“महाराष्ट्र राज्यात ,माझा लाडका शेतकरी योजना ” सरकार ची मोठी घोषणा . हा फायदा कोणाला मिळणार ?चला जाणून घेऊया ?

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली,अन्नपूर्णा योजनेची मोठी चर्चा सुरू आहे.  तसेच तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सुरू केली आहे त्याचप्रमाणे आता Ladka Shetkari Yojana Maharashtra 2024 लाडका शेतकरी योजना सुरू केली आहे . 

 Ladka Shetkari Yojana Maharashtra 2024  याची सुरुवात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा २,००० रुपयांचा ४ था  हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे तर मित्रांनो या  Ladka Shetkari Yojana Maharashtra 2024  योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल तसेच लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे.या लेखात आपण पाहणार आहोत. 

Ladka Shetkari Yojana Maharashtra 2024

  • शेतकरी सन्मान योजना केंद्राची आहे सहा हजार रुपये वर्षाला मिळतात. महाराष्ट्र  राज्याने 6000  आणखीन टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली तसेच आता शेतकऱ्याला 12000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला .
  • किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे 36000 कोटी रुपये आपण दिलेल्या 44 हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.  
  • तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आवश्यकता  आहे, असे त्यांनी व्यक्त केले. सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांच कल्याण झालं पाहिजे हा सरकारचा हेतू आहे.  
  •  बीड जिल्ह्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण योजनेनंतर ते लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्री  यांनी केली.
ladka shetkari yojna

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

  • “महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं होय. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे.
  • तसेच  शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव  मिळाला पाहिजे. 
  • शेतकऱ्यांचंही कल्याण होणे गरजेचे आहे. 
  •  सोयाबीनला 5 हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही 5 हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
  • ही मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे.
  •  शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिल घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवले आहे.
  • शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एचपीच्या पंपाचं वीज बिलही माफ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • आजची शेतीची जमीन  बंजर आहे त्याला देखील एकरी 50 हजार वर्षाला  देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणूनच शेतकऱ्यांना  कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही . कांद्याची नासाडी होऊ नये,तसेच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत आहे. महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे कांद्याची बँक सुरू करण्याचे काम सुरु केले आहे

 

कृषि क्षेत्रातील नवीन बदलांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी, तसेच राज्यातील कृषि क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त ठरणार  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .आज पासून लाडकी बहीण होती लाडका भाऊ होता आता Ladka Shetkari Yojana Maharashtra रावबणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top