महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ,महिला या घरातील स्वयंपाक घर पाहतात. त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिलांना टेन्शन येतं.खर्च वाढल्याने महिलांना पैशांचं नियोजन काटकसरीने करावं लागतं.राज्य सरकारच्या Mukhyamantri Annapurna Yojna या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत उलब्ध करून देणार आहे. ही Mukhyamantri Annapurna Yojna पर्यावरण संरक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल. असं सांगितलं. योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही. या योजनेसाठी काही नियम आहेत. योजनेचा शासन निर्णय सरकार लवकरात लवकर काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अद्याप याचा शासन निर्णय काढण्यात आला नाही.
स्वच्छ इंधनासाठी एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे, त्यामुळं त्याचा वापर वाढणं गरजेचं आहे. .त्यासाठी राज्य सरकारडून गॅस सिलिंडर प्रत्येक घराला परवडायला हवा यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.
Mukhyamantri Annapurna Yojna या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेतून राज्यातील ५६ लाख १६ हजार कुटुंबाना फायदा होणार .
Mukhyamantri Annapurna Yojna कोणाला लाभ मिळणार:
- राज्य सरकारने पात्र कुटुंबांना वर्षाला तब्बल 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत मिळणार. या योजनेतून राज्यातील ५६ लाख १६ हजार कुटुंबाना फायदा होणार असल्याची माहिती.
- पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला ३ सिलेंडरचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.