Holi हा सण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतात खूप मोठ्या आनंदात साजरा जातो. होळी या सणाला होळी पौर्णिमा, होलिकादहन,होलिकोत्सव, हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “शिमगा,”कामदहन”,अशी विविध नावे आहेत. यावर्षीची होळी रविवार २४ मार्च रोजी साजरी केली जाईल ,तर २५ मार्च रोजी धुलिवंदन सण साजरा करण्यात येणार आहे.
होळी हि वसंत ऋतूचे सुरुवात , हिवाळ्याचा शेवट आणि रंग, प्रेमाचा वर्षाव साजरा करणारा सण आहे. होळी हा सण पाश्चात्य देशात हि काही भागांमध्ये साजरा केला जातो. जगभरातून हा उत्सव पाहण्यासाठी अनेक पर्यटक भारतात येतात. या दिवशी काढण्यात येणारी विद्यापीठ परिसरातील मिरवणूक हे एक खास लक्ष वेधून घेते.
अमंगल विचारांचा नाश करुन चांगली वृत्ती चा स्वीकार करावा , चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश आहे.
राधा आणि श्री कृष्ण या देवी देवतांचे चिरंतर प्रेम साजरा करणारा हा उत्सव आहे.वाईट दिवसांवर मात करून नवीन वाटचालींना सुरुवात होण्याचा प्रतीक आहे,
फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या सणाला “फाल्गुनोत्सव”,आणि दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या वसंत ऋतू सुरु होण्याच्या दिवसाला “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणतात.
भारतातील राज्यांमध्ये HOLI ची अनेक नावे आहेत.
लाठमार होळी- उत्तर प्रदेश
फाकुवा- आसाम
मंजाल कुली- केरळ
याओसांग- मणिपूर
खडी होली – उत्तराखंड
फागुवा- बिहार
होला मोहल्ला- पंजाब
शिमगो – गोवा
शिमगा – महाराष्ट्र
बसंत उत्सव आणि दोल जत्रा- बंगाल
कमान पंडीगाई – तामिळनाडू
दुलंडी होळी – राजस्थान
डोल पौर्णिमा – ओडिशा
कृषी संस्कृतीतील Holi चे महत्त्व
होळीच्या निमित्ताने कृष्ण-बलराम यांचे प्रेमळ न तुटणारे नाते दिसते, या दोन्ही देवतांचे अभिवादन आणि पूजा केली जाते,या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाचे आभार व्यक्त करतात, या दिवसांमध्ये गव्हाचे पीक तयार होते, होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजून अग्नी देवतेला अर्पण करण्याची प्रथा आहे
Holi ची पौराणिक कथा:
हिरण्यकशिपु याला हिरण्यकश्यप म्हणूनही ओळखण्यात येते, हा पुराणातील कथेनुसार असुरांचा दैत्य राजा होता. हिरण्यकशिपूचा धाकटा भाऊ, हिरण्यक्ष, याला विष्णूच्या वराह (रानडुक्कर) अवताराने मारण्यात आले होते, यामुळे चिडलेल्या हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाची कृपा मिळवण्यासाठी तप केले,त्याने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून कोणत्याही निवासस्थानात ,कोणत्याही निवासस्थानाच्या बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात ,प्राण्याने, ना कोणत्याही शस्त्राने, ना कोणा मनुष्याद्वारे मृत्यू येऊ नये,असा वर हिरण्यकश्यपू ने ब्रम्हदेवाकडे मागितला, ब्रम्हदेवाने हि त्याला हा वर दिला.
त्याने तिन्ही जगाला वश केल्यानंतर,विष्णूच्या नरसिंह (मनुष्य-सिंह) अवताराने त्याचा वध केला.
प्रल्हाद हा हिरणूकाश्यप व देवी कयाथू चा मुलगा. देवी कयाथू दयाळू स्त्री होती आणि ति विष्णू (नारायण)देवाची महान भक्त होती. कयाथु ने तिच्या पूर्वीच्या जन्मात ब्रह्मा लोकामध्ये देव श्री संगुकर्ण म्हणून सेवा केली होती.
तिच्या पतीने पृथ्वी आणि स्वर्गातील लोकांना त्रास दिला,तरी तिने हिरण्यकश्यप ला विष्णू भक्त बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तिला यश मिळाले नाही.
गरोदर असताना ती भगवान विष्णूची पूजा करायची. कयाथु आणि तिचा मुलगा प्रल्हाद दोघेही भगवान विष्णूचे भक्त बनले .
वडील हिरण्यकश्यप ने प्रल्हाद हा विष्णू भक्त आहे म्हणून खूप त्रास दिला, अनेकदा त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ,तरीहि प्रल्हादाला हिरण्यकश्यप मारू शकला नाही, त्याने देवी होलिकेला प्रल्हादाला मारण्यास सांगितले, होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेतले आणि अग्निकुंडात प्रवेश केला प्रल्हादा ला काहीही झाले नाही ,उलट होलिकेचे दहन झाले .
होलिका देवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता अशी कथा आहे, होलिका दहन वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे.
कोकणातील शिमगा :महाराष्ट्रातील कोकणात होळी हा सण खुपमोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, या दिवशी कामानिमित्त गेलेले लोक आपापल्या गावी जातात, होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात.,होळीला नारळ ,तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे . होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.या दिवशी लोक देवीची पालखी ची मिरवणूक काढण्यात येते, लोक गाणी, पारंपरिक चालून आलेल्या प्रथांचे पालन करतात.
रंगपंचमी : महाराष्ट्रात होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा करतात,याला ‘धुळवड’ असेही म्हंटले जाते. या दिवशी होळीची रक्षा अंगालालावली जाते, तसेच एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते, सर्वांनी एकत्र जमून , बंधुभाव जपला जातो, एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहण्यात येते. काही ठिकाणी होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु झाली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे
धूलिवंदन :होळीच्या दुस-या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा करण्यात येतो, या दिवशी सकाळी घरातील लोक पाण्याची तपेली, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात, आदल्या दिवशी होळी पेटवल्यामुळे त्या ठिकाणी पाणी तापवले जाते, . या पाण्याने लहान मुलांना अंघोळघालण्यात येते,असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केल्याने लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात.आंब्यांच्या कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांच्या अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडतात,आणि राख कपाळाला लावतात. अंगाला फासून व नंतर स्नान करण्यात येते.
सायंकाळी मंदिरात जाऊन , एकमेकाना तसेच देवाला गुलाल लावून शुभेच्या देतात.
Holi चा नैवेद्य :महाराष्ट्रात प्रत्येक घरांमध्ये पूर्णपोळी बनवली जाते, होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखिवला जातो. होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची प्रथा आहे. होळीमध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा केला जातो.
इको फ्रेंडली (पर्यावरणास हानिकारक नाही) अशी Holi साजरी करा:
होळीमध्ये वापरलेले रंग वसंत ऋतुच्या विविध रंगछटांचे अनुवादन करतात. परंतु आजच्या काळात होळी सर्वच गोष्टींसाठी सुंदर राहिली नाही. इतर विविध सणांप्रमाणे, होळी देखील निर्दयपणे व्यापारीकरण, उद्दाम आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचा स्रोत बनली आहे. होळीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक आणि पर्यावरणीय गट होळी साजरी करण्याच्या अधिक नैसर्गिक मार्गांकडे आवलंबवा असे सांगत आहेत.
रासायनिक रंगांचे हानिकारक प्रभाव आपल्याला दसून येतात.
पूर्वीच्या काळी वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या झाडांच्या फुलांपासून होळीचे रंग तयार केले जात असत, जसे की फ्लेम ऑफ द फॉरेस्ट (केसू),आणि इंडियन कोरल ट्री (पारिजात) या दोन्ही रंगांचा रंग चमकदार लाल असतो. अनेक फुलांपासून कच्चा माल उपलब्ध करून दिला गेला आहे, बहुतेक झाडांमध्ये औषधी गुणधर्म देखील होते आणि त्यांच्यापासून तयार केलेले होळीचे रंग त्वचेसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहेत.
रंगांच्या तीनही श्रेणींचा अभ्यास केला असता,पेस्ट, कोरडे रंग आणि पाण्याचे रंग. होळीचे हे तीनही रासायनिक रंग घातक आहेत.पेस्टमध्ये अत्यंत विषारी रसायने असल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. होळीच्या विविध रंगांमध्ये वापरण्यात येणारे रसायन आणि त्यांचे मानवी शरीरावर होणारे हानिकारक घातक परिणाम होऊ शकतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
होलिका दहनाचे महत्त्व काय?
होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, हिंदू पौराणिक कथांमधील प्रल्हाद आणि होलिकाच्या दंतकथेचे प्रचलित आहे.
होळीचे महत्त्व काय?
होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, वसंत ऋतूचे आगमन आणि प्रेम आणि एकतेचा उत्सव.
निष्कर्ष:
Holi या उत्सवाची वरवरची रचना एकसारखी असली तरी ,प्रत्येक खेडोपाड्यात शिमगोत्सव साजरा करण्याची एक वेगळी शैली आहे. भारतीय संस्कृती मैला-मैलावर कशी बदलत राहते आणि तरीही आपण भारतीय म्हणून आपल्याला एक भाग्य मिळाले आहे ,आपली प्रथा ,रूढी, परंपरा आजही आपण टिकवून ठेवल्या आहेत. ज्यांचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचे आपले कर्तव्य आहे.
होळी सणाच्या दरम्यान कोकणातील कोणत्याही गावात जाण्याची आणि जिवंत संस्कृती आणि परंपरा अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आहे.
सर्वांना निरोगी, सुरक्षित आणि आनंदी होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद …