Baaghi 4 चा पहिला लूक: एक रक्तरंजित पोस्टरसह रिलीज ,टायगर श्रॉफनं ‘Baaghi 4’नवीन डेटची केली घोषणा

टायगर श्रॉफने नुकतेच त्याच्या लोकप्रिय बागी Baaghi 4 चौथ्या भागाची घोषणा केली.  ॲक्शनने भरलेला हा चित्रपट 5 सप्टेंबर, 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अभिनेत्याने आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर Instagram वर शेअर केले आहे,

Baaghi 4 च्या फर्स्ट लूकमध्ये टायगर श्रॉफची ओळख यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात.

बागी फ्रँचायझीची सुरुवात 2016 मध्ये सब्बीर खान दिग्दर्शित पहिल्या चित्रपटाच्या रिलीजने झाली. 

 टायगर श्रॉफने 2014 मध्ये सब्बीर खानच्या हिरोपंतीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच त्याने बागी, ​​बागी 2, स्टुडंट ऑफ द इयर 2, मुन्ना मायकल, ए फ्लाइंग जट,बागी 3, वॉर,  हिरोपंती 2 आणि गणपत अश्या अनेक हिट चित्रपटांमध्ये  काम केले.

Baaghi 4

‘बागी’ हा 2004 मधील तेलुगू चित्रपट वर्शम आणि 2011 मधील इंडोनेशियन चित्रपट ‘द रेड: रिडेम्पशन’ पासून प्रेरित आहे.हा चित्रपट निर्माता साजिद नाडियादवालाचा ‘Baaghi 4.’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ५  सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये ॲक्शन मध्ये ओळखल्या जाणाऱ्या Baaghi 4 चे निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे, ज्याने या चित्रपटाची सुरुवात केली आहे. रक्तरंजित अशी असणारी वाटचाल.  

सुरुवातीपासूनच बागी चित्रपटाचा  चेहरा असलेला टायगर श्रॉफने बॉलीवूडमधील सर्वात तरुण आणि सर्वात डायनॅमिक ॲक्शन हिरो म्हणून स्वतःचे स्थान  निश्चित केले आहे. Baaghi 4 भारतीय सिनेमात आतापर्यंत पाहिलेल्या काही सर्वात धाडसी आणि दृष्यदृष्ट्या नेत्रदीपक ॲक्शन सीनमध्ये टायगरचे प्रदर्शन करणार अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

सिंघम अगेन सिनेमाची खूप चर्चा होत आहे अजय देवगन पुन्हा एकदा बाजीराव सिंघम च्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाले,  अजय देवगन, रणवीर सिंह, अक्षय कुमार ,अर्जुन कपूर ,करीना कपूर हे कलाकार सिंघम अगेन  मागील  सर्व कलाकार या अभिनेता टायगर श्रॉफ ची विशेष भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाली. टायगरने एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याचे स्थान मजबूत केले .अशातच सिंघम नंतर लगेचच टायगर श्रॉफ च्या नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आलेली आहे

“Baaghi 4” च्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ एका बाथरूमच्या कमोड वर बसलेला आहे त्याच्यासमोर दोन-तीन लोकं मेलेली सुद्धा आपल्याला दिसतात आणि टायगर श्रॉफ च्या एका हातामध्ये कोयता, आणि दुसऱ्या हातात दारूची  बॉटल आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच  बाथरूमच्या  भिंतीवरती रक्ताचे डाग पडलेले दिसत आहे ही भयानक असे  “Baaghi 4”  चे चित्र आपल्याला पाहायला मिळते.  आता अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजसाठी उत्सुक आहेत. टायगरनं शेअर केलेल्या पोस्टरच्या कमेंट्स विभागात अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

 टायगर श्रॉफचा “Baaghi 4” मध्ये पुन्हा त्याची ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top