Chief Minister Vayoshree Yojna (मुख़्यमंत्री वयोश्री योजना )अंतर्गत ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आनंदाची वार्ता ! राज्य सरकार देणार महिना ३०००/- रुपये . त्वरित अर्ज करा आणि लाभ मिळवा ..!

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची वार्ता आली असून,फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत Chief Minister Vyoshree योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची वार्ता आली असून,फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत Chief Minister Vyoshree (मुख़्यमंत्री वयोश्री योजना ) योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

Chief Minister Vayoshree Yojna (मुख़्यमंत्री वयोश्री योजना )काय आहे ही योजना ?

 २,००,०००/- रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित असणाऱ्या 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल. 

 ज्येष्ठांमध्ये अपंग ,अशक्तपणा याचे  निराकरण करण्यासाठी,आवश्यक गोष्टींसाठी उपकरणे खरेदी करणे. 

 मानसिक स्वस्त संतुलित राखण्यासाठी मनोपचार  केंद्र व योगा उपचार केंद्राद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे . 

ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी  व शहरीभागासाठी आयुक्तांमाफर्त  या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

 आरोग्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल लाभार्थी व्यक्तीला ३,०००/-रुपये त्यांच्या बॅंकेत जमा करण्यात येतील.

Chief Minister Vayoshree (मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे) मुख्य वैशिष्ट्य कोणती ?

  • अंदाजे 480 कोटी रुपये खर्चून ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. 
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारने  सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेअंतर्गत लाभार्थी १५,००,०००/- शारीरिक व मानसिक अपंगत्व असलेल्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा  लाभ होणार आहे . 
  • ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि सहकारी संस्थांवरचा आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे. 
  • सहकारी संस्थांमध्ये आत्मविश्वास वाढवणे या योजनेअंतर्गत 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पात्र नागरिकांना ३,०००/- रुपयांची आर्थिक मदत मिळेल. 
  •  समाजातील असुरक्षित सदस्यांना अत्यंत आवश्यक असलेला आधार आणि दिलासा मिळेल. 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ४८० करोड़ चा बजेट निर्धारित करण्यात आला आहे !

  • सध्या महाराष्ट्र मध्ये सव्वा ते दीड कोटीच्या दरम्यान जेष्ठ नागरिकांची संख्या आहे. सरकारने ४८० रु/कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे.  राज्यातील मुख्यमंत्री वयोश्री (Chief Minister Vayoshree)योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवली जाणार आहे.
  • केंद्राची राष्ट्रीय वायोश्री  योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबविण्यात येते परंतु 

महाराष्ट्र सरकारची  मुखमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत राबवली जाणारआहे. 

  •  १५,००,०००/- जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

Chief Minister Vayoshree Yojna (मुख़्यमंत्री वयोश्री योजना )योजनेचा उद्देश !

  • मुख्यमंत्री वयोश्री  योजनेची घोषणा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती ,या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे .
  •  सरकारतर्फे जेष्ठ नागरिकांना वर्षाला 3000/-रुपये दिले जातील जे DBT द्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जाईल जेणेकरून अशा सर्व जेष्ठ नागरिकांना जे अंधत्वामुळे पाहू शकत नाही,नीट ऐकू शकत नाहीत, चालण्यास त्रास होतो या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यास सक्षम होण्यासाठी.  
  • कारण कमकुवत परिस्थितीमुले ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार उपकरणे खरेदी करता येत नाहीत ,मात्र आता राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही अडचणी शिवाय जीवन जगता येणार आहे, ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांची जीवन सुधारेल.

Chief Minister Vayoshree Yojna (मुख़्यमंत्री वयोश्री योजना ) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या उपकरणांची यादी.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना उपकरणे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 3000 रुपयाची आर्थिक मदत देणार आहे त्याद्वारे त्यांच्या गरजेनुसार उपकरणे खरेदी करू शकणार आहे.  

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र अंतर्गत उपकरणांची यादी खालील प्रमाणे आहे 

  • चष्मा
  • कमरे संबंधीचा पट्टा 
  • फोल्डिंग वॉकर
  • ग्रीवा कॉलर( मानेचा पट्टा)
  • स्टिक व्हीलचेयर
  • कमोड खुर्ची, 
  • गुडघा ड्रेस
  •  श्रवण यंत्र इत्यादी

Chief Minister Vayoshree Yojna (मुख्यमंत्री वयोश्री योजना) महाराष्ट्र 2024 साठी पात्रता कोणती लागू आहे ?

  • मुख्यमंत्री  वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे गरजेचे आहे . 
  • या योजनेसाठी राज्यातील ज्येष्ठ नागरिकच पात्र असतील. 
  • अर्जदारांची वय 65 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. 
  • अर्जदारांच्या कुटुंबांची वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये पेक्षा कमी असल्यास तो अर्ज करण्यास पात्र असेल. 
  •  उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा. 
  •  अर्जदाराची बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. 
  •  राज्यातील किमान 30 टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल

Chief Minister Vayoshree Yojna (मुख़्यमंत्री वयोश्री योजना )योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  •  आधार कार्ड 
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  •  ओळखपत्र 
  • स्वतःचे घोषणा प्रमाणपत्र 
  • समस्येचे प्रमाणपत्र
  •  बँक खाते पासबुक
  •  मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट आकाराचा फोटो

Chief Minister Vayoshree Yojna (मुख़्यमंत्री वयोश्री ) योजनेबद्दल विचारले जाणारे प्रश्न कोणते ?

१) मुख्यमंत्री वयोश्री  योजना म्हणजे काय ?

  • मुख्यमंत्री  वयोश्री योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत दिली जाईल. 

 

२) मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत महाराष्ट्रात किती आर्थिक मदत दिली जाईल ?

 

 मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांच्या आर्थिक मदत मिळणार आहे. 

 

3) मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभ कोणाला मिळणार आहे ?

  • मुख्यमंत्री वयोश्री योजने  अंतर्गत राज्यातील 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे.



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top