code of conduct:आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता लागू असताना कोणकोणती काम केली जात नाहीत किंवा कोणकोणत्या कामावरती बंदी घालण्यात येते ते आज आपण या लेखात माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली तर code of conduct म्हणजे काय महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारख्या जाहीर करण्यात आले आहे तसेच राज्यात code of conduct देखील लागू झालेली आहे जी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर संपेल या काळात म्हणजेच निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाची जबाबदारी वाढते त्यांच्यावरती अनेक बंधनही आणि अनेक अधिकारही त्यांना मिळतात आचारसंहिता म्हणजे काय या काळात नेमकं काय केलं जातं तर चला जाणून घेऊया 

निवडणुका जवळ आल्या की आचारसंहिता(code of conduct) हा शब्द सतत कानावर पडतो. निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होते

कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एक पत्रकार परिषद घेतली जाते. त्याबरोबर  निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच,  आचारसंहिता लागू होते. तसेच  ही आचार संहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायम राहते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. 

code of conduct

आचारसंहितेची (code of conduct)सुरुवात कशी झाली?

  • आचारसंहितेची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली.

 

  • राजकीय पक्षांशी परामर्श करून त्यांच्या सहमतीने code of conduct तयार करण्यात आली. कोणकोणत्या  नियमांचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं.

 

  • 1962 च्या सार्वजनिक  निवडणुकांनंतर 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. नवनवीन  नियम जोडले जाऊ लागले.

 

  • तरीही अनेकदा आपल्याला पाहायला मिळते कि,राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे  राजकीय पक्ष किंवा उमेदवारांवर आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई होताना आपण पहिले आहे. 

 

  • निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही. पण आचारसंहितेतील काही नियम  IPC  च्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात.







निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.

 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.

 

निवडणूक आयोगानं 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembley Election 2024) तारखा मंगळवारी 15 ऑक्टोबर जाहीर केल्या आहेत. राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.




महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक :

 

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)

अर्ज पडताळणीची तारीख – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)

अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024(सोमवार)

मतदानाचा दिवस – 20 नोव्हेंबर 2024

मतमोजणीची तारीख – 23 नोव्हेंबर 2024






आचारसंहिता (code of conduct)म्हणजे काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारतात निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुका कोणत्याही पक्षपाताशिवाय होण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. 

आचारसंहितेला इंग्रजीत ‘कोड ऑफ कंडक्ट’ असं म्हणतात. व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार, नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. 

देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी, यासाठी निवडणूक आयोगानं काही नियम घालून दिले आहेत ,राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करु नये याचा नियमावलीचा यामध्ये समावेश असतो. 

निवडणूक आयोगाने काही नियम आणि काही अटी शर्ती घालून दिलेले असतात त्या नियमांना code of conduct असे म्हणतात .






  • निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे.

 

  • एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई त्याच्यावर केली जाते. 

 

  • मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते.



आचारसंहिता (code of conduct)लागू झाल्यानंतरचे नियम

  • सत्ताधारी पक्षाला निवडणूक code of conduct लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. उद्घाटन, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.

 

  • आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही नवीन योजना किंवा नवीन घोषणा केल्या जात नाहीत आणि त्यांना करता येत नाही निवडणुकीच्या तयारीसाठी सरकारी वाहन असेल किंवा बंगला असेल विमाने असतील अशा सरकारी मालमत्तेचा  वापर करता येत नाही. 

 

  • कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.

 

  • कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.

 

  • जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.

 

  • कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानही घेणं आवश्यक आहे. विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही.

 

  • मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.

 

  • मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते.

 

  • मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत.दिखावा करू नये. कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी. मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये. 

 

  • मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, त्यांच्या जाण्या-येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे.

 

  • मतदारांना पैसे देणं,  बोगस मतदान, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणं, प्रचाराचा कालावधी  संपल्यानंतरही प्रचार करत राहणं.




का ?कशासाठी उपयोगी:



निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी code of conduct आवश्यक आहे. आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते.  त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारालाही यामुळे प्रतिबंध बसतो



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top