लाडका भाऊ योजनेचा (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) लाभ कसा घ्यायचा? अर्ज कुठे करायचा, कोण पात्र असणार?

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : राज्य सरकारनं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली. राज्य सरकारने सुरु केलेल्या Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana( लाडका भाऊ योजनेचा) मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे. बेरोजगार तरुणांसाठीची ही अप्रेंटिस योजना आहे.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल. या योजनेतंर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील 10 लाख तरुणींना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.



युवक त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल. प्रशिक्षित असं कौशल्य असलेलं  मनुष्यबळ आपल्या उद्योजकांना मिळेल. ते पैसे जे आहेत ते सरकार भरणार आहे. 

या योजनेसाठी 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.



Mukhyamantri Yuva Karya Prashikshan yojne ची पात्रता.

उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.

 

 उमेदवार बारावी उत्तीर्ण/आयटीआय /पदविका/ पदवी आणि पदव्युत्तर असावा.

 

शिक्षण चालू असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

 

आधार नोंदणी असावी, बँक खाते आधार कार्ड शी लिंक  असावे.

 

उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

 प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योग किंवा आस्थापनेकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. 



Mukhyamantri Yuva Karya Prashikshan yojneसाठी अर्ज कसा करायचा?

  • महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • नोंदणी करण्यासाठी  नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करा. 
  •  नोकरीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी  तुंमची माहिती भरा. 

 

  •  आधार कार्ड नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाका  बेसिक माहिती भरा . otp  पाठवले जाईल तुमच्या मोबाईल वरती टाकायचा आणि कन्फर्म बटणावरती क्लिक करा. वयक्तिक  माहिती आहे ती भरा. 
  •  स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक असाल तरी क्लिक करा . 
  • तुमची शैक्षणिक माहिती भरा . 
  • मोबाईल नंबर,  ईमेल आयडी  टाका. 
  •  तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे . खाते तयार करा . 
  •  लॉगिन करायचा आहे आधार आयडी किंवा रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला मेसेज सुद्धा आला असेल तर टाका किंवा आधार नंबर इथे टाका आणि जो पासवर्ड बनवला तो टाकून लॉगिन बटणावर क्लिक करा. 
  • वैयक्तिक माहिती असेल किंवा अन्य काही माहिती असेल तुम्ही इथे एडिट करू शकता. 
  •  तुम्ही कुठे काम केलं असेल किंवा कुठे काम करत असाल तर त्या कंपनीचे नाव वगैरे कोणत्या पोस्टला आहात किती पर्यंत काम केलेला आहे म्हणजेच तारीख वगैरे सिलेक्ट करावे लागेल. 
  •  तुम्हाला जॉब लोकेशन  तुम्हाला कोणत्या ठिकाणी जॉब हवा आहे ते लोकेशन सिलेक्ट करा . 
  • कापड गिरणी कामगार ,प्रकल्पग्रस्त वगैरे असाल तर ते टाका. 
  •  माझी सैनिक आहात का माझी सैनिक असाल ,खेळाडू असाल तर ती माहिती तुम्ही इथे ऍड करू शकता . 
  • बँकेचे माहिती टाका. 
  •  फोटो अपलोड  झाल्यानंतर तुम्हाला तुमचा बायोडाटा तयार करायचा आहे .. 
  •  माझे प्रोफाईल वरती क्लिक करायचे आणि ते राईट साईडला ,जनरेट रिसिप्ट वरती क्लिक करा. 
  •  एम्प्लॉयमेंट कार्ड आलेला दिसेल . डाउनलोड  करा 
  • लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan yojne ची ( ‘लाडका भाऊ’ योजना ) आवश्यक कागदपत्रं ?

  • वय प्रमाणपत्र
  • निवास प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • बँक खाते पासबुक
  • ई-मेल आयडी

प्रशिक्षणानंतर उमेदवारांचे पुढे काय?

  • उमेदवारानं कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली की, आस्थापना, उद्योग किंवा महामंडळामार्फत उमेदवारांना कुशल व अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल.

 

  • या प्रशिक्षणचा कालावधी 6 महिने असेल. सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.

 

  • प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल.

  प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेतील. 

 

  • या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही.



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top