांची यादी पाहायला मिळेल.
फेज 2 हेल्थ कार्ड प्रिंट करण्याची प्रक्रिया:
- सर्वप्रथम तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- तुमच्या समोर home page ओपन दिसेल.
- home page वर तुम्हाला health card लिंकवरclick करा.
- तुमच्यासमोर महा ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र आणि पोस्ट ऑफिस असे तीन पर्याय दिसतील.
- या लिंक्समधून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लिंक निवडा.
- तुमच्यासमोर हेल्थ कार्डची संपूर्ण यादी दिसेल.
जिल्हानिहाय रुग्णालय पाहण्याची प्रक्रिया कशी कराल?
- सर्वप्रथम तुम्हाला महात्मा जोतोबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- तुमच्या समोर home page ओपन होईल.
- तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलच्या पर्यायावर click करा.
- आता तुम्हाला जिल्हानिहाय रुग्णालयाच्या पर्यायावर click करावे लागेल.
- तुमच्यासमोर जिल्ह्यांची यादी उघडेल.
- तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या लिंकवर click करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्या computer screen वर असेल.
Mahatma Jyotirao phule Jan Aarogya Yojna पात्रतेचे निकष:
- गट अ सर्व पात्र लाभार्थ्यांची ओळख पिवळी, केशरी ,अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व त्यासोबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने निश्चित केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक आवश्यक असते.
- गट ब महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त 14 जिल्हयांतील शेतकऱ्यांची पात्रता लाभार्थ्यांचे तसेच कुटुंब प्रमुखाचे नाव असलेल्या 7/12 उताऱ्यासह पांढऱ्या शिधापत्रिका.
- शेतकरी कुटुंबांतील सदस्य हा शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र व लाभार्थ्याचे फोटो ओळखपत्र आवश्यक असते. नजीकच्या महसुल अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिल्यास योजनेचा लाभ देण्यात येतो.
- गट क महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त 14 जिल्हयांतील शेतकऱ्यांची पात्रता लाभार्थ्यांचे / कुटुंब प्रमुखाचे नाव असलेल्या तसेच 7/12 उताऱ्यासह शुभ्र शिधापत्रिका किंवा नजीकच्या महसुल अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिल्यास योजनेचा लाभ देण्यात येतो.
- शेतकरी कुटुंबांतील सदस्य हा शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र व ओळखपत्र असणे आवश्यक.
MJPJAY योजनेअंतर्गत किती आर्थिक सहाय्य मिळते?
- MJPJAY योजना २०२४ लाभार्थीच्या हॉस्पिटलायझेशनशी पॉलिसी संबंधित सर्व खर्च पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ₹ 1,50,000/- पर्यंत कव्हरेज मिळते.
- मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी, ही मर्यादा प्रत्येक पॉलिसी वर्षासाठी प्रत्येक कुटुंबासाठी रु. 2,50,000/- इतकी वाढवण्यात आलेली आहे.
निष्कर्ष:
बहुतेक लोकानी या योजनेचा फायदा घ्यावा. खचुन न जाता आपल्याला ज्या गव्हर्नमेंटचे योजना असतात त्यांचा आपण लाभ घेऊ शकतो.
धन्यवाद .