राज्य सरकार मध्यप्रदेश मध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना ही योजना महाराष्ट्रात Mukhyamantri Ladki Bahin Yojna राबवण्याचा विचार करत आहे . विशेष करून महिला वोट बँक वर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केले गेले आहे .
मध्यप्रदेशात च्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा समाजातील गरीब महिलांसाठी Mukhyamantri Ladki Bahin Yojna राबवण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे. पावसाळी अधिवेशनात योजनेची घोषणा करण्याची तयारीत राज्य सरकार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आर्थिक दुर्बल घटकांना प्राधान्याचे लक्ष दिले जात आहे गरीब समाजातील महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी Mukhyamantri Ladki Bahin Yojna राबवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
समाजातील गरीब निराधार विधवा महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला १२०० ते १५०० रुपये दिले जाणार आहेत ही योजना अमलात आणल्यावर महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर वर्षाला १५ ते २०,००० कोटींचा आर्थिक भर पडू शकतो .
Youtube Video पाहण्यासाठी येथे Click करा. https://www.youtube.com/watch?v=WOayzlhSJis&t=12s
मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री आताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना ही मध्य प्रदेश मध्ये सुरू केली होती . योजनेच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील जे गरीब महिलांना १२५०रु. मदत केली जाते आणि मध्य प्रदेशांमध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि या योजनेच्या जोरावर शिवराज सिंह चव्हाण मध्य प्रदेशाची विधानसभा निवडणूक बहुमतान जिंकली. महिला मतदारांनी त्यांना भरपूर प्रतिसाद केलं आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला 29 पैकी 29 जागावर विजय मिळवता आला . मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच हि योजना अमलात आणली होती या योजनेमुळे मध्य प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं आहे . विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिचा फायदा दिसून आलेला आहे आणि ही योजना यशस्वी झाली आणि तिचा लोकांनी खूप प्रतिसाद दिला म्हणून आणि आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्येही मध्येही अशीच एक योजना राबवण्याचे सरकार सुरुवात करत आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि याच्या संदर्भातील काही जे प्रस्ताव असतील किंवा जे काही निर्णय असतील ते करण्यात येऊ शकतात. महिला वर्ग नाराज असल्यामुळे जर महिला वर्ग जर खुश झाला तर याचा एक मोठा फायदा आपल्या शासनाला भेटू शकेल.
योजना नक्की काय आहे?
- महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी ,गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी योजना आखली आहे.
- प्रत्येक महिन्याला १२०० ते १५०० रुपये लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा होणार .
- दारिद्र रेषेखालील २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिला, विधवा, घटस्फोटितांना लाभ होणार आहे.
- ९० ते ९५ लाख महिलांना या योजनेचा फायदा भेटणार आहे.