Pradhan Mantri Fasal Bima Yojane अंतर्गत फक्त एक रुपयात एका पिकाचा पीक विमा  करून घ्या; ह्या पिकांना देण्यात येत आहे विमा संरक्षण,पीकविमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे.

नैसर्गिक आपत्ती कधी  दुष्काळ तर काही वेळा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते,तसेच अनेक  कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असते, अशा वेळी शेतकऱ्यांना पिकाची नुकसान  भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या तोडगा म्हणून Pradhan Mantri Fasal Bima Yojana सुरू करण्यात आली आहे.  

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता  Pradhan Mantri Fasal Bima Yojana  कृषी विभागामार्फत राबवली जाते या पूर्वी  पीकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती,परंतु आता 2023-24 पासून शेतकऱ्यांना फक्त  एक रुपया भरावा लागणार आहे, उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे.त्यामुळे  इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत  विमा हप्त्याच्या ऐवजी किमान एक रुपयाचे टोकन आकारले जाईल.आता शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पिक  विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.  पीकविमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले पीक विमा  करणे गरजेचे आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojaneअंतर्गत  १४ पिकांसाठी विमा करता येईल?

आपण जी शेती करतो ती पावसावर, तसेच निसर्गावर आपल्याला अवलंबून राहावे लागते, आपल्या आयुष्यात आरोग्य विमा गरजेचा झाला आहे, त्याच पद्धतीने पीक विमा सुद्धा गरजेचा झाला आहे  (Pradhan Mantri Fasal Bima Yojana). या सर्व पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत राज्यात खरीप पिकांसाठी विमा भरण्याची सुरुवात झाली आहे.  

या अंतर्गत १४ पिकाचा समावेश करण्यात आला आहे. 

कापूस, तूर, मूग, उडीद,मका, बाजरी, नाचणी,  भात, ज्वारी, सोयाबीन,  भुईमूग, तीळ, कारले, कांदा ही 14 पिके पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या पिकांचा विमा भरण्याची शेवटची तारीख  १५ जुलै आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला विमा भरून घ्यावा.

 

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजने नुसार खरीप हंगाम 2023-24 ते रब्बी हंगाम 2025-26 साठी ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’राबविण्यास राज्य शासनाने 26 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला विमा भरून घ्यावा

 

                           आवश्यक कागदपत्रे पीक विम्यासाठी

  • पीकपेरा स्वयंघोषणापत्र

 

  • आधार कार्ड

 

  • सातबारा व एकूण जमिनीचा दाखला

 

  • बँक पासबुक




Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top