ज्याचा कधीच नाश होत नाही ते अक्षय आणि जे कधीच संपत नाही ते म्हणजे अक्षय .आपल्या भारतीय हिंदू सनातन संस्कृतीमध्ये Akshay Tritiya या सणाची महत्त्व सांगितलेले आहे. आपण या दिवशी कोणतीही काम जर सुरू केले असेल तर त्या कामाचा क्षय होत नाही, नाश होत नाही म्हणून त्याला अक्षय तृतीया असे म्हणतात. दरवर्षी आपण अक्षय तृतीया हा सण साजरा करतो. Akshay Tritiya वैशाख पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते तिला आखाती असे म्हणतात.हा हिंदू धर्मातील एक खूप मोठा सण आहे.
Akshay Tritiya बद्दल माहिती :
Akshya Tritiya साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त मानला जातो आज घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आज आपण खरेदी केलेल्या गोष्टीचा नाश होत नाही, त्या आपल्या आयुष्यामध्ये तशाच टिकून राहतात ते आपल्याला पुन्हा पुन्हा मिळतात .
म्हणून हि अक्षयता मनुष्य जीवनामध्ये कायम राहिली पाहिजे म्हणून Akshay Tritiya ही साजरी केली जाते .
Akshay Tritiyaच्या दिवशी सूर्य हा कणखर असतो सोन्याची तुलना सूर्याशी केली जाते. या दिवशी सोनं खरेदी केल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते . सोनं किंवा कुठलीही वस्तू खरेदी केली तर घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या ज्या घरावरती येणारे जी संकट आहेत ती दूर होतात असा हा एक समज आहे.
तसेच विशेष गोष्टी महत्वाच्या आहेत:
- Akshay Tritiya हा दिवस पृथ्वीचे रक्षक म्हणून भगवान विष्णू याला समर्पित आहे भगवान विष्णू ने पृथ्वी लोकांमध्ये परशुराम हा अवतार घेतला होता.
- या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली होती असे मानले जाते.
- भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते ,कारण सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.
- या दिवशी कृषी संस्कृतीचा पालनहार म्हणून बलरामाची पूजा केली जाते.
- या दिवशी बसवेश्वर जयंती ,हायग्रीव जयंती ,अन्नपूर्णा देवी जयंती, नरनारायण जोडदेवतांची जयंती असते.
- आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार Akshay Tritiya च्या दिवशी सत्ययुग आणि त्रेता युग सुरू झाले असे म्हटले जाते या दिवशी भगवान परशुरामाची जयंती केली जाते.
भगवान परशुरामाबद्दल विशेष माहिती:
- अक्षय तृतीया हा दिवस भगवान परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही मानला जातो आणि हा दिवस पृथ्वीचे रक्षक म्हणून भगवान विष्णू याला समर्पित आहे भगवान विष्णू ने पृथ्वीवर पृथ्वी लोकांमध्ये परशुराम हा अवतार घेतला होता. आपल्या 7 चिरंजीवीपैकी एक भगवान परशुराम चिरंजीव आहे परशुराम, हिंदू देवता विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक. परशुरामाचा जन्म क्षत्रिय वर्गातील ब्राह्मण ऋषी जमदग्नी आणि राजकुमारी रेणुका यांच्या पोटी झाल्याची महाभारत आणि पुराणात नोंद आहे. ते सप्तऋषी म्हणून ओळखले जातात त्यांना सप्तऋषी असं का म्हणतात कारण सप्तऋषींना’ जी काही माहिती आहे जीवन जगण्याचे शास्त्र,ब्रह्मांडाबद्दल माहिती ,वेद पुराण ,शास्त्रांबद्दल माहिती त्यांना पुढच्या पिढीला देण्याचे काम सप्तऋषी करतात.
- एकदा सहस्त्रार्जुनाने भगवान परशुरामांचे वडील जमदग्नी यांच्या आश्रमात कपिला कामधेनू गाय पाहिली आणि तिला धारण करण्याच्या इच्छेने त्याने कामधेनूला जबरदस्तीने आश्रमातून काढून घेतले. जेव्हा परशुरामाला त्याच्या पित्याने सांगितले व त्यांना आदेश दिला. त्याने कामधेनूला परत आणण्याचा विचार केला.
- सहस्त्रार्जुने गाय देण्यास नकार दिला .यामध्ये आणि सहस्त्रार्जुनाशी युद्ध केले आणि शेवटी त्याचे हजारो हात कापून वध केला.
- तेव्हा सहस्त्रार्जुनाच्या मुलांनी बदला म्हणून परशुराम झोपडीबाहेर असताना त्यांचे वडील जमदग्नी यांचा वध केला. पतीच्या हत्येमुळे व्यथित झालेल्या परशुरामची आई रेणुका सती गेली. या घटनेने परशुराम ,क्रोधित झाले आणि त्याने शपथ घेतली हैहय वंशातील सर्व क्षत्रियांचा नाश करीन.
या दिवशी पितरांची पूजा का केली जाते?
- पृथ्वीवरील सर्वात तपस्वी व दानशूर असलेले भगवान परशुराम ऋषी आपल्या आईवडिलांची हैहय क्षत्रियांकडून हत्या केल्याची स्मृती विसरू शकले नाही.त्यामुळे अत्यंत क्रोधित होऊन हैहय क्षत्रिय कुळाचा नाश केला.यामध्ये अनेक निष्पाप क्षत्रियांचा मृत्यू झाला.तरीही क्रोध शांत होत नसताना हनुमानाने परशुरामाला क्रोधाचे कारण सांगून त्यांची आईवडिलांची हत्या झाल्याची स्मृती नष्ट केली.त्यांच्या आईवडिलांना देखील परशुरामाच्या या कृत्यामुळे मुक्ती मिळाली नव्हती.हनुमानाने परशुरामाला आईवडिलांच्या मुक्तीचा मार्ग सांगितला.जेव्हा परशुरामाने आईवडिलांना जल कुंभदान केले.तेव्हा परशुरामाचा क्रोध शांत झाला व आईवडिलांना मुक्ती मिळाली.ही दंतकथा प्रचलित आहे परशुरामाची.
- व्यक्तीला भूतकाळातील एखादी मनाला आघात देणारी स्मृती भविष्यकाळात कशी त्रासदायक ठरू शकते.जोपर्यंत हे लक्षात येतं नाही की वर्तमानात आपल्याला होणारा त्रास हा भूतकाळातील कोणत्या स्मृतीमुळे होत आहे.त्या स्मृतीवर काम होत नाही तोपर्यंत कोणताही उपाय काम करू शकणार नाही
- आपल्या कुटुंबात पूर्वी झालेला अकाली मृत्यू तसेच विघातक कर्म आपला वर्तमान काळ खराब करू शकतात.जेव्हा आपण या आत्म्याच्या तृप्तीसाठी विशिष्ट प्रकारे प्रार्थना करतो तेव्हा आपली त्रासातून मुक्तता होते.आजचा दिवस यासाठी शुभ आहे ,कारण आजच्या दिवशीच्या सकारात्मक स्पंदनांचा ,विचारांचा लाभ घेऊ शकता
- हे सांगण्याचा उद्देश एवढाच की व्यक्तीला भूतकाळातील एखादी मनाला आघात देणारी स्मृती भविष्यकाळात कशी त्रासदायक ठरू शकते.जोपर्यंत हे लक्षात येतं नाही की वर्तमानात आपल्याला होणारा त्रास हा भूतकाळातील कोणत्या स्मृतीमुळे होत आहे.तोपर्यंत कोणताही उपाय काम करू शकणार नाही.
- म्हणून आपण पितरांची पूजा करतो,आपण घागर कुंभाराकडून विकत आणतो आणि ती भरतो आणि विधी व पूजा केल्यानंतर आपण पूर्वजांच्या नावाने दान धर्म करतो आणि ती घागर अर्पण करतो .
Akshay Trutiya दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी केल्या जातात:
- अक्षय तृतीया मध्ये सोने,चांदी,नवीन वस्तू, मातीची घागर ,भांडे ,विशेषता पिवळी मोहरी घेतली जाते.
- दक्षिणावर्ती शंख खरेदी केला जातो ,धने खरेदी केले जाते ,जव खरेदी केले जाते ह्या वस्तू शुभ मानल्या जातात .
- Akshya trutiya या दिवशी आपण पाणी म्हणजे जल अर्पण करणे शुभ मानले जाते.
- तसेच या दिवशी मीठ खरेदी करतात कारण, स्वयंपाकासाठी जे वापरणारे मीठ आहे ते जर आपल्या घरात नसेल तर आपल्याला प्रतीक्षा करावी लागते म्हणून समृद्धीसाठी किंवा आपल्या पुढच्या जेवणासाठी आपण मीठ खरेदी केले जाते.
- या दिवशी आपले शरीर मन आत्मा शुद्ध करण्यासाठी आपण उपास करतात ,आपण दानधर्म करू शकतो गरजू व्यक्तींना कपडे दान करू शकतो.
निष्कर्ष:
हि अक्षय तृतीया आनंदाने साजरी करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
Akshay Tritiya च्या हार्दिक शुभेच्छा .