Maharashtra Police Bharti 2024 (महाराष्ट्र पोलीस भरती २०२४) अंतर्गत १७,४७१ रिक्त पदे भरण्यात येत आहेत वाचा त्याबद्दलची सविस्तार माहिती !

Maharashtra Police Bharti 2024 ची अधिसूचना जारी करण्यात आली असून ती, महाराष्ट्रातील पोलीस दलात भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी प्रदान करत आहे.महाराष्ट्र पोलिस दलात भर्ती होऊन देशसेवा करू पहाणारया युवकांसाठी सुवर्ण संधी. राज्य पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस भरती सार्वजनिक केली आहे आणि लवकरच परीक्षा आयोजित केली जाईल इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे.आजच्या ह्या लेखात आपन सविस्तर माहिती घेऊ.

MAHARASHTRA POLICE BHARTI 2024

Maharashtra Police Bharti 2024 साठी अर्ज करण्याचा कालावधी किती आहे ?

 

पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल,बँड्समन, आणि जेल वॉर्डन या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२४ ते शेवटची तारीख  ३१ मार्च २०२४ पर्यंत फॉर्म भरू शकता.  



Maharashtra Police Bharti 2024साठी अर्ज कसा करावा?

  • Maharashtra Police Bharti 2024 करीता महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकृत वेबसाइट https://www.mahapolice.gov.in ह्या संकेतस्थळावर भेट देने आवश्यक आहे. 
  • लॉग इन केल्यावर  पर्यायांच्या यादीतून तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे ते निश्चित करा,जसे  कि “महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024”साठी करायचा असेल तर त्याला प्राधान्य द्या आणि घोषणा काळजीपूर्वक वाचा. 
  • ऑनलाइन अर्ज  लिंकवर क्लिक करा.आवश्यक असलेली माहिती समाविष्ट करून अर्ज पूर्ण करा.


  • स्वाक्षरी आणि फोटोंसह आवश्यक फाइल अपलोड करून त्या अर्जाची फी लागू असल्यास भरा.
  • शेवटी, आवश्यक असलेल्या कोणत्याही दुरुस्त्यांकरिता अर्जाचे फॉर्म पुन्हा एकदा पुनरावलोकन करा, ते सबमिट करा आणि ते जतन करून ठेवा.  

Maharashtra PoliceBharti 2024 लागणारी आवश्यक कागदपत्रे:

 

आपणास अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरत असताना आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच ग्राउंड चाचणी साठी मुख्य कागदपत्रे कोणती याबद्दलची माहिती जाणून घेऊ.खाली नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.



  • १० वी /१२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. 
  • पॅन कार्ड.
  • आधार कार्ड.
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
  • शाळेत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
  • पदवी परीक्षेचे गुणपत्रक (पदवीधर असल्यास)
  • पदव्युत्तर पदवी असल्यास त्याची मार्कशीट.
  • ITI डिप्लोमा असेल तर मार्कशीट.
  • महिलांसाठी 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र.
  • महिलांचे लग्न झाले असे तर नावाची गॅझेट कॉपी.
  • होमगार्ड प्रमाणपत्र.
  • जन्म दाखला.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • जात प्रमाणपत्र.
  • जात वैधता  प्रमाणपत्र .
  •  NCC प्रमाणपत्र. 
  • अर्जदाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र.
  • माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र.
  • खेळाडू प्रमाणपत्र.
  • गृहरक्षक दलाकरिता आवश्यक  कागदपत्रे .
  • प्रकल्पग्रस्त असल्यास प्रमाणपत्र.
  • भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र.
  • माजी सैनिक आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र.
  • वडील पोलीस असल्यास प्रमाणपत्र.
  • आर्थिक दृष्ट्या द्रुबल असेल तर EWS प्रमाणपत्र.

 

Maharashtra Police Bharti 2024 अर्ज करण्याचा कालावधी.

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ५ मार्च २०२४

 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम  तारीख: ३१ मार्च २०२४

Maharashtra PoliceBharti 2024 अर्ज फी

खुल्या प्रवर्गातील  नोंदणी शुल्क              : रु. ४५०


मागासवर्गीयांसाठी नोंदणी शुल्क         : रु. ३५०

Maharashtra Police Bharti 2024 साठी लागणारी वयोमर्यादा

खुला वर्गातील  उमेदवारांसाठी वयाची मर्यादा १८ ते २८ वर्षे आहे.तसेच ,आरक्षित श्रेणी आणि इतर विशिष्ट गटांमधील उमेदवारांसाठी वय शिथिलता लागू आहे.ते आपण थोडक्यात चार्ट च्या माध्यमातून समजून घेऊ

Maharashtra Police Bharti 2024 साठी शारीरिक पात्रता.

 

पुरुष

उमेदवारांकरिता 

महिला उमेदवारांकरिता 

उंची

१६५ से.मी. पेक्षा कमी नसावी.

१५५ से.मी. पेक्षा कमी नसावी.

Maharashtra Police Bharti 2024 निवड प्रक्रिया.

  • लेखी परीक्षा.


  • शारीरिक पात्रता चाचणी.


  • वैद्यकीय चाचणी.


  • दस्तऐवज पडताळणी.


  • गुणवत्ता यादी.

Maharashtra Police Bharti 2024 निष्कर्ष.

Maharashtra Police Bharti  2024 ही युवकांसाठी एक उत्तम संधी आहे ,जे उमेदवार आपली  सरकारी नौकरीची स्वप्ने पूर्ण करु पाहत आहेत अशा उमेदवारांना एक सुवर्ण संधी आहे. योग्य तयारी आणि स्वतंत्र मार्गदर्शनासह, उमेदवार  या संधीचे रुपांतर स्वतःसाठी चिरस्थायी यशात करू शकतील ,त्वरीत अर्ज  करा, तुमचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार व्हावे यासाठी अनेक शुभेछा ! 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top