Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna सर्वसामन्यांचे जीवन उजळवणारी योजना !

मित्रानो आज या लेखात आपन संपूर्ण माहिती Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna चे फायदे तसेच  ही योजना आपल्या घराच्या छतावर बसविण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, या बद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna काय आहे?

भारत सरकारच्या Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna  ह्या योजनेसह उज्वल भविष्यात आपले स्वागत आहे.या दूरदर्शी प्रकल्पाचे उद्दिष्ट घरांना मोफत सौरऊर्जा उपलब्ध करून देणे, शाश्वत ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि पारंपारिक उर्जा स्त्रोतांवरील भार कमी करणे हे आहे.

सौर ऊर्जा व शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान  श्री नरेंद्र मोदी यांनी Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna  ही योजना सुरू केली आहे.  तसेच ग्रामीण भागातील अधिकार क्षेत्रात सोलर सिस्टिम ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त  योजना सुरू केली आहे.  या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी सुरुवात करण्यात येत आहे . याचा फायदा  देशात राहणाऱ्या लाभार्थ्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे. 

 भारत सरकारने वर्षें २०२४ मध्ये  Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna  सुरू केली याची उद्दिष्ट देशातील १ कोटी कुटुंबाला मोफत वीज देण्याचे आहे.  या योजनेअंतर्गत, सरकार घरांवर सोलर सिस्टिम बसवण्यासाठी सबसिडी   देणार आहे .सौर यंत्रणा  तुमच्या घराच्या छतावर बसवली जाईल,ज्यामुळे तुमच्या विजेची बचत होईल.

Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna योजनेचे लाभ कोणते ?

  •  सूर्यघर मोफत वीज योजना
  • हा भारत सरकारने लोकांना घरांमध्ये सौर ऊर्जा पॅनल बसवण्यास प्रोत्साहन करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे . 
  • या योजनेअंतर्गत सरकार सौर ऊर्जा पॅनलवर सबसिडी देते, त्यामुळे लोकांना वीज बिलावर  पैसे वाचवण्यास मदत होईल. 
  •  सूर्य घर मोफत योजना अंतर्गत १ कोटी कुटुंबाला 300 युनिट मोफत वीज  दिली जाणार आहे . 
  • सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार 40% पर्यंत अनुदान देईल,अनुदानाची रक्कम तुमच्या घराच्या छताचा आकार आणि सौर पॅनलच्या क्षमतेवर अवलंबून असेल. 
  • ह्या योजनेच्या मदतीने सर्व विज धारकांच्या बिलामध्ये ठराविक यूनिट माफ केल्याने आर्थिक बचत करण्यास सहायत्ता मिळेल.
  • सोलर सिस्टिम ही पर्यावरण पूरक असल्यामुळे तिचा सदुपयोग मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी पुरेपूर करण्यात येईल.सौर ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्त्रोत आहे.त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल ,ही योजना लोकांना विजेसाठी स्वावलंबी बनवण्यास मदत करेल .
  • योजनेअंतर्गत एक कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. 
  • सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार 40% पर्यंत अनुदान देईल,अनुदानाची रक्कम तुमच्या घराच्या छताचा आकार आणि सौर पॅनलच्या क्षमतेवर अवलंबून असेल. 

Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna ने साठी आवश्यक कागदपत्रे !

alt text

Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna ने ची वैशिष्ट्ये.

योजनेचे नाव

सूर्यघर मोफत वीज योजना

कोणी सुरू केली

श्री नरेंद्र मोदी यांनी

लाभार्थी

भारताचा  नागरिक

लाभ 

300 यूनिट मोफत वीज

अर्ज प्रक्रिया 

Online 

बजेट राशी 

७५००० करोड 

उद्देश

मोफत वीज पुरवणे

अधिकृत वेबसाइट

pmsuryaghar.gov.in

Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna ने साठीची पात्रता निकष.

  • सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
  • अर्जदाराचे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या घरात सौर पॅनेल बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी.
  • या योजनेच्या लाभासाठी सर्व श्रेणीतील लोक पात्र आहेत.
  • अर्जदाराचे आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी जोडलेले असावे.

Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna रुफटॉप सोलर स्किमसाठी, रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालीलप्रमाणे अर्ज करू शकता !

pmsuryaghar.gov.in या वेबसाइटवर  वर क्लिक करा. 

  • सर्व प्रथम तुमचं राज्य निवडा. 
  • तुमच्या इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनीची निवड करा.  तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाका. 
  • मोबाईल नंबर टाका. 
  • ईमेल टाका. 
  • पोर्टलवर दिलेल्या सुचनांना  फॉलो करा. 
  • ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबरसह लॉग-इन करा. त्यानंतर फॉर्मनुसार, रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
  • त्यानंतर डिस्कॉमकडून फिजिबिलिटी अप्रुव्हलची वाट पाहावी लागेल. एकदाअप्रुव्हल आल्यानंतर डिस्कॉममध्ये कोणत्याही रजिस्टर्ड विक्रेत्याकडून प्लान्ट इन्स्टॉल करू शकता.
  • इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर प्लान्टची माहिती सबमिट करा आणि मीटरसाठी अर्ज करा.
  • मीटर इन्स्टॉलेशन आणि डिस्कॉमकडून झालेल्या इन्स्पेक्शनसह पोर्टलकडून कमिशनिंग सर्टिफिकेट दिलं जाईल.
  • कमिशनिंग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि कॅन्सल चेक जमा करावा लागेल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत बँक खात्यात सब्सिडी दिली जाईल.

Frequently Asked Questions (FAQs)

  • प्रत्येक कुटुंबाना किती सोलार पॅनल दिले जाणार आहेत ?

प्रती कुटुंब १ सोलार पॅनल दिले जाणार आहे, एकदाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सोलार पॅनल घेताना त्याचा KW पाहून घ्यावा.

  •  मी ग्रामीण भागात राहत असल्यास मी अर्ज करू शकतो का?

 होय, तुम्ही ग्रामीण भागात राहत असला तरीही PM Surya Ghar Bijli      Yojana साठी  पात्र  आहात,देशातील केवळ गरीब आणि मध्यमवर्गीय   कुटुंबातील व्यक्ती पात्र असणार आहेत. 

  • पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचा लाभ कोणाला व किती मिळेल ?
  • Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna योजनेचा फायदा  देशातील निवासी ग्राहक तसेच त्यांच्या घरी रूफटॉप सोलर सिस्टीम बसवली असेल त्यांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळेल. 
  • Pm Surya Ghar Mufth Bijli  योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट कोणती ?

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmsuryaghar.gov.in आहे.

  • Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna साठी  महाराष्ट्र सरकारने  किती बजेट ठेवले आहे? 
  •  

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 75000 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

Pm Surya Ghar Mufth Bijli Yojna निष्कर्ष:

पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजनेद्वारे  अशा राष्ट्राची कल्पना करूया जिथे प्रत्येक छत स्वच्छ आणि मुक्त ऊर्जेचा स्त्रोत बनण्यास आपली मदत होईल . सौर क्रांतीला एकत्रितपणे, शाश्वत आणि उज्वल भवितव्याचा  मार्ग प्रकाशित होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top