MHADA च्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत व प्रधानमंत्री आवास योजना एकूण घरांची ४,८८२ विक्रीसाठी पुणे महामंडळातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्वरित अर्ज करा.
प्रत्येक व्यक्तीचं असं स्वप्न असतं की मुंबई, पुणे शहरांमध्ये आपलं स्वतःचं घर असावं पण ते प्रत्येकाला जमतच असे नाही म्हणून सरकारतर्फे नवनवीन योजना राबवल्या जातात . तसेच घरांसाठी स्पर्धाही चालू असते म्हाडा तर्फे घर भेटणे ही एक आनंदाची गोष्ट आहे.
MHADA लॉटरी बद्दल माहिती.
MHADA लॉटरी योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना परवडणारी घरे प्रदान करते .MHADA तर्फे फॉर्म भरला तर आपल्याला कुठल्याही गोष्टींची फसवा फसवी होत नाही,आपल्याला अधिकृत घर भेटते तर या म्हाडाच्या फॉर्म भरण्या करता कोणकोणत्या पात्रता ,अटी, कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या लेखात पाहणार आहोत.
तसेच प्रथम म्हाडाच्या घरांच्या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येते.
अर्ज करणे अर्ज ७ मार्च २०२४ रोजी सोडती मध्ये पुणे, सातारा ,सांगली ,कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून पुण्यात 775 आणि पिंपरी चिंचवड मध्ये ५६१ घरे उपलब्ध आहेत.
पुणे लॉटरी विजेता निवडण्यासाठी ड्रॉ वापरला जातो तसेच अर्जदारांमध्ये भूखंड आणि अपार्टमेंटचे वाटप केले जाते ८ मार्च २०२४ ते ८ एप्रिल २०२४ पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज प्रवेशाची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे.
TABLE OF CONTENT
1 MHADA म्हाडा पुणे २०२४ लॉटरी विषयी माहिती.
2 अर्ज प्रक्रिया.
3 अधिकृत वेबसाईट
4 MHADA पुणे २०२४ म्हाडाच्या पुणे लॉटरीच्या महत्त्वाच्या
तारखा.
5 Mhada पुणे २०२४ लॉट्री नोंदणी शुल्क.
6 Mhada पुणे २०२४ लॉटरी अर्जाचे शुल्क.
7 Mhada पुणे २०२४ लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे.
8 Mhada पुणे २०२४ लॉटरीसाठी पात्रता.
9 Mhada पुणे २०२४ लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया.
10 निष्कर्ष.
म्हाडाच्या पुणे लॉटरीच्या महत्त्वाच्या तारखा :
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख |
८ मार्च २०२४ |
---|---|
अर्ज करण्याची शेवटची तारीख |
८ एप्रिल २०२४ |
पेमेंट सुरू होण्याची तारीख |
८ मार्च २०२४ |
ऑनलाइन पेमेंट शेवटची |
१२ एप्रिल २०२४ |
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी |
२४ एप्रिल २०२४ |
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी |
३० एप्रिल २०२४ |
लॉटरी सोडतीची तारीख |
८ मे २०२४ |
Mhada पुणे लॉट्री नोंदणी शुल्क खालीलप्रमाणे:
उत्पन्न गट |
नोंदणी शुल्क |
आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग |
५,००० रु. |
निम्न उत्पन्न गट |
१०,००० रु. |
मध्यम उत्पन्न गट |
१५,०००रु. |
उच्च उत्पन्न गट |
२०,०००रु. |
Mhada पुणे २०२४ लॉटरी अर्जाचे शुल्क.
अर्जदाराने त्यांच्या निवडलेल्या म्हाडा पुणे लॉटरी योजनेसाठी अर्ज करताना अर्ज शुल्क 600 रुपये आणि 18% GST नॉन रिफंडेबल असेल.
Mhada पुणे २०२४ लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे:
मोबाईल नंबर Adhaar Card शी लिंक केलेला असावा.
ईमेल पत्ता: ईमेल वर OTP येत असल्याकारणामुळे तुमच्याकडे ई-मेल I . D. असणे गरजेचे आहे. लॉटरी संदर्भातील इतर माहिती ईमेल आयडीवर पाठवली जाते
आधार कार्ड असणे असणे गरजेचे आहे. विवाहित असल्यास जोडीदाराचे आधार कार्ड आवश्यक आहे.
पॅन कार्ड पॅन वर वाचनीय आणि स्वच्छ चित्र अपलोड केलेले आवश्यक आहे.
विवाहित असल्यास पत्नीच्या पॅन कार्ड ची स्पष्ट प्रतिमा अपलोड असणे गरजेचे आहे
रहिवासी दाखला (Domicile) : महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र एक जानेवारी 2018 नंतर जारी झालेले ग्रह धरण्यात येणार आहे ऑनलाइप्रणाली द्वारे जारी केलेले बार कोड असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ,नसल्यास अधिवास टोकन स्वीकारले जाणार नाही.
जात प्रवर्गातील आरक्षण अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती या प्रवर्गासाठी अर्ज करू शकतात. जात प्रवर्गामध्ये नोंदणी करताना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे . जर अर्जदाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर नाही हा पर्याय निवडून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतो. जर सोडतीत विजेते झाल्यांनतर अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्र जमा करावयाचे आहे.
उत्पन्न प्रमाणपत्र 2022-23 करिता ऑनलाइन प्रमाणे दारी जारी केलेल्या असावी व त्यावर बारकोड असलेले प्रमाणपत्र अपलोड करावी लागेल.
बँकेचा रद्द केलेला चेक अथवा पासबुकचे पहिले पान .
पासपोर्ट फोटो (५० kb साइज पर्यंत).असणे आवश्यक आहे.
Mhada पुणे २०२४ लॉटरीसाठी पात्रता :
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असलेला व्यक्ती लॉटरी साठी अर्ज करू शकतो.
- महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून त्यांच्या निवासी स्थितीची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराने अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे पॅन कार्ड वैध असणे आवश्यक आहे.
- कमी उत्पन्न गटातील फ्लॅटसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी २५०००/ किमान मासिक उत्पन्न रु. ५०,०००/-च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- मध्यम-उत्पन्न गटाच्या फ्लॅटसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्याअर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न रु.५०,००० आणि रु. ७५०००.च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- उच्च उत्पन्न गटाच्या फ्लॅट घेण्यासाठी, अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न रु. ७५,०००रु. असणे आवश्यक आहे.
Mhada पुणे २०२४ लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया
- म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्ही साइन इन करण्यासाठी तुमचा पॅन कार्ड नंबर टाका तुमच्या ईमेल आयडी तसेच मोबाईलवर ओटीपी येईल तो व्यवस्थित रित्या समाविष्ट करा.
- तुमचा आधार क्रमांक टाका ,आधार कार्ड चा फोटो आणि आधार नंबर स्पष्ट असावा.
- तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल, सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज PDF फॉरमॅटमध्ये जतन करून ठेवा.
निष्कर्ष :
अशाप्रकारे आजच्या या लेखात आपण संपूर्णपणे म्हाडा लॉटरी पुणे 2024 बद्दल माहिती पाहिली. दिलेल्या माहितीनुसार फॉर्म भरून आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करू शकता. धन्यवाद.