आता राज्य सरकार देणार ३ वेळेस मोफत LPG Cylinder, जाणून घ्या सर्व माहिती.

 राज्य शासनाच्या माध्यमातून सन 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत असताना Mukyamantri annapurna yojna राबवणीची घोषणा करण्यात आली होती जे योजनेचे अंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या 52 लाख 16 हजार महिला लाभार्थ्यांना मोफत LPG Gas Cylinder  दिले जात  होते तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र  कुटुंबाला देखील तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच दोन्ही योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत LPG Gas Cylinder देण्यासाठी सरकारने शासन निर्णय जरी केला आहे.

सरकारने आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. योजनेसाठी एका कुटुंबात शिधापत्रिकेप्रमाणे एक लाभार्थी पात्र असेल. हा लाभ १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या LPG Gas Cylinder ची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येणार आहे. 



Mukhyamantri Annapurna Yojne साठी लागणारी पात्रता:

  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी LPG Gas Cylinder जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे.

 

  • सद्यःस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लाख लाभार्थी या योजनेस पात्र राहतील. 

 

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे. 

 

  • एका कुटुंबात शिधापत्रिकानुसार केवळ एक लाभार्थी या योजनेसाठ पात्र असेल.

 

  • १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.



Mukyamantri annapurna yojna चा अर्ज कसा करायचा

  • पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी आधीच  अर्ज भरलेला आहे.

 

  • जी गठीत समिती नेमली जाईल त्या  समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे.

Mukhyamantri Annapurna Yojne योजनेची कार्यपद्धती

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलिंडचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल. 

 

  • केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य शासन ५३० रुपये प्रति सिलिंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांचा थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. 

 

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी यांना प्रति सिलिंडर ८३० रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. 

 

  • 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. दि.1 जुलै 2024 नंतर विभक्त करण्यात आलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

 

  • एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडर घेतल्यास अधिक सिलिंडरसाठी सबसिडी दिली जाणार नाही.




Mukhyamantri Annapurna Yojna समिती

  • जिल्हानिहाय सिलिंडरच्या किंमतीत फरक असल्यामुळे  तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलिंडरच्या किमतीच्या आधारावर जिल्हानिहाय सिलिंडरच्या किंमतीच्या आधारावर खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना देण्यात येईल. 

 

  •  जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलिंडर तपशिलाची प्रमाणित यादी, तेल कंपनीस प्रदान करायच्या रक्कमेत शिफारशीसह देयक, वित्तीय सल्लागार आणि उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांना सादर करावं लागेल .

 

  •  लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी ३ गॅस सिलिंडर बाजार भावाने देण्यात येईल. त्यानंतर पात्र कुटुंबांची माहिती दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेस तेल कंपन्यांनी द्यायची आहे.

 

  • संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल. या दोन्ही समिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे शिधापत्रिकेनुसार कुटुंब निश्चित करता येईल  . 
  •  .

 

  • लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी, आधार संलग्न बँकखाते क्रमांक निश्चित करण्यात येईल. 



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top