एलआयसीची ‘विमा सखी’ Vima Sakhi Yojana महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळेल आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल.
Vima Sakhi Yojane द्वारे महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होईल.
Vima Sakhi Yojana काय आहे?
- Vima Sakhi Yojana ही एलआयसीची एक योजना आहे.
- यासाठी महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- याकरिता तीन वर्षे महिलांना स्टायपेंड मिळणार आहे. तसेच पात्र महिलांना एकूण तीन वर्षे ट्रेनिंग दिलं जाईल.
- या कालावधीत महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील.
- पदवीधर महिलांनाही विकास अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे.
Vima Sakhi Yojane च्या महत्त्वाच्या अटी:
- Vima Sakhi Yojana ही योजना विशेषतः महिलांसाठी आहे.
- महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमीत कमी इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक .
- महिलेचे वय कमीत कमी १8 आणि जास्तीत जास्त ७० वर्षे असावे.
- ज्यामध्ये त्यांना तीन वर्षांसाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि त्या एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील.
- पदवीधर महिलांना एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते.
- दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील मानधन मिळवण्यासाठी, पहिल्या वर्षी विकलेल्या पॉलिसींपैकी किमान ६५% पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.
- एलआयसी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य नसावा.
महिलांना Vima Sakhi Yojne अंतर्गत मानधन/ किती पैसे दिले जातील?
- पहिले वर्ष: प्रति महिना ₹७,०००
- दुसरे वर्ष: प्रति महिना ₹६,०००
- तिसरे वर्ष: प्रति महिना ₹५,०००
Vima Sakhi Yojana ची अर्ज करण्याची प्रक्रिया:
- एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https:/licindia.in
- ‘विमा सखी योजना’ लिंकवर क्लिक करा.
- नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आणि पत्ता भरा.
- कॅप्चा कोड एंटर करून अर्ज सबमिट करा.
- आवश्यक कागदपत्रे जसे की १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा अपलोड करा.