देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी Apaar id card ओळखपत्र सुरू केले आहे. पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी Apaar id card बनवले जात आहे.देशभरातील खासगी आणि सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कार्ड आहे.
जे ‘वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड’ म्हणूनही Apaar id card ला ओळखले जाते. आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार कार्ड Automated Permanent Academic Account Registry बनवले जाईल.
Apaar Id Card बनवल्याने फायदे काय होणार.
- विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा, जसे की पुरस्कार, पदव्या, शिष्यवृत्ती आणि इतर क्रेडिट्स, डिजिटल पद्धतीने ‘आपर’ आयडीवर अपलोड केले जातील.
- हे कार्ड प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवले जाईल.
- त्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिकाअधिक शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे.
- शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील, त्यांच्या गुणपत्रिका इत्यादी संबंधित अपार आयडीमध्ये जतन केल्या जातील. डिजीलॉकरच्या digilocker apaar id च्या मदतीने सर्व शैक्षणिक नोंदी पाहता येतात
- विद्यार्थ्यांच्या शाळांमधून गळतीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात मदत होईल.
पालकांचे संमतीपत्र
- अपारचा नंबर आणि आधारचा नंबर या दोन वेगळ्या गोष्टीत विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो तिथे त्याला अपार क्रमांकासाठी नोंदणी करता येणारे सरकारी संस्थांना विद्यार्थ्यांची माहिती फक्त आवश्यक असेल तेव्हाच दिली जाईल असाही सरकारने सांगितले.
- Apaar id Card साठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे आवश्यक आहे.
Apaar Id Card कसे बनवायचे
- https://www.youtube.com/watch?v=JbzjcP7-nw8अपार कार्ड’ बनवण्यासाठी विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- शाळेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पालक शाळेच्या मदतीने पुढील माहिती अपडेट करू शकतात.
- त्याचे ‘डिजिलॉकर’ वर खाते असावे.
- त्या आधारे विद्यार्थ्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- नोंदणीनंतर संबंधित शाळा आणि महाविद्यालयांकडून ‘अपार कार्ड’ दिले जाईल.
- त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती घेणे आवश्यक आहे.