घरबसल्या आपल्या जमिनीचा नकाशा काढा फक्त ५ मिनिटांत. आपल्या जमिनीचा नकाशा (Land Map )कसा माहिती करायचा ?

आपल्याला जमिनीचा नकाशा माहीत असणे आवश्यक आहे कारण जर आपल्या शेतातून रस्ता काढायचा असेल किंवा जर आपल्या शेताला लागून कोणाचे शेत आहे हे जर आपल्याला माहिती करायचे असेल तर आपल्याला आपल्या शेताचा नकाशा ( Land Map )माहिती असणे आवश्यक आहे . 

 जमिनीचा  नकाशा(Land Map) सोबत आपण या लेखांमध्ये गावचा नकाशा कसा काढायचा आणि महाराष्ट्राची ई -प्रणाली का आहे त्याच्याबद्दल ही माहिती पाहणार आहोत.


land map

Land Map वैशिष्ट्ये :

  • महसूल विभागाने आपल्याला ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिलेले आहे आपण डिजिटल भूनक्षा आपण चेक करू शकतो आणि डाउनलोड करून शकतो हे आपल्याला सुविधा महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. 
  • आपल्या शेताचा किंवा आपल्या जमिनीचा नकाशा मोबाईल द्वारे किंवा आपल्या कंप्यूटर कसे काढता येईल.  
  • सुरुवातीला हा सरकारी कार्यालायात  जाऊन हा काढावा लागत असे,पण आता सरकारने आपल्यालाही सुविधा करून दिलेली आहे. 
  • आपल्याला घरातूनच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा भू नकाशा डाऊनलोड करून आपण त्याची प्रिंटही काढू शकतो आणि आपण वाचू शकतो . 
  • त्यासाठी सुरुवातीला आपण भूनक्षाचे ऑनलाईन उपलब्ध सेवा जी महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे हे शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या जमिनीच्या मालकांसाठी खूप चांगले आहे. 
  •  महाराष्ट्रातील निवासींसाठी व महाराष्ट्र राज्य भूलेख महाभुमी इथून उपलब्ध करून दिलेली आहे बऱ्याच लोकांना   ती माहिती नाही . 
  • आपण आज या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहोत. 

Land map कसा काढायचा?

  • सुरुवातीला आपल्याला Google  वर जाऊन mahabhumi.gov.in वर जाऊन ओपन करायचे .
  •  तुम्ही महाभूमी महानक्षा टाईप करू शकता नंतर त्याच्यानंतर ही जी साईट ओपन झाल्यानंतर mahabhuminaksha map with land records वर आपल्याला क्लिक करायचं . 
  • क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशी एक विंडो दिसेल सुरुवातीला आपल्याला State  दिसेल नंतर categaryदिसेल .
  •  तुम्ही जर Rural  मध्ये असाल  तर (ग्रामीणमध्ये) सिलेक्ट करा .
  •  शहरी विभागातील असाल तर तुम्ही Urban सिलेक्ट करा. 
  • तुम्हाला तुमचा तिथे jilha  टाकायचा आहे. 
  •  जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं taluka टाकायचे आहे. 
  • तालुका नंतर तुमच्या तुम्हाला Village टाकायचं आहे. 
  • गाव नंतर तुमचं Village Map आपल्याला इथे Plot No टाकायचे आहे. 
  • जर आपल्याला वैयक्तिक जमिनीचा नकाशा पाहायचा असेल ते ते पहा. 
  • पूर्ण गावाचा नकाशा पाहायचे असेल तर तू पूर्ण पाहू शकता .
  • तुम्हाला  स्वतःचा प्लॉट नंबर तुमची जमीन आणि तिच्या जमिनीला लागत असलेले जे प्लॉट नंबर  कुणाचे आहेत, जमीन कोणाची आहे आणि कुणाच्या नावाची आहे हे जर पाहायचे असेल तर तुमच्याकडे तुमचा प्लॉट नंबर  माहिती असणे गरजेचे आहे .
  •  ते तुम्ही प्लॉट नंबर येथे सिलेक्ट करून टाका आता इथे तुम्हाला इथे प्लॉट नंबर दिसेल, त्याच्या बाजूला कोणाकोणाच्या जमिनी आहेत कुणाकुणाच्या जमिनीला लागून तुमच्या जमिनीच्या हद्दी आहेत  ते आपल्याला इथे दिसतं .

निष्कर्ष:

आपल्याला जमिनीचा नकाशा माहीत असणे आवश्यक आहे ह्या लेखात आपन ही माहिती पहिली आहे कारण जर आपल्या शेतातून रस्ता काढायचा असेल किंवा जर आपल्या शेताला लागून कोणाचे शेत आहे हे जर आपल्याला माहिती करायचे असेल तर आपल्याला आपल्या शेताचा नकाशा माहिती असणे आवश्यक आहे.

धन्यवाद।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top