महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी ,गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी या योजनेची घोषणा केली. सरकार हि योजना राबवणार आहे. १ जुलै 2024 पासून आपण हा अर्ज करू शकतो. mukhyamantri Mazi ladki bahin yojane योजनेमार्फत प्रत्येक महिन्याला १५०० रुपये लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा होणार . दारिद्र रेषेखालील २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिला, विधवा, घटस्फोटितांना लाभ होणार आहे. mukhyamantri Mazi ladki bahin yojana ९० ते ९५ लाख महिलांना या योजनेचा फायदा भेटणार आहे.
कोण अर्ज करू शकतो
21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार.
mukhyamantri Mazi ladki bahin yojane साठी पात्रता
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
- कमीत कमी २१ वर्ष ते जास्तीत जास्त६० वर्ष वयाची महिला अर्ज करू शकते.
- लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
mukhyamantri Mazi ladki bahin योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला अपात्र आहेत.
- वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या स्त्रिया अपात्र आहेत.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य income tax भरत असणाऱ्या स्त्रिया अपात्र आहेत.
- कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, , भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असणाऱ्या स्त्रिया.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या केंद्रीय तसेच राज्य विभागामार्फत आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये जास्त लाभ घेतला असेल तर ती या योजनेस अपात्र .
- सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असतील असे कुटुंबातील स्त्रिया.
- कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणात्या स्त्रिया. .
- चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अस्या घरातील स्त्रिया.
mukhyamantri Mazi ladki bahin yojana साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र
- महाराष्ट्रातील जन्म दाखला.
- कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशन कार्ड
- अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
mukhyamantri Mazi ladki bahin yojana चा अर्ज कसा भरायचा?
- मोबाईल app , सेतू सुविधा केंद्रातुन ऑनलाईन अर्ज करता येईल.
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते.
- जर महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, सेतू सुविधा केंद्रातुन भरता येईल.
- अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे. कारण तिचा थेट फोटो काढता येईल व ई केवायसी करता येईल.
- कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड
- स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
mukhyamantri Mazi ladki bahin yojana अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया
विनामूल्य आहे.