महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी आणि पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान देण्याचे ठरवले आहे. गाई गोठा योजनेअंतर्गत कमीत कमी २ते ६ गुरानंसाठी एक गोठा बांधून देण्याचा निर्णय शेतकरी बांधवांना सरकारने केलेला आहे . शेतकरी बांधवाना ७७ हजार १८८ रुपये अनुदान दिले जाणार आहे .
तसेच शेतकरी बांधवांकडे जर सहा पेक्षा अधिक गुरे असतील तर त्यांच्यासाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान देण्याचे सरकारने घोषित केले आहे.
Gai Gotha Anudan Yojana महाराष्ट्र 2024:
- या योजनेअंतर्गत गाय गोठा योजना फॉर्म ,त्याचे फायदे, तसेच पात्रता , सबसिडी . आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी पशुपालन गोठा बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे .
- महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी आणि पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी गाईगुरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल, राज्यातील बहुतेक नागरिक या गाई म्हशींचे पालन करतात, तसेच शेतकरी शेती सोबत गाई म्हशींचे पालन करतो . ग्रामीण भागात बहुतांशी गोठांमध्ये व्यवस्थितरित्या सोयी नसल्याकारणाने जनावरांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो ,हि समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी गोठा गाय गोठा अनुदान देऊन गाई म्हशींचे पालनपोषण करणार्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे .
- शेतकरी बांधवांना त्यांच्या जनावरांसाठी पक्क्या स्वरूपत गोठा बांधून तसेच शेड उभारण्याकरता लागणारे अनुदान देण्याचे ठरवलेले आहे.
- शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारचा आहे ,महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेची एकत्रित करून ही योजना राबविण्यात येत आहे केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. .
Gai Gotha Anudan Yojana Maharashtra महत्वाचे कागदपत्रे :
आधार कार्ड
राशन कार्ड
महाराष्ट्राचा रहिवासी दाखला
जातीचा दाखला
बँक खाता पासबुक
पासपोर्ट साइज फोटो
नरेगा ओळखपत्र
मोबाइल नंबर
ग्रामपंचायत शिफारस पत्र
याआधी जनावरांच्या गोठ्यांचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र
पशुधन पर्यवेक्षक सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र
जनावरांसाठी गोठा ,शेड बांधण्याचे अंदाजपत्रक
Gai Gotha Anudan Yojana Maharashtra 2024
योजनेचे नाव | Gai Gotha Anudan Yojana |
लाभार्थी | राज्यातील ग्रामपंचायतीतील नागरिक |
उद्दिष्ट | ग्रामीण भागात राहणारे शेतकरी आणि पशुपालकांचा विकास करणे. |
अनुदान | ७७ हजार रुपये |
योजना कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
Gai Gotha Anudan Yojana Maharashtra 2024 अर्ज प्रक्रिया :
- अर्जदाराला त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज मिळेल.
- ग्रामसेवकाकडून गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जदाराला आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- अर्जावर ग्रामसेवक, तलाठी, ग्राम स्वयंरोजगार सेवक आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सह्या घ्याव्या लागतात.
- ज्या ठिकाणी गोठा बांधायचा आहे त्या ठिकाणचा आराखडाचा फोटो तुम्हाला अर्ज सोबत जोडावा लागेल.
- स्वाक्षरी घेतल्यानंतर तुम्हाला हा अर्ज ग्रामसेवकाकडे ,पंचायत समितीकडे जमा करावा लागेल.
- अर्जदाराने केलेल्या अर्जांची यादी त्याच्या ग्रामपंचायत मध्ये पाहायला भेटेल.
- जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
निष्कर्ष:
जे लोक किंवा शेतकरी किंवा पशुपालन करत आहे,त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा.
यायोजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन या लोकांसाठी अनुदान देत आहे,तर योजनेचा फायदा शेतकरी किंवा पशुपालन करणार्यांना मिळावा.
धन्यवाद.