Digital Arrest ( डिजिटल अटक) म्हणजे काय ? Digital Arrest होत असताना पीडितेचे काय होते आणि त्याला कसे अटक केली जाते. हे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता हा प्रश्न खूप लोकांना पडत आहे.
सायबर गुन्हेगार आता नवीन पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत लोक त्यांना बळी पडत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते. आजकाल Digital Arrest ची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार कायदा आणि नियम दाखवत लोकांची फसवणूक करत आहेत.त्यामुळे पोलीस त्या व्यक्तीला हातकडी लावून पोलीस ठाण्यात घेऊन जात नाहीत, ही अशी कोणती अटक आहे, असा संभ्रम अनेकांना पडला आहे. याची कल्पना नसल्यामुळे आतापर्यंत अनेक जण या फसवणुकीला बळी पडले आहेत,लाखो करोडो रुपयेच नुकसान सहन करायला लागले आहे.
सायबर गुन्हेगार कायदा आणि नियम लोकांना दाखवून लोकांची फसवणूक करत आहेत, याला Digital Arrest असे म्हंटले जाते. . ‘Digital Arrest ’च्या वाढत्या प्रकरणांमुळे मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने केंद्र सरकारने धमकी आणि खंडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लाखोंहून अधिक स्काईप आयडी ब्लॉक केल्या आहेत. एखाद्या घटनेनंतर लगेच तक्रार नोंदवण्याचा सल्लाही सरकारने दिला आहे.लोकांनी जागरूक असणे गरजेचे आहे.
फसवणुकीचा हा नवीन प्रकार नक्की आहे तरी काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
Digital Arrest (डिजिटल अटक )म्हणजे काय?
डिजिटल अटकेत, सायबर फसवणूक करणारी व्यक्ती तुम्हाला अटक होण्याची भीती दाखवते. यामध्ये ते तुम्हाला घरात कैद करून ठेवले जाते,. अशा स्थितीत व्हिडीओ कॉल करताना फसवणूक करणारा आपण पोलीस आहे हे दाखवतो,ठाण्यासारखी रूम असते, प्रश विचारून पोलीस अधिकारी असल्याचे भासवतो. कायदे ,कानूनचा धाक दाखवतो. पीडित व्यक्ती घाबरते आणि भीतीमुळे त्याच्या बोलण्यावर प्रभाव पडतो.तसेच आपण डिजिटलअरेस्ट होतो.
Digital Arrest हा सायबर गुन्हेगारांनी रचलेला मानसिक खेळ आहे. जी पीडित व्यक्तीला फक्त विविध गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे भासवून त्याला भीतीपोटी मानसिक बंधक असल्याचा भास निर्माण करणे, हे Digital Arrest चे एक प्रकारे वर्णन करता येईल. पीडित व्यक्तीला कोणीही शारीरिकदृष्ट्या अटक केलेली नसते, पण त्याच्यावर केल्या गेलेल्या विविध आरोपांमुळे तो मानसिकदृष्ट्या प्रचंड दबावाखाली येतो आणि स्वतःला तो मानसिक बंधनात अडकवून ठेवतो. तुम्ही परदेशात कुरिअरने पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज, • हत्यारे, डुप्लिकेट पासपोर्ट वगैरे मिळून आल्याचे आरोप केले जातात व असे आरोप करणारे ईमेल पोलिस ,लॉ एन्फोर्समेंट एजन्सीनी जारी केल्याचे भासविले जाते.
फसवणूक करणारा पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉल सोडू देत नाही किंवा कोणाशीही संपर्क करू देत नाही.त्याच्याच घरात त्याला अटक करण्यात आली असून, पीडितेला आपले आधारकार्ड, सिमकार्ड, बँक खाते असा काही बेकायदेशीर कामासाठी वापरल्याचे सांगून धमकावले जाते. एवढं सगळं झाल्यावर पीडित व्यक्तीला धमकावण्याचा ‘खेळ’ सुरू होतो.यामध्ये खूप लोकांनी आपली आयुष्यभराची जमापुंजी गमावली आहे.
Digital Arrest तक्रार कुठे करायची
- एक गोष्ट लक्षात ठेवा की पोलिस किंवा कोणतीही एजन्सी तुम्हाला कधीही फोन करत नाही तसेच ठोस पुरावे असल्याशिवाय व्हीडीओ call वर बोलावत नाही किंवा धमकावत नाही. तपास यंत्रणा किंवा पोलिस कायदेशीर प्रक्रिया वापरून कारवाई करतात. तुम्हालाही असा धमकीचा फोन आला तर न घाबरता स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन त्याची तक्रार करा.
- याशिवाय नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करा आणि तुमची तक्रार नोंदवा.
- तसेच @cyberdost च्या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तक्रार नोंदवू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवने गरजेचे आहे.
सायबर स्कॅमर कोणालाही अडकवू शकतात. कोणत्याही प्रकारे digital arrest करू शकतात हे टाळण्यासाठी, आपल्या आणि आपल्या computer ,mobile ,bank डेटाच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
Digital Arrest सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात येण्यापासून कसे वाचू शकता ?
- तुमचे डिव्हाइस अपडेट ठेवा, mobile वरचे सर्व ॲप्स अपडेट ठेवा.
- कोणत्याही अज्ञात स्त्रोताकडून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीने call वर तुमचे वैयक्तिक किंवा bank details मागितले तर देऊ नका.
- वैयक्तिक डेटा आणि कोणत्याही प्रकारच्या व्यवहार करताना प्लॅटफॉर्मवर मजबूत पासवर्ड ठेवा.
- कोणतेही थर्ड पार्टी app download करू नका, कोणत्याही अशासकीय ,बेकायदेशीर प्लॅटफॉर्मवरून काहीही इन्स्टॉल करू नका.
- अशा परिस्थितीत झालेल्या आरोपांबाबत आपल्या घरातील लोक, आपले नातेवाईक/मित्रमंडळींबरोबर याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे, त्यामुळे अनामिक भीतीतून बाहेर पडण्यास मदत होते.
- हे गुन्हे कशा प्रकारे केले जातात, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे बाबतीत आपला प्रतिसाद असावा किंवा नसावा, आणि प्रतिसाद देण्याची वेळ आलीच तर तो कसा असावा हे माहिती करून घेतल्यास आपण अशा डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यास बळी पडण्याचे आपण टाळू शकतो.