गावचा नमुना नंबर ७/१२ व ८ अ मालमत्ता पत्रक जर आपल्याला पाहायचं असेल तर bhulekh mahabhumi आपण येथे जाऊ शकता . महाराष्ट्र भूमी अभिलेख ७/१२ व ८ अ मालमत्ता पत्रक उतारा ऑनलाईन आपण तपासू शकतो .
तसेच राज्य सरकारने महाराष्ट्र भूमी अभिलेख ऑनलाईन सुविधा आपल्याला प्रदान केलेली आहे , हे पोर्टल आपल्याला घरी बसून भू अभिलेख आपण पाहू शकतो किंवा त्याची प्रिंट करण्याची संधी आपल्याला दिली आहे.
महाराष्ट्रातील अनेक लोकांना या पोर्टल विषयी माहिती नाही ह्या पोर्टलवरून आपण आपल्या जमिनीचा रेकॉर्ड ऑनलाईन चेक करू शकतो आणि याचा आपण लाभ घेऊ शकतो.आपण पाच मिनिटांमध्ये ७/१२ व ८ अ मालमत्ता पत्रक रेकॉर्ड घरबसल्या आपल्याला मिळू शकतो. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांचा यामध्ये समावेश आहे .आपल्याला आपल्या मालकीच्या जमिनी ची फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
जमिनीची खरेदी करताना आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे ७/१२ फॉर्म ज्याला आपण ७/१२ उतारा असे म्हणतो ROR (Record of Rights) महाराष्ट्रातील कोणत्याही मालमत्तेची सर्व संबंधित माहिती असते. गाव नमुना ७ मध्ये शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे किंवा किती जमिनीवर त्याचा अधिकार आहे हे नमूद केलेले असते.तसेच गट क्रमांकही दिलेला असतो आणि कोणत्या भूधारण पद्धती अंतर्गत ही जमीन येते याची माहिती असते. गाव नमुना 12 यामध्ये पिकांची नोंदवही असते. कोणती वर्षी किती पिक घेतली,किती क्षेत्रावर घेतली,याची नोंद असते, तसेच जलसिंचनाच्या स्रोताबाबत माहिती असते.
bhulekh mahabhumi दस्तावेजक शोधणे डाउनलोड करण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ आहे ७/१२ उतारा.
७/१२ महाभूलेख का महत्वाचा आहे ?
- ७/१२ हे नाव महाराष्ट्र जमीन महसूल नियमावलीतून आले आहे. उतारा सात आणि बारा क्रमांक गाव फॉर्म क्रमांक दर्शवण्याचे काम करतो.
- जमिनीचा सर्व्हे नंबर, जमिनीचे क्षेत्रफळ,लागवडीचा प्रकार जमिनीच्या मालकाचे नाव तसेच लागवड करणाऱ्याचे नाव, हंगामात लागवड केलेल्या पिकांची माहिती या अर्कातून आपल्याला मिळते.
- ७/१२ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जमिनी खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना ७/१२ उतारा हा दस्तावेज अति महत्त्वाचा असतो ,तसेच व्यवहारातील सर्व पक्षांनी समजून घेणे गरजेचे आहे त्याचा उपयोग पूर्वजांना जमिनीबद्दलचे तसेच जमिनीच्या मालकीबद्दल महत्त्वाची माहिती इथे भेटू शकते .
- तसेच कोणतेही थकबाकीचे खटले भूतकाळातील संघर्ष,खटले किंवा कोणी त्या जमिनीवर दावा ठोकळा असेल तर जमिनीचे कायदेशीर स्थिती आपल्याला पाहता येईल.
- गृह खरेदीदारांना खरेदी करण्यापूर्वी मालमत्तेची संबंधित माहिती मिळेल तसेच फसवणूक होते ती कमी होईल .
- वापर करताना प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार संपूर्ण क्षेत्र अधिकार शोध कार्य अपलोड आणि लिंक करण्याचे काम करत आहे .
.
आपल्या जमिनीचा Online ७/१२ कसा पाहणार:
- तुमच्या अर्ज स्थितीचा मागोवा घेण्यासाठी, वापरकर्त्याने खालील चरणांचे पालन करणे आवश्यक आहे:महाभूलेख विना स्वाक्षरीत 7/12 उतरा ८अ व मालमत्ता पत्रक ऑनलाइन बघण्यासाठी www.bhulekh.mahabhumi.gov.in जा.
- तुम्ही तुमचा विभाग निवडा. (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे)
- तुमचा विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- सातबारा उतारा पाहण्यासाठी आपल्याला सर्वे नंबर/ गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव असे पर्याय पहायला मिळतील.
- तुम्हाला तुमच्या गावातील एकूण नावे म्हणजे संपूर्ण गावातील सातबारे ची यादी बघायची असेल तर संपूर्ण नाव हा पर्याय निवडा.
- सर्वे नंबर/गट नंबर निवडा.
- गट नंबर सर्वे नंबर निवडल्यावर शोधा या बटणावर क्लिक करा.
- तुमचा योग्य गट नंबर सर्वे नंबर निवडा कारण काही गटांमध्ये अ, ब, क किंवा एक, दोन, तीन असे पर्याय पाहायला मिळतील.
- नोंदणीसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर योग्य पद्धतीने टाईप करा.
- Captcha योग्य पद्धतीने बरोबर टाईप करा व Verify captcha to view 7/12 वर क्लिक करा.
- ७/१२ अर्जाचा फॉर्म उघडेल.
- आता, अर्जदाराचे नाव, आधार कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी सर्व आवश्यक तपशील व फॉर्म भरा.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यावर ,पेमेंट विंडो उघडेल.आता, इच्छित पेमेंट भरू शकता .
- एकदा फी यशस्वीरित्या भरल्यानंतर, तुमचे नाव ७/१२अर्क यादीमध्ये नमूद केले जाईल.
- Bhulekh mahabhumi वेबसाईटवर दर्शविलेली ऑनलाइन माहिती ही कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर बाबींशी वापरता येणार नाही.
- आपल्याला कायदेशीर व शासकीय बाबतीत माहिती वापरासाठी सातबारा उतारा महाभुमी वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in वरून मिळेल.
८ अ मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी:
- महाराष्ट्र शासन महाभुमी वेबसाईट- www.bhulekh.mahabhumi.gov.in वर जा.
- तुमचा विभाग निवडा (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे)
- विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- तुमचा खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव यापैकी कोणत्याही एका ची निवड करा.
- ८अ नोंदणीसाठी मोबाईल नंबर लिहा व ८अ वर क्लिक करा.
- कॅपच्या योग्य पद्धतीने टाईप करा व Verify captcha to view 8A वर क्लिक केल्यावर गाव नमुना ८-अ धारण जमिनींची नोंदवही दिसेल.
- महाभुमी वेबसाईटवर दर्शविलेली माहिती ही तुम्हाला शासकीय किंवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही.
- कायदेशीर किंवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी 8 अ उतारा महाभुमी वेबसाईटवर तुम्ही मिळवू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
- ७/१२ चा उतारा म्हणजे काय ?
- सातबारा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला मिळू शकतो. मालमत्तेबद्दल सर्व माहिती प्रदान करतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी जतन केल्या जातात.
- उतारा ७/१२ मध्ये स्वतःचे नाव कसे जोडू शकतो?
- ७/१२ मध्ये नाव जोडण्यासाठी पुरावा म्हणून संबंधित मालमत्तेच्या कागदपत्रांसह भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे अर्ज करणे गरजेचे आहे. फेरफारामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या पक्षांनी कोणताही आक्षेप नाही घेतल्यास, तलाठी अनुमोदन करतो आणि ७/१२ नोंदी तयार केल्या जातात.
- महाभूलेख हे महाराष्ट्रातील नवीन वेब पोर्टल काय आहे?
- आपल्याला भूमि रेकॉर्ड mahabhulekh.maharashtra.gov.in या वेबसाइटवर प्राप्त होत होते, आता आपल्याला जमीनचा रेकॉर्ड नवीन वेब पोर्टल bhulekh.mahabhumi.gov.in वर मिळेल.
.
निष्कर्ष:
आपल्याला सरकारने जमिनीबाबत असणारा ७/१२ तसेच ८ अ संबंधीत असणारी वेबसाईड सुरु करून आपल्याला जमिनीबाबत माहिती घरबसल्या मिळू शकते.
बेबसाईलला visit करून ती माहिती प्राप्त करू शकता. हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळतो.