उन्हाळ्यात आपल्या आहारात या  गोष्टी समाविष्ट करा,आणि 5 उन्हाळी सुपरफास्ट चे पदार्थ खाऊन आपल्या शरीरात थंड आणि गारवा निर्माण करा.

 उन्हाळ्यामध्ये काकडी ,टरबूज, कलिंगड, द्राक्षे, ,स्ट्रॉबेरीज ,असे भरपूर थंड पदार्थ आपल्याला दिसतात आणि ते खाल्ल्याने आपल्या शरीरात  थंडावा ही जाणवतो . तसेच घरामध्ये दही ,ताक ,लिंबू सरबत, कोकम सरबत , उसाचा रस असे अनेक पदार्थ आपण खाऊ शकतो . 

थंड पदार्थ खाल्ल्यानंतर  उष्ण हवामानात आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे मदत होते . उन्हाळ्यामध्ये आपण हे सुपर फूड खाऊ शकतो ,आणि आपल्या आहारात त्यांचा समाविष्ट केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होऊ शकतो . आपल्याला उन्हाळ्याचा काही त्रास होऊ शकत नाही,चला पाहूया पदार्थ कसे खावे, आणि ते पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात कोणते बदल होतात , आपल्या शरीराला कोणत्या प्रकारे फायदा होतो त्याची माहिती  जाणून घेऊया.

काकडी (Cucumber): काकडी  हे एक फळ आहे ,भरपूर लोक  काकडीचा सालाद  म्हणून  खातात. काकडी सोलून कधी खाऊ नये ,त्यात अँटिऑक्साइड असतात.   काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, काकडीमध्ये कोलेस्ट्रॉल आणि विटामिन सी सारखे जीवनसत्वे ही भरपूर प्रमाणामध्ये आढळतात. 

  • फायबर आणि जीवनसत्त्व आपल्याला निर्जरीकरण दूर करण्यास मदत करते . 
  • काकडीमध्ये खनिजे असल्यामुळे आपली त्वचा तसेच केस  सुंदर राहतात. कॅलरीज चे प्रमाण कमी कॅलरीज असतात 
  • काकडीचे सेवन केल्यामुळे आपल्याला होणारे जे जुनाट आजार आहेत ते कमी होतात.
  •  काकडीमध्ये 96 टक्के पाणी असते आणि ते आपल्या दररोजच्या गरजा भागवण्यासाठी पूर्णपणे मदत करते ,आणि शरीर हायड्रेट राहतं .
  • काकडी  चे सेवन केल्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते .
  • काकडी मध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे  सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते .
  • मधुमेह होण्यास मधुमेह टाळण्यास मदत होते.

 

Tragacanth Gum गोंड कटिरा( डिंक) : डिंक आपल्याला पांढऱ्या किंवा पिवळ्या  स्वरूपात भेटतो .

Gond Katira सेवन हे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला उत्तम फायदेमंद ठरते. उन्हाळ्यामध्ये Gond Katira चे सेवन केल्यास उष्माघात ,अशक्तपणा, घाम येणे यासारख्या समस्या होत नाहीत.  आपल्या शरीराला थंड करण्याचे काम करते ,उन्हाळ्याच्या हंगामात स्वतःला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी डिंकाचे सेवन करू शकता. 

 

 गोंड कटीरा (डिंक) Tragacanth Gum चिकट पदार्थ झाडांमधून बाहेर पडतो आणि हा उन्हाळ्यामध्ये पदार्थ खाल्ला जातो त्याला डिंक Gond Katira  असे म्हणतात . पंजाब ,हरियाणा ,राजस्थान या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात सापडले जाते . बाभूळ, किकर, कडुलिंबाच्या लाकडापासून काढन्यात येते. 

 

गोंड कटीरात  प्रथिने ,कॅल्शियम ,फॉलिक ऍसिड ,सोडियम ह्यांचे समृद्ध साठे आहेत. 

 

  •  हिवाळ्यामध्ये Gond Katira चे  लाडू देखील आपण खातो . अतिशय चविष्ट आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात . Gond Katira हा थंड असल्यामुळे कोणतेही त्रुतुत  सेवन केल्याने आपल्यालाच फायदा होतो. 
  • आपल्या  शारीरिक, मानसिक, केसांच्या आरोग्यासाठी, तसेच त्वचेसाठी हे Gond Katira चे आपल्याला खूप फायदेमंद आहे.
  •  शरीरातील उष्णता कमी: उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तसेच उष्माघाताचा धोका खूप जास्त असतो ,जेव्हा लोक दुपारी घरातून बाहेर पडतात उष्माघाताचा त्रास होतो, लघवी करताना आपल्याला जळजळ होते .डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रण ठेवण्यास आपल्याला मदत होते.





  •  बद्धकोष्ठ :बद्धकोष्ठ पासून आपल्याला आराम मिळतो, तसेच आपल्या आतड्याच्या  हालचाली वरती नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
  • बऱ्याचदा तोंडामध्ये पुरळ येतात,किंवा तोंड आल्यासारखे होते तर त्याचा घरगुती उपाय Gond Katiraचे सेवन केल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो .
  •  वजन कमी करण्यास:वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जातेGond Katira मध्ये उच्च फायबर असल्यामुळे फायबर सामग्री असल्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते . 
  •  मासिक पाळीमध्ये आराम: बऱ्याच महिलांना अनिमित पाळीचा त्रास सहन करावा लागतो पाळी बरोबर आपल्याला येत नाही , बऱ्याच महिलांची मासिक पाळी अनियमितपणे येते त्यामुळे महिलांना अनिमीयाचा त्रास सहन करावा लागतो डिलिव्हरी नंतर प्रसूतीनंतरही बराच महिला अशक्त होतात मासिक पाळीच्या दरम्यान आपला रक्तप्रवाह सुरळीत चालण्यासाठी आपण डिंका चे सेवन करू शकतो. कच्चा दुधात डिंक टाकून आपण त्याचे सेवन करू शकतो किंवा डिंकाचे लाडू बनवूनही आपण खाऊ शकतो. 



 ताक (Buttermilk) :ताक हे उत्तम असे चविष्ट आहे, ताक हे दह्यापासून बनवले जाते  आपली  पचनक्रिया सुधारण्यास मदत करते,आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते.  त्यामध्ये विटामिन बी १२  सारखी जीवनसत्व तसेच  कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणावर सापडते. ताकाला अमृतपेय असे म्हणतात. 

  •  आपल्या शरीरातील टॉक्सिन सारखे विषारी द्रव्य  बाहेर फेकली जातात उष्णतेपासून किंवा उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी आपल्याला ताकाच्या   सेवनाचा  फायदा होतो. 
  •  ताकाचे सेवन केल्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहतं तसेच आपल्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत ही होते. 
  •  ताकाची सेवन केल्याने शहरात थंडावा जाणवतो, शरीराचे तापमान सुरळीत चालते ताकामध्ये पोटॅशियम इलेक्टोलेट असते. 
  • आपल्या आतड्यांना आराम तसेच पाचनशक्ती सुधारण्यास मदत होते ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्या लोकांनी नेहमी ताकाचे सेवन केल्याने त्यांना फायदा होतो. 
  •  ताकाचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे कार्य  सुरळीतपणे चालण्याचे काम केले जाते . पोटाच्या समस्या असल्यास ताक पिण्याचा सल्ला देण्यात येतो, जर एखाद्या व्यक्तीला जर अन्नातून इन्फेक्शन किंवा पोटदुखी सारखा त्रास होत असेल तर त्याला ताक पिण्याचा सल्ला देण्यात येतो . 
  • हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियमची गरज असते , जे लोक नियमित ताकाचे   किंवा दह्याचे सेवन करतात त्यांना कॅल्शियमच्या कमीची गरज भासत नाही, कॅल्शियमच्या योग्य साठा ताकातून आपल्या शरीराला पुरवला जातो. 
  •  आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते, तसेच हृदयविकारांचा धोका टाळण्यास मदत होते, आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास ताकाचे सेवनाचा लाभ होतो. 
  •  आपण जर ताकाचे सेवन करत असेल तर आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात, ताकातील लॅक्टिक असिड आपल्या त्वचेसाठी उत्तम कार्य करते, तसेच आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. 
  •  वजन कमी करण्यास ताकामध्ये प्रोटीन्स विटामिन्स मिनरल असतात, तसेच कॅलरीज फॅट्स कमी असतात ताक  पिल्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते. 
  •  ताक पिण्याची दुष्परिणाम: दह्यासारखे किंवा ताका सारखे पदार्थ रात्रीच्या वेळी या पदार्थांचे सेवन करू नये , सेवन केल्याने आपल्याला पित्ताचा त्रास जाणवू शकतो. 

Sugarcane Juice (उसाचा रस):  उसाच्या रसामध्ये  इलेक्ट्रोलाइट्स  पोटॅशियम असतात, त्यामुळे उसाच्या रसाचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते . 

उसाच्या रसात पोटॅशियमची प्रमाण जास्त असल्यामुळे आपला पोटातील ph  संतुलित करण्यास मदत होते . उसाच्या रसामध्ये फायबर चे प्रमाण खूप मोठे असल्यामुळे,आपली पचनक्रिया साफ राहण्यास  मदत होते आणि बद्धकोष्ठतेसारखा समस्या आपल्याला कमी प्रमाणात होतात. 

कावीळ साठी उपयोगी :आयुर्वेदामध्ये कावीळ झालेल्या लोकांसाठी ऊस आरोग्यदायी मानलेला गेला आहे ,उसाच्या रसाचे सेवन केल्यामुळे अशक्तपणा  दूर होण्यास मदत होते.  जर यकृताचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या नंतर तुमच्या आहारात उसाचे रसाचे सेवन करू शकता. 

 लघवीचे प्रमाण उसाच्या रसामध्ये औषधे गुणधर्म असतात ,त्याच्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत केली जाते . उसाची सेवन केल्याने मूत्रमार्गाचे विकार ,मुतखड्यासारखा सामना करणाऱ्या लोकांना उसाच्या रसाचे सेवन केल्यास मदत होऊ शकते. 

उसाचे सेवन केल्यानंतर वृद्धत्व येण्यास आळा  मिळतो,ऊसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट ,फिनोलिक  ऍसिड असतात आपल्या त्वचेलामुळे मॉइश्चरायझिंग ठेवण्यास फायदेशीर ठरते . 

ताप आला असताना उसाचे सेवन आपण करू शकता,उसाचा रस ग्लुकोजच्या हानी  भरून काढण्यास मदत करतो . 

Watermelon टरबूज (कलिंगड): उन्हाळ्यामध्ये आपण  टरबूजचे सेवन करू शकतो,  टरबूज हे अत्यंत फायदेशीर असे फळ आहे . टरबुजाच्या सेवनाने आपले बरेचसे आजार बरे होण्यास मदत होते . 

  •  टरबुजाचे जास्त प्रमाणात आपण सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, म्हणून मधुमेह असलेल्या लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे . मधुमेहाच्या लोकांनी कलिंगडाचे सेवन कमी प्रमाणे करावे कमी मात्रेत करावे. 
  • टरबुजा मध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते रक्तदाब कमी करण्यासाठी तसेच मज्जा संस्थेच्या कार्यात मदत करते ,विटामिन बी 6 मुळे रोग प्रतिकार प्रणालीच्या कार्यास आपल्याला मदत करते . 
  • तुम्ही टरबुजाचे सेवन तुम्ही सकाळी करू शकता टरबुजाच्या फळांमध्ये 92% पाणी असते तसेच लायको पिन सारखे समृद्ध साठी आणि अँटिऑक्साइड असल्यामुळे आपल्या हृदयाचे तसेच त्वचेचे संरक्षण करण्यास मदत होते . 
  • ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे त्या लोकांनी टरबूज खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये ,टरबूज झाल्यानंतर ३० ते ४० मिनिटांनी पाणी पिऊ शकता. 
  • टरबुजाचे सेवन केल्यानंतर लगेच दूध पिणे हे आरोग्यासाठी धोका होऊ शकतो टरबुजा मध्ये विटामिन सी असते जर आपण दुधाचे पदार्थ खाल्ले तर एकमेकांवर प्रतिक्रिया होऊ शकतात ,आणि पोट फुगण्याची शक्यता होऊ शकते तसेच पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते. 

  

  • टरबुजाच्या फळांमध्ये कॅलरीज विटामिन सी विटामिन ई असतात त्याच्यामुळे आपण निरोगी राहतो, निरोगी राहण्यास आपल्याला मदत होते .

 

  • हायड्रेड करण्यास मदत होते. 
  •  भूक नियंत्रित राहते टरबुजाचे सेवन केल्याने आपल्या मेंदूसाठी ही टरबुजाची सेवन चांगले ठरते कारण टरबुजा मध्ये लायको पिन सारखे उच्च प्रमाण असल्यामुळे ते शक्तिशाली अँटिऑक्साइड आहे टरबूज देखील शुद्ध पाण्याचा एक चांगला असा उत्तम स्रोत म्हणायला काही हरकत नाही मेंदूच्या आरोग्यास आपल्याला फायदा मिळतो. 
  •  जर तुम्ही टरबूजावरती मी टाकून खात असाल तर ते खाणे टाळावे कारण टरबूजातील पोषक द्रव्य मिठामुळे शरीरात शोषली जात नाही. 
  • टरबुजाचे सेवन करणे आपल्याला थंड वाटते ,टरबूज शरीराला थंड ठेवण्याचे काम करते आणि आपल्याला लघवीसह मूत्रपिंडा सारख्या समस्या ,उष्णता आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते . 
  • उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज खाणे हे आपल्या शरीरासाठी एक उत्तम स्रोत आहे कमी कॅलरीज असल्यामुळे चरबी आणि सोडियम मुक्त आहे आपले  हृदय निरोगी राहण्यास मदत करते. 
  • टरबूज हे थंड असल्यामुळे आपले मन ही शांत राहते टरबुजाचे सेवन रात्री करू नये रात्रीच्या वेळी  टरबूज खाल्ल्याने आपल्याला पचनसंस्थेच्या समस्यांना सामना करावा लागेल त्याच्या पुढील दिवसांमध्ये आपलं दिवसभर पोट दुखेल किंवा पचन संस्थांमध्ये बिघाड होऊ शकतो 
  • अपचन सारख्या  समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते काही लोकांना टरबुजाचे सेवन केल्याने एलर्जी ही होऊ शकते जसे की डायरिया, गॅस ,सुजन ,पोट फुगणे यासारख्या समस्या होऊ शकतात .

निष्कर्ष:

उन्हाळ्यामध्ये या पदार्थांचे सेवन करून आपल्या शरीराला खूप फायदे होतात, ह्या पदार्थांचे सेवन करण्यास कोणतेही हरकत नाही. आपल्या शरीराला उन्हाळ्याच्या 

दिवसात जास्त पाणी पिण्याची गरज भासते,तर तुम्ही या पगारठाणचे सेवन करून आपल्या शरीराची काळजी घ्या.

उन्हाळ्यात या प्रकारच्या फळांचा ज्यूस सेवन केल्याने आपले आरोग्य सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते.  

धन्यवाद. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top