श्री हनुमान जी हा भगवान शंकरांचा ११ अवतार मानला जातो. भगवान श्रीरामाचे ते परम भक्त आहेत.
आईचे नाव अंजना आणि त्यांचे वडील वानर राज केसरी हे आहेत. Hanuman ला केशरी नंदन तसेच अंजना पुत्र असे म्हटले जाते . नामकरण सोहळ्यात त्यांचे नाव मारुती (मरुत म्हणजे हवा होय.) असे ठेवण्यात आले.
आपल्याला माहिती आहे की ,परम भक्त Hanuman चा जन्मोत्सव आहे कारण Hanuman हा चिरंजीवी आहे. चिरंजीव म्हणजे कधीही मृत्यू न येणारा आपल्या या पृथ्वी लोकांवरती असे सात चिरंजीव राहतात,कोणी त्यांच्या चांगल्या कर्माने तर कोणी त्यांच्या वाईट कर्माने.
जसे की आपल्याला माहिती आहे कि,परमभक्त हनुमान.
(परशुराम, महाबली, महाऋषी वेदव्यास ,विभीषण ,कृपाचार्य ,अश्वधामा)
अंजना पुत्र जन्माची कहाणी:
दशरथ राजा ,आयोध्या मध्ये आपल्या तिन्ही राण्यांसोबत माता कौशल्या,सुमित्रा आणि कैकयी सोबत यज्ञ करत होते . ते हा यज्ञ पुत्र प्राप्तीसाठी करत होते,आणि हा यज्ञ संपन्न झाल्यावर गुरुदेव ने त्यांना एक खिरीची वाटी दिली आणि त्या तिन्ही राणीला खायला सांगितली होती. या तिन्ही राणीनी खीर थोडी थोडी वाटून घेतली, तिथे एक गरुड (चील )आली आणि त्याने कैकयीच्या खिरीतुन थोडेसे आपल्या चोचीमध्ये घेऊन निघाली. जिथे अंजना माता तपस्या करत होती ,तिथे चील च्या चोचीतून खिरीचा भाग माता अंजनाच्या हातामध्ये पडला. हे सर्व भगवान शंकर आणि वायुदेवाच्या इच्छेनुसार होत होते . अंजनाने हा भगवान शंकरचा आशीर्वाद म्हणून प्रसाद ग्रहण केला. अशाप्रकारे हनुमानजी चा जन्म झाला .
भगवान हनुमंताला अनेक देवांनी प्रसन्न होऊन अनेक आशीर्वाद तसेच अनेक नावे दिलेली आहेत ते आपण पाहूया:
मारुतीला खूप भूक लागली होती. सूर्योदय झाल्यानंतर मारुतीने जेव्हा धरतीवरून सूर्याला पाहिले असता ,सूर्याला फळ असे समजले आणि तो ग्रहण करायचे ठरवले व त्या दिशेने त्यांनी उडान घेतली . हे इंद्रदेवाने पाहिले आणि इंद्रदेवाने त्यांना परत जाण्यास सांगितले पण मारुतीच्या पुढे इंद्र देवाचे काहीहि चालले नाही, क्रोधात येऊन इंद्रदेवाने वज्रप्रहार केला. या प्रहाराचा मार एवढा होता की,मारुती बेशुद्ध झाले ,आणि ते त्यांचे शरीर पृथ्वीकडे येऊ लागले. जेव्हा हे वायू देवाला समजले तेव्हा वायू देव हे खूप क्रोधीत झाले त्यांनी इंद्रदेवाने हा केलेला प्रहार आवडला नाही. (तसेच मारुतीचा वेळेआधी मृत्यू होऊ शकत नाही.)आणि त्यांनी आपल्या पूर्ण सृष्टीतून प्रत्येक जीवातून (मरूत कणांना) त्यांचा वायु परत घेण्याचे ठरवले आणि त्यांनी तसे केलीही . त्यांनी प्रत्येक जीवातून ,धरतीतुन,आकाशातून,आपला वायू परत बोलवला., परंतु वायू परत येत असताना खूप सारे नुकसान झाले. देव लोकातील देवांनी येऊन वायदेवाची समजूत काढली आणि हनुमानला जीवनदान दिले. हनुमानला वायू पुत्र तसेच पवनपुत्र म्हटले जाते.
अनेक देवांनी मारुतीला ला वरदान दिले .
- शंकराने मारुतीला चिरंजीवी होण्याचा ,माझ्या अस्त्र,शस्त्र पासून स्वरक्षण मिळेल.तसेच मारुतीला भगवान शंकराने संकटमोचन हे नाव दिले.
- ब्रम्हदेवाने इच्छाधारी तसेच कोणताही श्राप नाही लागणार ,आनंत’ या ब्रह्मांडापर्यंत तू जिवंत राहशील असा आशीर्वाद दिला.कोणताही रूप धारण करण्याचे असे वरदान दिले. तसेच महाबली असे नाव दिले.
- विश्वकर्मा ( अस्त्र /शास्त्र चा निर्माता) ने मारुतीला माझ्या व्दारे बनवलेले कोणतेही अस्त्र,शस्त्र प्ररास्त करू शकणार नाहीत.असे वरदान दिले.
- कालदेवाने मारुतीला कोणत्याही प्रकारची व्याधी,कोणताही रोग न होण्याचे तसेच स्वतःच्या इच्छेनुसार आपली मुत्यू चा वरण करू शकशील ,इच्छामुत्यूचा वरदान दिले.
- कुबेराने मारुतीला कोणत्याहि क्षणी विचलित न होण्याचे ,तसेच कोणत्याही असुरी शक्ती पराजय करू शकणार नाहीत असे वरदान दिले.
- अग्निदेवाने मारुतीला कोणतेही प्रचंड अग्नी असली तरीही,तिची ज्वाला नुकसान पोहचवू शकणार नाही. असे वरदान दिले.
- सूर्यदेवाने तेजस्वी,अद्वितीय विद्वान,तसेच त्यांच्या तेज्यातलं १०० भाग वरदान म्हणून दिला.
- वरून देवाने नदी,जल,समुद्र किंवा कोणतेहि जलतत्व नुकसान पोहचवू शकणार नाहीत ,असे वरदान दिले.
- हनुमानला चिरंजीवी किंवा अमर राहण्याचा वरदान माता सीताने हि दिलेला आहे . जेव्हा रामाच्या आज्ञेनुसार हनुमान हा माता सीताच्या शोधात निघाले, तेव्हा माता सीता अशोक वाटिका मध्ये होती तसेच माता सीताला हनुमान ने सांगितले की मला प्रभू श्रीराम ने तुमची भेट घेण्यासाठी पाठवले आहे आणि ओळख पटवून दिली असता त्यांनी एक अंगुठी दाखवली . तेव्हा माता सीतेने त्यांना अमर राहण्याचा वरदान दिला तसेच दुसऱ्या कहाणी नुसार जेव्हा रामायणातील सर्व लोकांना मोक्ष प्राप्ती झाली असता, तेव्हा हनुमान ने देवांच्या समोर एक विनंती केली की ,जोपर्यंत या पृथ्वी लोकांवर रामाची जो कोणी पूजा करील ,रामाचं नाव घेतले जाईल, तोपर्यंत मला या पृथ्वी लोकांवर राहण्याची संमती द्यावी असे हनुमान ने देवांना सांगितले.
- रामाची जो कोणी मनोभावी पूजा करेल , जप करेल तिथे हनुमानाचा सदैव वास राहील.
पंचमुखी हनुमान (Hanuman)
- पंचमुखी हनुमान हे भगवान हनुमानाच्या सर्वोच्च स्वरूपांपैकी एक आहे, या रूपात त्यांना पाच मुखे आहेत, म्हणूनच या रूपाला पंचमुखी (पाचमुखी) असे म्हणतात, हे रूप अतिशय शक्तिशाली आणि उत्साही आहे, या रूपातील भगवान Hanuman ची पाच मुखे आहेत. Hanuman,भगवान वराह, भगवान नरसिंह, भगवान गरुड आणि भगवान हयग्रीव आहेत.
- बहुतेकांना भगवान विष्णूचे दहा अवतार किंवा अवतार माहित आहेत. पण, रामायणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वानरदेवता भगवान हनुमानाचे नऊ अवतार होते.
- नमन, स्मरण, कीर्तनम्, याचम, अर्पणम, हे पाच मुखे म्हणजे या पाच प्रकारांच्या उपासनेचे चित्रण आहे
- पंचमुखी Hanuman,रामायणाच्या अनुसार पाच दिशा पंधरा डोळे आणि दहा हात प्रत्येक हातामध्ये कुऱ्हाड अनेक अस्त्र तसेच त्याच्या पायाखाली चिरडले जाणारे राक्षस पंचमुखी Hanuman ज्याचे वर्णन आपण पाहिले आहे. रामायणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. वरील स्वरूपांपैकी पंचमुखी Hanuman अधिक शक्तिशाली आहे ,कारण त्याच्या शक्तींबरोबरच त्याच्याकडे भगवान हयग्रीव, वराह, नरसिंह आणि गरुड या शक्ती आहेत . या रूपानेच त्यांनी राम आणि लक्ष्मण यांचावर आलेल्या संकटातून वाचवले.
- अहिरावण हा रावणाचा भाऊ होता तो भयंकर असा राक्षस होता, तो माता भवानीचा भक्त होता तसेच तंत्र विद्यामध्ये तो पारंगत होता. त्याला माता दुर्गाने असे वरदान दिले होते की, जो कोणी हे पाच दिशेला पाच दिवे एका क्षणी विजवेल त्या क्षणी तुझा मृत्यू होईल तोपर्यंत तुला कोणीही मारू शकणार नाही .
- जेव्हा अहिरावणाने भगवान रामाचे व लक्षुमणाचे अपहरण केले होते ,तसेच तो त्यांना पातळ लोकात घेऊन गेला, रामाची मदत करण्यासाठी हनुमानाने अहिरावणासोबत युद्ध केले,परंतु अहिरावण प्रत्येक क्षणी त्यांना पराजित करत होता.तो हनुमानला प्रत्येक क्षणी हरवत असे, अहिरावणाने पाच दिशेला पाच दिवे पेटून ठेवले होते ,हे हनुमानला समजतात हनुमानने पंचमुखी रूप धारण केले.
- असे म्हटले जाते की त्याचे प्रत्येक पाच चेहरे भिन्न मुख्य दिशा दर्शवतात : पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि वर. असे म्हटले आहे की भगवान हनुमानाचा वानर चेहरा, जो त्याच्या शरीराच्या पूर्वेला आढळतो, त्यात हजार सूर्याचे तेज आहे. उत्तर दिशेला वराहमुख दक्षिण दिशेला नरसिंह पश्चिम दिशेला गरुड आकाशाचे दिशेला हयग्रीव आणि पूर्व दिशेला हनुमान असे रूप हनुमान ने धारण करून पाचही दिवे एक साथ वीजवले व अहिरावनाचा वध केला.
- हनुमानच्या या रूपाची पूजा आपणास सिद्धी तसेच तंत्रविद्यासाठी केली जाते व खूप मंदिरामध्ये पंचमुखी हनुमानाची पूजा तांत्रिक पद्धतीने केले जाते
- भारतात असेच भारतामध्ये पंचमुखीची मंदिरे खूप आहेत यामध्ये १४ दिवस १४ रात्री हनुमानाच्या मंत्राचा जप केला जातो.
परमभक्त हनुमानाबद्दल या गोष्टी आपल्याला माहित आहेत काय?
- रामायणाच्या सुंदर कांडनुसार हनुमान श्रीरामाच्या आज्ञेनुसार लंका जाण्यास निघाले असता ,सुरसा अचानकपणे समुद्रमार्गे हनुमान च्या समोर पर्वतासारखी आली आणि ती म्हटली जर तुला समुद्र पार करायचा असेल तर तुला माझ्या तोंडातून जावे लागेल माझ्या मुखातून जावे लागेल. सुरसाला असा वरदान होते की जो कोणी समुद्र पार करेल त्यांनी सुरसाच्या मुखातून जावे लागते हनुमान शेवटी हनुमान ने छोट्या मुंगीचा आकार केला आणि सुरसाला काही समजताच ते सुरसाच्या तोंडातून आत मुखात जाऊन ते कानातून बाहेर आले होते .अनेक कहानीनुसार सुरसा ही प्रजापती दक्ष ची मुलगी होती तसेच ती एक नागमाता ही होती ,देव लोकातील देवतांनी हनुमान ची परीक्षा घेण्यासाठी राक्षसी सुरसा ला सांगितले होते.
- परम भक्त संकट मोचन महाबळशाली Hanuman वेळेच्या अंतपर्यंत म्हणजे धरतीवर धर्माची रक्षा करणार आहेत हनुमान वानर राज केसरी तसेच अंजनाचे पुत्र होते सर्वांनाच माहित आहे,पण देवी अंजना ही देव लोकातील अप्सरा होती तिचे नाव पुंजीकस्थीला असे होते एकदा ऋषी दुर्वासा इंद्रासोबत बोलत असताना पुंजीकस्थीला सारखी त्यांच्यासमोर जात असल्याकारणाने दुर्वासा ऋषींचे लक्ष विचलित झाले दुर्वासा ऋषींना प्रचंड राग आला आणि त्यांनी तिला श्राप दिला की तुझा जन्म धरती लोकात होऊन तू एका वानर जातीमध्ये तुझा जन्म होईल . वानरूपात देवी अंजनाचा विवाह केसरी नंदन यांच्याशी झाला होता तिने खूप तपस्या केली आणि वायदेवाच्या आशीर्वादाने देवी अंजनेला Hanuman पुत्र प्राप्त झाला.
- हनुमान ला चिरंजीवी राहण्याचा संवर्धन मिळाला आहे या वरदानुसार हनुमान आजही आपल्या मध्ये आहेत. तसे हनुमान चा संबंध फक्त त्रेता युगात किंवा कलियुगात नाही तर महाभारतामध्येही हनुमान चे वर्णन आहे . हनुमान ने अर्जुनाला वचन दिले होते की, कुरुक्षेत्रामध्ये होणाऱ्या युद्धामध्ये तो अर्जुनाची मदत करेल महाभारतामध्ये हनुमान अर्जुनाच्या रथावर लावलेल्या झेंड्यामध्ये विराजमान झाले होते . युद्धाच्या शेवटपर्यंत ते अर्जुना सोबत होते . युद्ध संपल्यावर जेव्हा अर्जुन रथातून उतरल्यावर ,भगवान श्रीकृष्णाने हनुमानजीचे आभार व्यक्त केले आणि हनुमान ने ही श्रीकृष्णाची भेट घेतली आणि तेथून ते निघून गेले . हनुमान तेथून निघून जात असताना त्या रथाची राख झाली ,रथ जळून खाक झाला हे पाहून अर्जुनाने कृष्णाला विचारले की हनुमान जाताच या रथाची राख कशी काय झाली तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले की या रथाची आणि तुझी रक्षा Hanuman करत होते हनुमान नसते तर युद्धामध्ये तुझे जिंकणे अवघड झाले असते.
- भगवान हनुमान ला (शेंदूर)सिंदूर का लावले जाते.
कंचन बरन बिराज सुबेसा .म्हणजे हनुमान चे वर्णन कंचन म्हणजे सोन्याचे रूप असे होते, मग आपण हनुमानला शेंदुराच्या रूपामध्ये का पाहतो…. रामाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी माता सीता आपल्या मांगे मध्ये सिंदूर म्हणजे शेंदूर भरताना हनुमान ने पाहिले ,त्यांनी कारण विचारले असता माता सीताने आपला पती दीर्घायुषी तसेच त्यांचे शरीर स्वस्त व निरोगी राहावे यासाठी मी आपल्या मांगे मध्ये सिंदूर भरते किंवा सिंदूर लावत आहे असे उत्तर दिले . हनुमान ने हे ऐकल्यानंतर हनुमान ठरवले कि,माता सीता श्री रामाबद्दल सिंदूर लावून त्याच्या साठी प्रार्थना करत असेल तर मी का नाही करू शकत ,म्हणून एके दिवशी हनुमान ने आपल्या पूर्ण शरीरावर शेंदूर लावले ,श्री रामाने याचे कारण विचारले असता हनुमान ने सांगितले जर माता सीता एक चुटकी सिंदूर लावून तुमच्यासाठी दीर्घायुषी तसेच स्वस्त व निरोगी राहण्यासाठी प्रार्थना हे करत असेल तर मी आपल्या शरीरावर सिंदूर लावून तुम्हाला दीर्घायुष्य तसेच स्वस्त शरीर लाभावे एवढीच माझी इच्छा आहे . हनुमानची एवढी भक्ती पाहून रामाने हनुमान ला वरदान दिले की जो कोणी हनुमान चा शेंदूर (सिंदूर) रूपात पूजा करेल त्याच्यावर रामाचा कायम आशीर्वाद राहील.
निष्कर्ष:
हनुमान जन्मोत्सव आनंदाने साजरा करा .
धन्यवाद.