बँका सार्वजनिक असोत किंवा खाजगी, त्या त्यांच्या ग्राहकांना लॉकर Bank Locker ची सुविधा उपलब्ध करून देतात.लॉकर्स हे तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते.
बँका सार्वजनिक असोत किंवा खाजगी, त्या त्यांच्या ग्राहकांना लॉकर (Locker) ची सुविधा उपलब्ध करून देतात. जर ग्राहकाला बँक लॉकर उघडायचे असेल तर पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आवश्यक असते. तसेच पत्त्याचा पुरावाही द्यावा लागतो. लॉकर घेण्यासाठी बँक आणि ग्राहक यांच्यात करार आहे. या करारांवर स्वाक्षरी केल्यानंतरच लॉकर दिले जाते.लॉकरचे भाडे 1000 ते 10,000 रुपयांपर्यंत असू शकते. कोणत्या आकाराचे लॉकर घेत आहात या सेवेसाठी निश्चित शुल्क आकारले जाते. घरात मौल्यवान वस्तू ठेवण्यापेक्षा बँक लॉकरात ठेवणे अधिक सुरक्षित असते. ,या सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी काय नियम आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
- RBI ने म्हटले आहे की बँक लॉकर उघडायचे असल्यास अशाच खातेदारांसाठी उपलब्ध आहे ,ज्याचे बचत खाते किंवा चालू खाते आहे. जर ग्राहकाला बँक लॉकर उघडायचे असेल तर फक्त पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच पत्त्याचा पुरावाही सादर करावा लागतो.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, ग्राहकांना बँक लॉकरमध्ये फक्त दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि कायदेशीर वैध वस्तू ठेवता येतील. जसे की सोने (Gold), चांदी (Silver,दागिने (Jewelry) महत्वाची कागदपत्रे बँक लॉकरमध्ये ठेवत असाल.
- बँक लॉकरमध्ये फक्त ग्राहकाला प्रवेश मिळेल, म्हणजेच कुटुंबातील सदस्यांना किंवा इतर कोणालाही लॉकर उघडण्याची सुविधा मिळणार नाही.बँक लॉकरच्या नवीन नियमांनुसार, बँक आणि ग्राहकांना नवीन करारामध्ये स्पष्टपणे नमूद करावे लागेल की तेथे कोणत्या प्रकारचा माल ठेवता येईल आणि कोणत्या प्रकारचा नाही.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, ग्राहकांना बँक लॉकरमध्ये फक्त दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि कायदेशीर वैध वस्तू ठेवता येतील.
- तुम्ही bank लॉकरमध्ये रोख cash ठेवू शकत नाही कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकरमध्ये रोख cash ठेवण्यास बंदी घातली आहे.
- बँकेच्या लॉकरमध्ये तुम्ही सोने gold ठेवण्याच्या प्रमाणावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण नाही.तुम्ही सोने ठेऊ शकता. पारदर्शक फी रचनेमुळे तुमचे सोने बँकेत ठेवणे महाग नाही. परंतु बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर तुम्हाला कोणतेही व्याज मिळणार नाही. त्याऐवजी, बँक लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी ग्राहकांना शुल्क द्यावे लागते.
- ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँका विशेष काळजी घेतात. तसेच भूकंप , पूर, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे लॉकरातील वस्तूंचे नुकसान झाल्यास, बँकेची जबाबदारी नसते. परंतु, जर बँकेकडून कुठलीही दुर्लक्ष Negligence झाली असेल, तर बँक त्याच्या भरपाईसाठी जबाबदार असते.
तुमच्याकडे लॉकर असल्यास, या गोष्टी लक्षात ठेवा
- Bank Lockers ची फी वेळेत द्या.
- Bank Lockers मध्ये काय ठेवत आहेत याची लिस्ट स्वतःकडे असली पाहिजे. तुम्ही काय काय ठेवले आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
- तुमचा Bank Lockersअधून मधून तुम्हाला चेक केला पाहिजे.
- Bank Agreement copy सुरक्षित ठेवा.
- Bank Lockers ची चावी सुरक्षित ठेवा.