ज्येष्ठ नागरिकांना शासनाने Mukhyamantri Tirth Darshan Yojna राबवून मोठी आनंदाची बातमी दिली आहे ,तसे कारण हि आहे ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करता येणार आहे.
प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते कि, चार धाम यात्रा तसेच आपले जे आराध्य आहेत त्यांना जे मानतात, त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे,परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. महाराष्ट्रामध्ये Mukhyamantri Tirth Darshan Yojna ही राबवण्यात आली आहे.
देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा आता जेष्ठांना करता येणार आहे.
Mukhyamantri Tirth Darshan Yojna काय आहे
- या संदर्भात रविवारी सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
- तसेच या योजनेच्या राज्य स्तरावरील सनियंत्रणाचा आढावा घेण्याकरिता राज्य स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.
- योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती कार्यरत असणार आहे.
- सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सदस्य सचिव असणार आहेत,तसेच राज्यस्तरावर आयुक्त समाजकल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
Mukhyamantri Tirth Darshan Yojna योजनेची वैशिष्ट्ये
- राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्याची संधी मिळणार आहे.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित करून दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे,तोही एक वेळेस असेल.
- तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास. भोजन. निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल.
Mukhyamantri Tirth Darshan Yojna पात्रता:
- लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे.
- लाभार्थीचे वय वर्ष साठ किंवा वरील ज्येष्ठ नागरिक असावा.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
Mukhyamantri Tirth Darshan Yojna योजनेचा लाभ कसा घ्यावा!
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत.
- बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी (IRCTC) अशा अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.
- प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येणार आहे.
- लाभार्थी प्राप्त झालेल्या अर्जांच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे.
- ७५ वर्षावरील पात्र व्यक्तीला त्याच्यासोबत जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत तो नेऊ शकेल.
- ज्याांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रकिया विनामूल्य असेल.
- अर्जदाराने उपरोक्त ठिकाणी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्याांचा फोटो काढता येईल कारण KYC करता येईल.
- कुटुंबाचे ओळखपत्र (रेशनकार्ड )
- आधारकार्ड
Mukhyamantri Tirth Darshan Yojna या योजनेसाठी कोण अपात्र
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भरत income Tax आहेत .
- कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमसरकारी सेवेत कार्यरत आहेत.
- ज्यांना निवृत्तिवेतन मिळत आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
- ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत.ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
निष्कर्ष :
गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे त्या ठिकाणाची माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्य शासन हे राज्यातील गरीब लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आहे .