हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माची नववर्षाची सुरुवात Gudhipadwa या सणापासून केली जाते महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या घरी गुढी उभारण्यात येते, गोड पदार्थ तसेच पुरणपोळीचे नैवेद्य बनवले जातात . या दिवशी अंगणामध्ये,दारासमोर बांबूची काठी (कलकीचीं काठी ) उभारून ,रांगोळी काढली जाते. गुढीला एक तांब्याचा कलश लावण्यात येतो,तसेच एक नवीन वस्त्र ,बत्ताशाची माळा,कडुलिंब ,फुलांचा हार लावण्यात येतो. देवाची पूजा करण्यात येते,नेवेद्य दाखवला जातो. यावर्षीचा गुढीपाडवा ९ एप्रिल मंगळवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.
Gudhipadwa ऐतिहासिक महत्त्व:
- ब्रह्मदेवाने या दिवसाच्या सूर्योदयापासून विश्वाची निर्मिती केली आहे, असे पुराणांमध्ये म्हटले गेलेले आहे.
- सम्राट विक्रमादित्य यांनी या दिवशी त्याच्या राज्याची स्थापना केली होती .विक्रमी सवंतचा पहिला दिवस हिंदू नववर्ष विक्रम संवत चा शुभारंभ चैत्र नवरात्रीने होत असे.
- भगवान श्रीरामाचा राज्याभिषेकाचा दिन मानला जातो.
- नवरात्री सुरु होते,पहिला दिवस शक्ती आणि भक्तीचे दिवस म्हणून नऊ दिवस नवरात्रीचे दिवस मानले जातात .
- तसेच या दिवशी श्री युधिष्ठिराचा राज्याभिषेकही करण्यात आला होता. असे मानले जाते.
- महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या स्मरणार्थ म्हणून आपण Gudhipadwa हा सण साजरा केला जातो .
- महाराष्ट्र मध्ये या दिवशी विजयाचे ध्वज म्हणून गुढी उभारतात . गुढी ही विजयाचे,समृद्धीचा प्रतीक मानली जाते.
- या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात वर्षा प्रतीपदीपासून होते ,यामध्ये आनंद आणि उत्साह भरलेले असते. पीक पिकायला सुरुवात होते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते.
- हा नक्षत्र शुभ दिवस मानला जातो, कोणतेही नवे कार्य सुरू करण्यासाठी हा शुभ दिवस मानला जातो. येणाऱ्या नऊ दिवस नवरात्रीचे मानले जातात.
- आपल्या सडे तीन तिथींपैकी हि दुसरी तिथी मानली जाते. दुसरी तिथी वर्षा प्रतिपदा, चैत्र शुल्क प्रतिपदा किंवा चंद्रमण युगादि,असे त्याला म्हटले जाते .चंद्रमण प्रतिपदा राज्यां मध्ये हा नवीन वर्ष म्हणून साजरी केली जातात.
- कर्नाटक – तेलंगणा आंध्र प्रदेश यामध्ये उगादी(उगाडी) किंवा युगादी असे ,कश्मीर येथे नववर्ष नवरेह या नावाने साजरा केला जातो .
- महाराष्ट्रामध्ये Gudhipadwaम्हणून साजरा केला जातो .
- सिंधी या तिथीला चेटी चंड म्हणतात.
Gudhipadwaच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे सेवन का करतात?
या दिवशी कडुलिंब चे पाने खाल्ली जातात .आपण या दिवशी प्रसादामध्ये कडुलिंबाची पाने,गूळ, नारळ, फुले, एकत्र करून आपण प्रसाद बनवतो . कडीलिंब हा एक गुणकारी झाड आहे, या काळात आपल्याला उष्णतेचे आजार होतात, या आजारांवर आपल्याला जर लढायचं असेल तर कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा ते पान खाल्ले पाहिजे . कडुलिंबा हा जंतुनाशक असल्यामुळे घरात येणाऱ्या जंतूंना किंवा रोग राई ला आळा घालण्यात याची मदत होते . उष्णतेचे आजार होत नाहीत . कडुलिंबाच्या पानांमध्ये पित्तनाशक गुणधर्म असल्याने,त्याचा लाभ आपल्याला मिळतो. उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा संबंधित विकार होत नाहीत. मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी कडुलिंबाचे फार महत्त्व आहे. या महिन्यांमध्ये कडीलिंबाची पाण्याची सेवन केले जाते ,कडीलिंबाच्या पानांनी या दिवसात आंघोळ ही केली जाते .
निष्कर्ष:
आज आपण Gudhipadwa या सणाबद्दल माहिती पाहिली . Gudhipadwa आपल्या घराघरांमध्ये साजरा होणारा सण आहे ,आणि तसेच या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते.
तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद.